सुजय बोगावत याचे सी.ए. परिक्षेत यश

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- जुलै महिन्यात इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात आलेल्या सी.ए.परिक्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये नगर, इमारत कंपनी येथील बोगावत ऑटोचे संचालक अजय बोगावत यांचे चि.सुजय बोगावत याने चांगले गुण मिळवत सी.ए.फायनल परिक्षेत यश संपादन केले. चि.सुजय बोगावत यास सीए मोहन बरमेचा, सीए परस छल्लानी, सीए … Read more

‘इंजिनिअरिंग आणि करिअर ऑप्शनस’ या विषयी ऑनलाईन मोफत कार्यशाळेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रकिया लक्षात घेता पुणे, वाघोली येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च या महाविद्यालयाच्यावतीने 12 वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंजिनिअररिंग आणि करिअर ऑप्शनस्’ या ऑनलाईन मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे, अशी माहिती संचालक ऋषीकेश सावंत यांनी दिली. कोरोनाची सद्यस्थिती … Read more

आज ८३५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २३ हजार १७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 758 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड वापरताना त्या कार्डाचे स्कॅनिंग करून डाटा चोरणे व त्याआधारे बनावट एटीएम कार्ड तयार करून नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलं आहे. अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी या आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. सुजित राजेंद्र सिंंग असे या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल झाली सुरु

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-   जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. तसेच वाढत्या लसीकरणामुळे याचा प्रादुर्भा कमी होताना दिसून येत आहे. यातच अनेक तालुक्यांची वाटचाल हि कोरोनमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. शेवगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने घट होत असून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. शेवगावकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. दरम्यान … Read more

सुजय विखे म्हणाले…’त्या’ ठेकेदाराला पकडून तोंडाला काळे फासल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  नगर मनमाड महामार्गावर प्रचंड मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर प्रवास करताना चांगला रस्ता शोधूनही सापडणार नाही अशी दैनावस्था झाली आहे. दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून आपली वाहने चालवावी लागत आहेत. पावसाच्या कारणास्तव रस्त्याच्या कामाला विलंब होत असेल परंतु येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होईल असा … Read more

छिंदम बंधूंना तोफखाना पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला भाजपा चा माजी उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत याना तोफखाना पोलिसांनी आज अटक केली आहे. नगर शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकांना दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार चिंद्दम व त्याच्या साथीदाराने केला होता या प्रकरणासंदर्भात … Read more

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचा बिनविरोध झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- नगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सेनेच्या नगरसेविका पुष्पा बोरुडे यांची, तर उपसभापतीपदी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे बिनविरोध हि निवड झाली आहे. … Read more

साथीच्या आजारांची वाढली भीती! रुग्णालय भरू लागली तुडुंब

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- कोरोना साथीच्या भीतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोक आजार अंगावर काढत आहेत. मात्र आता ताप, सर्दी, खोकला आदी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांचे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. साथीचे आजार बळावू लागले आहे, हे आजार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असा आदेश आमदार संग्राम जगताप … Read more

रेल्वे मालधक्का स्थलांतर बाबत झाला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील रेल्वे मालधक्का दुसरीकडे हलविण्याचा सुरु असलेला प्रक्रियेवर एक महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. रेल्वे मालधक्का इतरत्र न हलविता नगर येथील रेल्वे स्टेशन येथे कामकाज सुरू करण्याचा निर्णय वाहतूकदार व माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच न्यायालयाचा निर्णय दोघांनाही मान्य राहील, असे यावेळी ठरले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून … Read more

मावा विक्रेत्यांवर कारवाई करा अन्यथा आपल्या कार्यालयाला टाळे ठोकू

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- भिंगार शहरांमधील अल्पवयीन मुले तसेच वयोवृद्ध पुरुष यांना विषारी मावा खाल्ल्यामुळे कॅन्सर झाला आहे. भिंगारमध्ये दरवर्षी ८ ते १० लोकांना माव्यामुळे जीव गमवावा लागत आहे. राज्य सरकारने बंदी घालून देखील राजरोसपणे भिंगार शहरामध्ये संपूर्ण पानटपऱ्यांवर खुलेआम मावा विक्री चालू आहे. माव्यामध्ये घातक द्रव्य घालून हा मावा कसा जास्तीत … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ३३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी आरपीआयचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- शहरातील जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवती स्थानिक नागरिकाने केलेले अतिक्रमण हटवून, सुरु असलेली दर्गाची विटंबना त्वरीत थांबण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या उपोषणात आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर … Read more

आमचा पाणी प्रश्न सोडवा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना नागरिकांचे साकडे !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील नागरिकांना ८ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने ऐन पावसाळ्यात ते तहानलेले आहे. जलसंपदा विभागाची भेंडाळी परिसरातील जमीन हस्तांतरित करावी. पाटबंधारे विभागाने निधी उपलब्ध करुन साठवण बंधारा करावा, असे साकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घुलेवाडीकरांनी घातले आहे. घुलेवाडी गावाला अनेक समस्यांनी वेढले आहे. … Read more

निळवंडेतून ३३६० क्युसेकने विसर्ग !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- भंडारदरा धरणात रविवारी (१२ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता पाणीसाठा ११,०३९ दलघफू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सोमवारी निळवंडे धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील नागरिक व शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सोमवारी निळवंडे धरण भरल्यानंतर निळवंडे धरणातून ३३६० क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले. भंडारदरा व निळवंडे धरणातून जास्त प्रमाणात पाणी … Read more

शाळा, महाविद्यालये सुरु होण्यासाठी श्री विशाल गणपती मंदिरासमोर शनिवारी घंटानाद

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी शाळा, महाविद्यालय बंद असल्याने एक पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप करुन, पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शैक्षणिक पालकशाही अभियानाची घोषणा करण्यात आली. या अभियानातंर्गत शाळा, महाविद्यालये सुरु होण्यासाठी विद्येची देवता श्री विशाल गणपती मंदिरासमोर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 953 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम