कोरोनाचा प्रकोप ! दहा दिवसात कोरोनाच्या आठ हजार बाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ७ हजार ८९० इतके बाधित झाले … Read more

ग्रामपंचायतपेक्षा दयनीय अवस्था अहमदनगर महापालिकेची !

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- महानगरपालिकेने पुर्नमुल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टीत तीनपटीने वाढविण्याचा प्रस्ताव रद्द करावा व कोरोनाच्या संकटकाळाचा विचार करुन पाणीपट्टी, घरपट्टी माफ करण्याच्या मागणीसाठी शहरातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात अशोक सब्बन, बहिरनाथ वाकळे, अनंत लोखंडे, अर्शद शेख, फिरोज शेख, कॉ. महेबुब सय्यद, दिपक शिरसाठ, विजय केदारे, संजय … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास जिल्ह्याचे निष्क्रीय पालकमंत्रीच जबाबदार !

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जागतिक महामारीच्या विळख्यातून अनेक राज्यांची मुक्तता होत असतांना अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्यास जिल्ह्याचे निष्क्रीय पालकमंत्रीच जबाबदार असून, कोल्हापुरहून अहमदनगर येथे 20-25 दिवसांतून एकदा येऊन फक्त आढावा बैठका घेऊन उंटावरुन बसून शेळ्या हाकण्याचे काम हे पालकमंत्री करीत असून, प्रशासनाकडून अपुरी माहिती घेऊन फक्त कोरोनाची काळजी घेत … Read more

घरपट्टी वाढविण्याचा अधिकार महासभा अथवा आयुक्तांना नाही – माजी महापौर दीप चव्हाण यांचा दावा

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- गेल्या तीन-चार दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये नागरिकांमध्ये तीनपट घरपट्टी वाढीवरून असलेला संभ्रम मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इमारत व जमिनीचे पुनर्मूल्यांकन करणे बाबतचा प्रस्ताव उद्या होणाऱ्या महासभेपुढे जो विषय महानगरपालिकेने सभेमध्ये घेतलेला आहे तर तो प्रस्ताव मनपा कार्यक्षेत्रातील इमारत व जमिनीच्या पुनर्मूल्यांकन संदर्भातील सदर विषय आहे. महासभा … Read more

चोरटा येणार होता उद्यानात, पोलिसांनी फिल्डिंग लावत घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-भिंगार कॅम्प पोलिसांनी भिंगार शहरात चोरी करणार्‍या एकाला अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. साहील राजू काकडे (वय 19 रा. सदर बाजार, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भिंगारच्या इंदिरानगर परिसरात चोरी करणारे दोन इसम नगर-पाथर्डी रोडवरील उद्यानामध्ये येणार असल्याची … Read more

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पायी चालणाऱ्या एकास बसस्थानकाजवळ लुटले

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- रात्री पावणे अकरा वाजता माळीवाडा बस स्थानकाकडे पायी चाललेल्या एका व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी थांबवून बळजबरीने रोख रक्कम, मोबाईल असा 45 हजार रूपयांचा ऐवज लुटला. दरम्यान शहरात लुटमारीचे प्रकरण वाढत असताना या भुरट्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. संतोष प्रकाश धनवडे (वय 35 … Read more

बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- नगर तालुका पोलिसांनी बेकायदेशीर दारु विक्री होत असलेल्या ठिकाणांवर छापे टाकून मुद्देमाल जप्त करत दारु विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली आहे. नगर तालुका पोलिस स्टेशनचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाने पोहेकॉ लगड ,पोहेकॉ सरोदे, व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि.10 ऑगस्ट रोजी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९६ हजार २५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 908 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या बदलीला सुरूवात

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सरकारी कार्यालयात बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. काही जिल्हापरिषद तसेच पोलीस दलात देखील बदल्या झाल्या आहेत. नुकतेच बर्‍याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या बदलीला सुरूवात झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या आणखी काही अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असून जिल्हा परिषदेत तीन वर्षापेक्षा अधिक … Read more

शाळांची घंटा वाजविणायचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- करोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून मंगळवारी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मास्क, शारिरीक अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि शाळांचे निर्जंतुकीकरण करून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे झेडपी समोर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचार्यांनी मंगळवारी (10 ऑगस्ट) निषेध दिवस पाळून ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचारी यांनी बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चा घेऊन येत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण होत नसल्याने … Read more

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अधिकार्‍यांच्या बदल्या..!

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अधिकार्‍यांची बदली प्रक्रीया सुरू झाली असून, काल रात्री उशिरा संपूर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांची बदलीचे आदेश आले. दरम्यान, यादव यांना पदोन्नती असल्याने त्यांना नेमणुकीच्या ठिकाणाची … Read more

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी अहमदनगर जिल्ह्यातील या नेत्याचे नाव चर्चेत

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत आता अहमदनगर जिल्ह्यातयून आणखी एक नाव पुढे आले आहे. नगर जिल्ह्यातील भाजप नेते प्रा. राम शिंदे यांचे नाव त्यांच्या समर्थकांमधून पुढे करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे नेते, मंत्री असताना अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव, पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या फोटोचा अवमान, भाजप नेते म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- नगर तालुका पंचायत समितीच्या आवारात कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी लावण्यात आलेल्या फलकवरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडून छेडछाड व विटंबना करणार्‍या समाजकंटकावर ताबडतोब गुन्हा दाखल करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयात तोडफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोशी झालेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ही’ टोळी दोन वर्ष हद्दपार !

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहरात संघटीत गुन्हे करणार्‍या नालेगावच्या दातरंगे टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले.याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश काढला आहे. टोळीप्रमुख अतुल रावसाहेब दातरंगे (वय 28), त्याचा भाऊ दिनेश रावसाहेब दातरंगे (वय 32 दोघे रा. टांगेगल्ली, नालेगाव) व बाबासाहेब सिताराम दातरंगे (वय 45 रा. गाडगीळ पटांगण, बोरूडे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९५ हजार ४०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

नगरकरांना खड्ड्यात घालणाऱ्यांना वाढीव कर का द्यायचा ?

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात आर्थिक नियोजन शून्यतेमुळे मनपा सत्ताधार्‍यांनी मनपाची पुरती वाट लावली आहे. दिवाळखोरीमुळे महापालिकेला कंगाल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी तिप्पट करवाढीचा घाट घातला आहे. तिप्पट करवाढीचा प्रस्ताव मागे न घेतल्यास कोरोनामुळे आधीच पिचलेल्या सामान्य नगरकरांना वेठीस धरण्यासाठी मनपा सत्ताधारी आणि शहराच्या लोकप्रतिनिधींच्या या तुघलकी प्रस्तावा विरोधात काँग्रेसच्या वतीने … Read more