केडगाव उपनगरातील या परिसरात कंटेन्मेंट झोन

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- केडगाव उपनगरातील भूषणनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने या भागातील फैलाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी २ ऑगस्टपर्यंत हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केला. भूषणनगर, वाळके घर, राणी लक्ष्मीबाई चौकाजवळील बाबा कराळे घर, घोडके घर, आनंद प्रोव्हिजन स्टोअर्स, औताडे घर, गारूडकर घर, चव्हाण घर,‌ तेजस एंटरप्राइजेस, महावीर कलेक्शन, … Read more

सावधान अहमदनगरकर : एकाच दिवशी जिल्ह्यात वाढलेत ३४१ रुग्ण,पाच जणांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात चार महिन्यांत प्रथमच एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल ३४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २ हजार २७ झाली. चोवीस तासांत कोरोनामुळे पाच जणांचा बळी गेला. गेल्या २२ दिवसांत २० जणांचा बळी कोरोनाने घेतला. आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे.  सोमवारी शासकीय रुग्णालयातील कोरोना … Read more

अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्येही पोहोचला कोरोना,आढळले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत आहेत आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  तसेच जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या गावातही कोरोनाचे सहा रुग्ण आढळले आहेत. राळेगणसिद्धी गावातील सहाजणांचा खाजगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  आज येथे आढळलेले रूग्ण हे मुंबई येथील आहेत. ते कोरोनामुळे … Read more

‘त्या’ कोरोना मृतदेहा संदर्भात जिल्हा रुग्णालयाकडून स्पष्टीकरण  

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- जिल्हा रुग्णालयात याबाबतीत हलगर्जीपणा झाला या आशयाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह चार तास दुसऱ्या एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता असा हा व्हिडीओ होता. परंतु या प्रकाराचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी सदर व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीचा … Read more

अहमदनगरमध्ये कोरोनाचा धुमाकूळ , प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- बऱ्याच दिवस कोरोनाला रोखण्यापासून यश मिळवणाऱ्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. शहारामधे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत असून यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनात महापालिकेची यंत्रणा अपयशी ठरली आहे. असा आरोप करत महापालिकेत आयएएस दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्यने पार केला दोन हजारचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या १७३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्याच बरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने  जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना  … Read more

धक्कादायक! रुग्णाशेजारीच ठेवला कोरोनाबाधिताचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होताना दिसत आहे. प्रशासनही हा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु जिल्हा रुग्णालयात याबाबतीत हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह चार तास दुसऱ्या एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता़. हा धक्कायदायक प्रकार रविवारी (दि़१९) दुपारी उघडकीस आला़. … Read more

‘ह्या’ तालुक्यात नव्याने १६ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. सोमवारी तालुक्यातील सलाबतपूर,जळके, गिडेगाव येथील ६० व्यक्तीच्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे मागील दोन दिवसात सात कोरोनाबाधित … Read more

पावसाळ्यामुळे इतर साथीचे आजार पसरत असताना कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भिती

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर(प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी नागरिकांच्या आरोग्य तपासणीने साजरी करण्यात आली. नागरदेवळे येथे फिजीकल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद लाभला. फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले की, संत सावता महाराजांनी … Read more

भ्रष्टाचार करणार्‍यांची संपत्ती जप्त करुन ‘त्या’ रस्त्याचे काम पुन्हा करा !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडे तीन कोटी रुपये खर्च करुन झालेल्या तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असताना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने रविवारी टक्केवारी भज्ञाक सुर्यनामा आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांच्या हस्ते सदरील खड्डेमय रस्त्यास प्रतिकात्मक लोकभज्ञाक व्हॅक्सिन देण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवक अपहरणप्रकणी माजी उपनगराध्यक्षांना अटक!

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या अपहरण प्रकरणाने आज मोठे वळण घेतले. दत्तात्रय कोते यांच्या अपहरणामागील सूत्रधार शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष विजय तुळशीराम कोते हेच असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी विजय कोते यांना आज अटक केलीय. शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे नगर- औरंगाबाद रस्त्यावर एका हॉटेलजवळ रात्रीच्यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कँन्टोन्मेंट बोर्डात कोरोनाची एन्ट्री!

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर कँन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात कोरोनाने धडक दिलीय. या कार्यालयातल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काल संध्याकाळी या कर्मचार्‍यांच्या स्रावाचे पाॅझिटिव्ह अहवाल आले असून आज (दि. २०) यासंदर्भात सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये सदर अहवाल पाठविण्यात येणार आहे. कँन्टोन्मेंट बोर्डाच्या ज्या कर्मचार्‍यांचा कोरोनाचा पाॅझिटिव्ह रिपोर्ट आलाय, त्यामध्ये चालक, क्लार्क, स्टोअर किपर आदींचा समावेश … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळी वाढले १० नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात १० नवे रुग्ण आढळुन आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १६८७ झाली आहे. आज नेवासा ०४ (सलबतपुर०४), कर्जत ०१ (शहर), शेवगाव ०१ (वडगाव), नगर शहर ०२, संगमनेर ०१ (घुले वाडी) आणि नगर ग्रामीण ०१ (रुई छ्त्तीसी) येथील रुग्ण आहेत.  दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज १११ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११३६ झाली आहे. नगर ग्रामीण १, नगर शहर ३७,नेवासा ५,पारनेर ३,राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२,श्रीगोंदा १,अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण आज बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक … Read more

अहमदनगर शहरात आणखी एक कंटेन्मेंट झोन वाढला !

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- पाइपलाइन रस्त्यावरील श्रमिकनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर १ ऑगस्टपर्यंत कंटेन्मेंट झोन घोषित केला. शहरातील फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शहरातील विविध भागात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात येत आहेत. पाइपलाइन रोडकडून श्रमिकनगरकडे येणारा मुख्य रस्ता, वाॅशिंग सेंटर, सागर मेहसुने यांचे घर, कोडम यांचे घर, शेजवळ … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात वाढले १०६ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 (लास्ट अपडेट @ 10.30 PM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ४७ नवे रुग्ण आढळुन आले.तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१४ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात ४७ जणांचे अहवाल … Read more

कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आल्याने आ.मोनिका राजळे यांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- भारतीय जनात पक्षाच्या आमदार मोनिका राजळे या कोरोना बाधीत रुग्ण महिलेच्या संपर्कात आल्याने त्यांनी होमक्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात राजळे यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तरीही राजळे यांनी नगर येथील घरीच क्वारंटाईन होवुन जनसंपर्क टाळला आहे. आमदार … Read more

बुऱ्हाणनगर ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोना हा संसर्ग विषाणू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तो फैलावत चालला आहे. आता तो ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जगात व आपल्या देशात यावर औषध तयार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी आयुर्वेद … Read more