नगर शहरात पुढील 7 दिवस दररोज 21 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासनाने दि.8 पासून दि.14 ऑक्टोबरपर्यंत सात दिवस मिशन कवच कुंडल मोहीम राबविण्याचे नियोजन केले असून या मोहिमेचा भाग म्हणून नगर शहरातही आगामी सात दिवस दररोज 21 हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मनपाकडून आरोग्य केंद्रनिहाय कृती आराखडा करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भिंगारच्या नेहरू मार्केटला भीषण आग…

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- शुक्रवारीरात्री पहाटेच्या सुमारास भिंगार छावणी परिसरात सदर बाजार लगत असलेल्या नेहरू मार्केटला भीषण आग लागली. या आगीत नेहरू मार्केट मधील चोवीस पैकी तब्बल वीस दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. दरम्यान या दुर्घटनेमुळे संबंधित दुकानदारांचे मोठे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भिंगारमधील शुक्रवार बाजार … Read more

थकीत कर प्रकरणी ‘या’ नगरपंचायतीने सहा दुकाने केली सील

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  नगरपंचायतीचा कर अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या दुकानदारांवर कर्जत नगरपंचायतीच्या वतीने आज दुकाने सीलची कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत एकूण ६ दुकाने सील केली असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. दरम्यान नगरपंचायतीच्या वतीने व्यवसायिकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद होते. व्यवसायिक आर्थिक अडचणीत … Read more

स्व.अनिलभैय्या राठोड व लोकमान्य टिळक स्मृती निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- कोरोना लॉकडाऊनच्या प्रदीर्घ संकटातून आपण बाहेर पडत असतांना पुन्हा नव्या विचारांनी सज्ज होण्याची गरज आहे. सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणारे लोकाभिमुख काम करुन सामान्यमाणसांना आपलेसे वाटणारे माजी मंत्री स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या स्मृती जपण्यासाठी तसेच गेली अनेक वर्षे लोकमान्य टिळक यांच्या स्मृती प्रित्यर्थ होणारी निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध अंगी … Read more

आज ६३१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३६५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ६३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार २१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३६५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकुर रुजू.

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी या पदावर डॉ. रवींद्र ठाकुर यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली असून त्यांनी आज जिल्हा माहिती अधिकारी अहमदनगर या पदाचा कार्यभार घेतला. डॉ.रवींद्र ठाकूर यापूर्वी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक म्हणून वृत्त शाखेत कार्यरत होते. डॉ.ठाकुर यांची सन 2006 पासून जिल्हा माहिती अधिकारी, … Read more

जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! अवघ्या 48 तासात 16 वाहनांची केली चोरी

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. कारण जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक दहशतीखाली वावरू लागले आहे. तर चोरटे मात्र निर्धास्त आहे. यामुळे चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरते असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात चोर्‍याघरफोड्यांबरोबरच दुचाकी-चारचाकी वाहने चोरणार्‍या टोळ्या सक्रीय … Read more

5 लाखाचे10 लाख देतो म्हणत व्यावसायिकाची केली फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  दुर्मिळ वस्तू देण्याच्या बहाण्याने पाच लाख रुपये घेऊन त्या बदल्यात 10 लाख रूपये देण्याचे आमिष दाखवून येथील व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अण्णा रावसाहेब म्हस्के (डॉक्टर कॉलनी रा. बुरूडगाव रोड) व त्याच्या साथीदारांविरूद्ध (नाव माहिती नाही) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सचिन मोतिलाल कटारिया (रा. तपोवन … Read more

Ahmednagar Crime : चोरट्यांना पडली चारचाकीची भुरळ; एकाच रात्री इतक्या केल्या लंपास !

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यासह नगर शहरात देखील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरीक देखील दहशतीखाली वावरू लागले आहे. नुकतेच शहरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना चारचाकी वाहनांची भुरळ पडली आहे. नगर शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना आता चारचाकी वाहने चोरीला जात आहेत. एकाच रात्री दोन कार चोरीला … Read more

मुलीला सोड …पिस्तुल माझ्या डोक्यावर ठेव ! संदीप मिटके यांनी जीवाची पर्वा न करता केलेले धाडस ! वाचा सविस्तर घटनाक्रम जशाच्या तसा…

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे Dy.s.p. संदीप मिटके यांनी चित्रपटातील प्रसंगलाही लाजवेल अशा घडलेल्या घटनेत स्वतच्या जीवाची पर्वा न करता ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची अतिशय प्रसंगावधान राखून सुटका केली या धाडसी कारवाईचे कौतुक आज रोजी नाशिक परिक्षेत्राचे IG श्री. B.G.शेखर यांनी केले. काल दि.7/10/2021 रोजी सकाळी डीग्रस येथे पीडित महिला,त्यांचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 365 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

मनपाने शिक्षकांसाठी आयोजित केला डिजिटल स्कूल उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली अनेक महिन्यांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागल्याने राज्यातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. यातच नगर शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. नुकतेच मनपा शाळेतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणात मागे राहू नयेत यासाठी मनपाच्यावतीनेही डिजिटल शिक्षणास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. … Read more

अहमदनगर शहरातील खड्ड्यांप्रश्नी मनपाचे भावनिक आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर सामान्य नागरिकांच मनपावर रोष वाढलेला आहे. शहरातील विदारक अवस्थेचे चित्रण विविध माध्यमातून चर्चेत आले आहे. पण आता मनपा प्रशासनाने एक निवेदन जारी करून भावनिक आवाहन करत खड्डे का पडले याची कारणे दिली आहेत. परंतु, कारणे दिल्याने नगरकरांचा त्रास कमी होणार नसल्याने मनपा आता शहर … Read more

साहेब.. मुलीचा छळ करून खून करणाऱ्या सासरच्या लोकांना अटक करा..! ‘त्या’ कुटुंबाने केली पोलिस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ करून विवाहितेला मारहाण केली व विहिरीत टाकून दिले. यात त्या विवाहितेच्या मृत्यूनंतर खूनाचा गुन्हा दाखल झालेल्या सासू-सासर्‍याला एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने खरवंडीच्या भोगे कुटुंबाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी निवेदन दिले … Read more

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ : पुजारी कुटुंब कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर तुळजाभवानी माता मंदिरातील पुजारी कुटुंब कोरोनाबाधित आहे. ते मंदिरामध्ये राजरोसपणे फिरत असल्याचा आरोप बुऱ्हाणनगर ग्रामस्थांनी केला आहे. शारदीय नवरात्र उत्सव आज पासून सुरु झाला आहे. यातच नगरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुऱ्हानगर देवीचे पुजारी भगत कुटुंबीय कोरोना बाधित असून ते मंदिरामध्ये राजरोसपणे फिरून … Read more

पोलिसांना फोन आला… आताच गेला तर तो भामटा लगेच सापडेल

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरासह भिंगार परिसरात घरफोडी व दुचाकी चोरीचे सञ सुरुच होते. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण झाले असतानाच भिंगार कॅम्प पोलीसांनी घरफोडी, दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा पकडण्याची दमदार महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहत्या घरासमोर बसलेले असताना मालक मनोज पगारे यांचे बंगल्याचा समोरच्या दरवाज्याचे कुलूप … Read more

अमरधामवर महापालिकेच्या नामांतरचा फलक झळकणार

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Corona Breaking :- शहरातील खड्डेमय रस्ते, ठिकठिकाणी साचलेले घाण पाण्याचे डबके, शहरातील अस्वच्छता, पसरलेले साथीच्या आजाराने शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना, विजयादशमीच्या दिवशी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिकेचे नामांतर ढब्बू मकात्या महापालिका करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Corona Breaking :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 415 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम Ahmednagar Corona Breaking News Today