जनावरांच्या मृत्यूस ‘हा’ आजार कारणीभूत; पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील केलवड येथील जनावरांचा मृत्यू घटसर्प आजारातून झाला आहे, असे निरीक्षण पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर जनावरांना घटसर्प हा आजार झाल्याचे लक्षात येत आहे. २५० निरोगी जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. जनावरांसाठी सोडा व चुना वापरावा जेणेकरून इतरांना हवेतून आजाराचा संसर्ग होणार नाही. गावात हा … Read more

RSS विरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांच्या प्रतिमेला ‘जोडेमारो’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- वादग्रस्त वक्तव्य करत नेहमी देशातील वातावरण दूषित करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारा विषयी वादग्रस्त वक्तव्य क्रूर आतंकवादी संघटना तालीबानशी तुलना केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध देशभरात विविध शहरात आंदोलने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने जावेद अख्तर यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात खाकीला कलंक ! पोलीसाकडून लग्नाचे आमिष दाखवून …

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी शरीर संबंध ठेवून गर्भवती ठेवले. गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच पत्नी व मुले असल्याची माहिती लपवून फसवणूक केली. तसेच लग्नास नकार देवून जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले … Read more

Ahmednagar Rain : मुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- चार दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. नगर शहरात तासभर झालेल्या दमदार पावसाने रस्ते जलमय झाले आहे. हवामान खात्याने ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने कल्याण रोडवरील पुल … Read more

सत्ता नसतांना देखील समृद्धी प्रकल्पबाधितांना भरपाईच्या बाबतीत न्याय मिळवून दिला – आ. आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत करीत असतांना बागायती जमीन जिरायती दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात लाटण्याचा प्रयत्न सुरु होता. आपल्या जमिनी मातीमोल भावात जाणार या चिंतेने अनेक शेतकऱ्यांना उच्च रक्तदाबाचे विकार जडले होते. अशा वेळी या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई … Read more

कत्तलखान्यात चालवलेल्या जनावरांची सुटका..! दोघांवर गुन्हा दाखल : ‘या’ ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तलखान्यावर सोनई पोलिसांनी छापा टाकून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून १० जनावरांची सुटका करण्यात आली. जनावरांना मढी येथील गोशाळेत सोडण्यात आले आहे.तर याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चांदा येथील शास्त्रीनगर गाढवे वस्तीजवळ एका टेम्पोत काही जनावरे भरुन औरंगाबाद … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! …तर होणार वीजपुरवठा खंडित !

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात महावितरणची विविध वर्गवारीतील एकूण ३ लाख १८ हजार ६८५ ग्राहकांकडे ४७७ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे. सध्या आर्थिक स्थिती गंभीर असल्याने थकबाकी वसुल करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाही बैलपोळा व गणेशोत्सवावर सावट असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सण-उत्सव अडकल्याने कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. त्यात प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने लॉकडाउनचे संकेत दिल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात अडचणी निर्माण होताना दिसत आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-अहमदनगर: जिल्ह्यात आज ८८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १६ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

गोमांस बाळगल्याप्रकरणी दाऊदला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र सरकारने राज्यभरात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला होता. त्यामुळे राज्यात गोमांस बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरीही गोमसन तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच श्रीरामपुरात पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. श्रीरामपूर शहरातील बिफ मार्केटच्या मागे आरोपी दाऊद अजीज कुरेशी, (रा. कमिटी मज्जित जवळ,भारत नगर, मुंबई (सध्या … Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतके’ टक्के पावसाची झाली नोंद

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-नगर शहरात पावसाची संततधार कायम असून शनिवारी रात्रभर पाऊस बरसल्यानंतर रविवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाची सरासरीच्या 409 मि.मी. पावसाची नोंद झाली असून टक्केवारीत हा पाऊस 90 टक्के आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रभर संततधार पडत होता. रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्यावर दुपारी चारच्या सुमारास पुन्हा … Read more

गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा गुरु माऊली प्राथमिक शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे यांची तर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी बाळासाहेब सरोदे तर कार्याध्यक्षपदी अजय लगड यांची निवड करण्यात आली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन … Read more

लग्नाचे अमिष दाखवून विवाहित पोलीस कर्मचाऱ्याचा विद्यार्थिनीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- स्वतः विवाहित असताना देखील श्रीरामपूर शहरात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून गर्भवती ठेवले. त्यानंतर गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर असे या गुन्ह्यातील पोलीस … Read more

दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- घराचा दरवाजा तोडून श्रीरामपूर, शिर्डी परिसरात दरोडा घालणारे सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. यासीनखाँ उर्फ अनिल शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव, ता.नेवासा), सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले (रा.गोंडेगाव, ता.नेवासा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री अशिष अनिल गोंदकर … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणाले…निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हाच आपला ध्यास

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- ‘निळवंडे धरण व कालव्यांची कामे आपल्या हातून होणे हे नियतीच्याच मनात होते. म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर या कामाला गती दिली. २०२२ च्या मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे. यासाठी कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू आहेत. निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवाजी कर्डीले यांच्या मध्यस्थीने तनपुरे कारखाना कामगारांचे उपोषण मिटले !

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगारांनी गेल्या १४ दिवसापासून उपोषण सुरू केले होते.सत्ताधारी संचालक मंडळाने दोन पाऊले पुढे तर कामगारांनी दोन पाउले मागे घेऊन १४ व्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनित धसाळ यांनी समनव्याची भूमिका बजावून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १५ हजार १५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 723 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम