घोडेगावात अवैध धंदे जोमात, पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल ते घोडेगाव येथे मटका, जुगार, गाड्यांमधून स्टिल लुट, अवैध दारू, देहविक्री व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी बीट प्रमुखांनी येथील सर्व अवैध व्यवसायाला परवाना दिला कि काय, असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल, घोडेगाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन तरुणांचे अपहरण ! डोक्याला पिस्टल लावून १५ लाख लुटले

पाथर्डी विना नंबरच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चार जणांनी गाडीला कट का मारला, असे म्हणत अपहरण करत डोक्याला पिस्टल लावून दोन तरुणांकडून १५ लाख रुपये लटून नेले. सुमारे पावणेतीन तास हे अपहरण नाट्य चालू होते. ही घटना रविवार, (दि.१७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अमरापूर तिसगाव रोडवर तिसगाव शिवारात घडली. मुकुंद धस, असे पैसे लुटलेल्या तरुणाचे नाव … Read more

गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांच्या डोक्याला ताप ! श्रीगोंद्यात खाकीची दहशत कमी झाल्याचे चित्र

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात मागील काही दिवसापासून वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांच्या डोक्याला ताप ठरू लागली आहे. गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने गुन्हेगारांचे धारिष्ठ्य चांगलेच वाढले आहे. शहरासह तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यात गुन्हेगारांमध्ये खाकीची दहशत कमी झाली असल्याचे चित्र दिसून येत असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. श्रीगोंदा शहरासह तालुका हा संतांची … Read more

Mobile Blast : पॅटच्या खिशातून धूर निघू लागला आणि… मोबाईल खिशातून बाहेर काढताच घेतला पेट

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य यांच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅट जळून मांडीला व हाताला भाजल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत. सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य हे सोमवार (दि. १८) रोजी सकाळी दुकानात बसले होते, … Read more

शेवगाव : शेतकऱ्यांच्या विहीरीतून पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकऱ्यांच्या विहीरीतून ५ एचपीच्या दोन पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. प्रकाश कल्याण साळवे, ऋषीकेश लक्ष्मण साळवे अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून यांचा एक साथीदार पसार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील संजय रंगनाथ उगले, शुभम संजय उगले … Read more

Shrirampur : १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय !

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नी चार तालुक्यातील विविध संघटनांनी शेतकरी संघटनेस पाठींबा दिला आहे. पुढील १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी सांगितले. दि. १२ मार्चपासून येथील तहसील कार्यालयात अकारी पडीत शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणात काल सोमवारी (दि. १८) काळे बोलत … Read more

गणेगाव ग्रामपंचायतची पंचायत लर्निंग सेंटर म्हणून निवड ! अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव पंचायत…

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत प्रत्येक राज्यातील पंचायतराज संस्थेने राबविलेल्या विविध उत्कृष्ट योजना, संकल्पना, उपक्रम, कामे इत्यादीची यशोगाथा सर्वांना माहिती व्हावी, त्याचबरोबर अशी गावे राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्याकरता उत्कृष्ट मॉडेल म्हणून विकसित व्हावी, या उद्देशाने शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्य पातळीवर पंचायत लर्निंग सेंटर निर्माण केले आहेत. त्यात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यातून गणेगाव ग्रामपंचायतीची निवड करण्यात … Read more

Dr. Bhaskar More : डॉ. मोरेचा जामीन अर्ज फेटाळला ! विनयभंगाच्या गुन्ह्यात केला होता जामिनासाठी अर्ज

Dr. Bhaskar More

Dr. Bhaskar More : विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉ. भास्कर मोरे याचा सोमवारी दि.१८ रोजी दाखल केलेला जामिन अर्ज जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डॉ. मोरेच्या अडचणी वाढत आहेत. सध्या मोरे हा वन्य प्राणी पाळल्या प्रकरणी वनविभागाच्या कस्टडीत आहे. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी … Read more

कर्जत एमआयडीसीचा प्रश्न कोर्टात ! आ. राम शिंदेंनी MIDC ला खीळ घालण्याचे काम केले…

कर्जत एमआयडीसीचा प्रश्न राजकीय वादात आता खंडपीठात गेला असून, पाटेगाव, या ग्रामपंचायतीने थेट याचिका दाखल करत उद्योगमंत्र्यांसह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना पार्टी केले असून, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतली असल्याची माहिती अॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पाटेगावच्या सरपंच मनीषा कदम, उपसरपंच नामदेव लाड, सह प्रमुख ग्रामस्थ … Read more

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ! बदनामीच्या भितीने विष प्राशन करून आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने बदनामी होईल, या भीतीने या विद्यार्थिनीने विषारी औषध सेवन करून जीवन यात्रा संपविली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, २९ फेब्रुवारीला इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी गेली होती. यावेळी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत … Read more

Ahmednagar News : तरुणाचा मृतदेह सापडला ! नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खळबळ

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल दिनांक १७ मार्च रोजी रात्री पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की या घटनेतील मयत मयत प्रकाश ऊर्फ मल्हारी छबू पवार (वय ३५ वर्षे, … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील राजूर परिसरात शिळवंडी येथे संशयाच्या कारणातून पतीने पत्नीची कुऱ्हाड व कोयत्याने हत्या केली. ही धक्कादायक घटना काल सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुनिता संतोष साबळे (वय ४०, रा. शिळवंडी, ता. अकोले, जि. अ.नगर) या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. आरोपी संतोष साबळे (वय … Read more

नगर जिल्ह्यात लंकापतीचे अस्तित्व राहणार नाही ! ना निकाल बदलणार, ना खासदार बदलणार, ना पंतप्रधान बदलणार…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपाने महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. मात्र दुसऱ्या यादीत भाजपाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी … Read more

Ahmednagar Politics : मला सुजय विखेंची उमेदवारी मान्य, विखे यांचा सत्कार करत आ.राम शिंदे यांचे मोठे वक्तव्य

Ahmednagar Politics News : आज आपल्याला विजयाचा संकल्प करायचा आहे. खासदारकीच्या काळात सुजय विखे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आता सर्वानीच एकत्रित येत निवडणूक कार्यालय सुरू केले पाहिजे. तेथूनच सर्व नियोजन करत विजयाच्या अनुशंघाने तयारी करावी असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी केले. भाजपची लोकसभा निवडणुकीची पूर्वआढावा बैठक आज (दि.१८ मार्च) माउली सभागृहात पार … Read more

Ahmednagar News : लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नऊ जखमी

अहमदनगर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन माघारी परतत असताना या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जखमी झाले आहेत. वऱ्हाडाची जीप व ऊस वाहतूक करणाऱ्या पिकअपचा हा अपघात छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी येथे झाला. हा अपघात शनिवारी (१६ मार्च) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचा पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला … Read more

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नाव काय राहणार ? केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे तसेच अहमदनगरचे नामांतरण व्हावे हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतं आहे. दरम्यान जिल्हा विभाजनाचा मुद्दा अजून तसाच असला तरी देखील नामांतरणाच्या मुद्द्यावर वर्तमान शिंदे सरकारने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे नामांतरण करण्याचा निर्णय 13 मार्च 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात … Read more

Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळील आग ! संपुर्ण जंगल जळुन खाक

Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या परिसरातील जंगलाला अज्ञात व्यक्‍तीने लाग लावल्याने मोठ्या प्रमाणात झाडे- झुडपे जळाली असून आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी भंडारदरा धरण शाखेचे कर्मचारी उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. अकोले तालुक्‍यातील महत्वाचे धरण समजल्या जाणार्‍या भंडारदरा धरणाच्या परिसरात असणाऱ्या जंगलाला अज्ञात व्यक्‍तीने रविवारी दुपारी आग लावली. या आगीमुळे भंडारदरा धरणाच्या बगिच्यापासुन ते धरणावरील काच बंगल्यापर्यंत संपुर्ण … Read more

पाथर्डी : गंभीर पाणीटंचाईचे चित्र डोळ्यासमोर असताना बेसुमार पाणी उपसा

पाथर्डी : उन्हाची तीव्रता वाढत असून, गंभीर पाणीटंचाईचे चित्र डोळ्यासमोर असताना लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्‍यातील कुत्तरवाडी मध्यम प्रकल्पातून बेसुमार पाणी उपसा होत असल्यामुळे या प्रकल्पाने तळ गाठला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील टँकरसाठीचा उद्‌भव कोठे राहील, याचा अंदाज प्रशासनाने घेतलेला नाही. तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरलेला कुत्तरवाडी मध्यम प्रकल्प गेल्या पावसाळ्यात पूर्णपणे भरलेला एकमेव प्रकल्प आहे. … Read more