Ahmednagar Crime : शिंगणापूरच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ! लोखंडी गजाने डोक्यात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे रविवारी सायंकाळी भाविकांना अडथळा होईल, अशी लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने देवस्थानचा सुरक्षारक्षक संदीप आप्पासाहेब दरंदले यास लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी दरंदले यांना नगर येथील रुग्णालयात नेले असल्याची माहिती समजली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शनि दर्शनासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात ! एकाचा मृत्यू

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : श्रीरामपूर येथील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज परिसरामध्ये काल सोमवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूरकडून नेवासा रोडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने (क्रमांक … Read more

….तर ‘त्यांनी’आमची साखर घेऊ नये : खा.सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील कुटुंबियांनी सुरू केला आहे. त्या माध्यमातून सहकार चळवळ उभी राहिली. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाण्याचे काम झाले आहे. ‘आमची साखर सर्वांना गोड लागते असे नाही ज्यांना कडू लागत असेल त्यांनी साखर घेऊ नये’, अशी खोचक टीका खा. सुजय विखे यांनी केली. नगरमध्ये विविध … Read more

पारनेरच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १७ कोटींचे अनुदान ४९ गावांतील शेतकऱ्यांना फायदा

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना१६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर केले आहे. मागील वर्षी नोहेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लहान मुलांप्रमाणे काळजी घेतलेली पिकं … Read more

उत्तर प्रदेशसरकार करू शकते तर महाराष्ट्र सरकारने का करू नये : आमदार तांबे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी आग्रही विनंती आ. सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील उत्सवी वातावरण लक्षात घेता रस्त्यांवर मोठ्या संख्येने मिरवणुका निघतील. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची अडचण होऊ शकेल. नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नसे … Read more

मी कर्जत – जामखेडमधूनच विधानसभा लढणार अन् जिंकणार देखील…परंतु

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीला दक्षिण मतदार संघातून विजयी होईल असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देऊन त्याला निवडून ही आणण्याची जबाबदारी आमची आहे. तरी येत्या चार दिवसात तुम्हाला गोड बातमी कळेल. कर्जत जामखेडच्या मतदारांनी व सर्वसामान्य नागरिकांनी मला कसे लढायचे आहे ते शिकवले आहे. त्यामुळे मी पुन्हा कर्जत जामखेड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार आणि तेही … Read more

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची दिंडी २१ जानेवारीला अहमदनगरला येणार ! ‘असे’ आहे संपूर्ण नियोजन…

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे दि. २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत. २१ जानेवारी रोजी श्री. जरांगे यांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे थांबणार आहे. तदनंतर पायी दिंडीचा रात्रीचा … Read more

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणाऱ्या प्रवीण गीते, चाबुकस्वार, गुंजाळवर गुन्हा दाखल !

Kiran Kale INC

Ahmednagar City News : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील नामवंत व्यापारी, उद्योजकांना ब्लॅकमेलिंग केले, खंडणी मागितली, अवैध धंदे करणाऱ्यांकडून पाकीटं घेतले, असे म्हणत बदनामी केल्या प्रकरणी इसम नामे प्रवीण शरद गीते, रा. विखे पाटील फाउंडेशन समोर निंबळक, ता. नगर, सागर चाबुकस्वार, रा. भिंगार, सुरज गुंजाळ, रा. बोल्हेगाव यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे काळे … Read more

Ahmednagar News : शासकीय,प्रशासकीय अनास्थेचा फटका जेव्हा पालकमंत्री विखेंनाच बसतो तेव्हा.. चढाव्या लागल्या शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या

Ahmednagar News : बऱ्याचवेळा शासकीय कार्यालयांमधील दुरावस्था समोर येत असते. ही दुरावस्था दूर करण्यासाठी शासन तर कधी प्रशासकीय अनास्था अडसर ठरते. परंतु आता या अनास्थेचा फटका महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाच अहमदनगरमध्ये बसला. त्याचे झाले असे की, मंत्री विखे हे, काल रविवारी (दि. १४) संगमनेरात होते. तेथे त्यांची विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांसमवेत यशवंतराव … Read more

Ahmednagar News : दरोडेखोरांचा धुमाकूळ ! ‘या’ गावातील विजेचे रोहित्र बंद करून ६ घरांवर दरोडे

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांत चोरी, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. आता संगमनेर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी आली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वनकुटे गावात दरोडेखोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. गावची विजेचा डीपी बंद करून दरोडेखोरांनी तब्बल ६ घरे फोडत लाखोंचा ऐवज लांबवला. शनिवारी (१३ जानेवारी) मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे … Read more

Ahmednagar News : गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी हवीय? मग मुलींना सायकली वाटा.. पोलिसांच्या अनोख्या कल्पनेने अनेक गरजूंना मिळाल्या सायकल

Ahmednagar News : गौतमी पाटील व तिचा कार्यक्रम घेण्यासाठी अनेक ठिकाणी वरचढ लागलेली असते. तिच्या कार्यक्रमाला नेहमीच गर्दी होते. त्यामुळे तिचा कार्यक्रम आयोजित करण्यावर गाव पुढारीही भर देतात. परंतु तिच्या कार्यक्रमासाठी आधी पोलिसांची परवानगी हवी असते. आता अकोले तालुक्यात पोलिसांनी एक राज्याला दिशादर्शक असा प्रयोग राबवला. अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथे गौतमी पाटीलचा डान्स ठेवला, पोलिसांनी … Read more

सरकारच्या हिट अँड रन’ कायद्याला कंटाळून ट्रक चालकाची आत्महत्या पोलिसांना मात्र वेगळाच संशय

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याला देशात मोठा विरोध केला जात असतानाच या कायद्याला कंटाळून एका ट्रक चालकाने थेट आत्महत्याकेल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील ट्रक चालकाने भेंड्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मयताच्या खिशात आढळली आहे. … Read more

‘त्या’ दोघंानी नायलॉन मांजाची चक्क घरातूनच केली विक्री

Ahmednagar News

Ahmednagar News : जीवघेण्या मांजामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. यात मुले, पशु-पक्षी, वाहनधारक, पादचारी आदींच्या जीवावरही बेतते, त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र नगरमधल्या दोघांनी आपल्या घरातूनच मांजा विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. सुमित मनीष लोढा व शुभम किशोर फुलसौंदर (दोघेही रा.नगर) अशी कारवाई केलेल्यांची नावे … Read more

वडील मारतील या भीतीने ‘तो’ घरी गेलाच नाही मात्र पोलिसांनी त्याला

Ahmednagar News

Ahmednagar News : कार्तिक पंधरा दिवसांपासून शाळेत गेलाच नाही त्याने आपल्या मित्रांसोबत फिरण्यात वेळ घालवला. शाळेतून कर्तिकच्या गैरहजेरीबाबत त्याच्या घरी कळवण्यात आले. ही बाब कार्तिकला समजल्याने आता आपल्याला वडील मारतील? या भीतीने घरी न जाता आई काम करत असलेल्या एका हॉस्पिटल येथून थेट नगरच्या रेल्वे स्थानकावरून बिहार रेल्वेने कोपरगावपर्यंत गेला. गाडीत बिहारी नागरिक मारतील या … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा २४ तासाच्या आत जेरबंद

Ahmednagar News : बिहार येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी बस स्थानकावर तो कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद केले. रोजाउद्दीन शाई हल्ली (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, मुळ रा. मोतीराजपुर, राज्य बिहार) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर तु इथे पळुन आली असुन मी तुला रहायला जागा … Read more

कर्जबाजारीपणास कंटाळून सुशिक्षीत युवकाची गळफास घेवून आत्महत्या

Ahmednagar News : सध्या अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरी मिळाली नाही, म्हणून शेती करतात मात्र शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल असे उत्पन्न मिळत नाही, यामुळे कर्जबाजारी वाढत जातो त्यामुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत आहेत, यातच ते आपली जीवनयात्रा संपवत आहेत. अशीच घटना जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे घडली आहे. येथील बेरोजगार युवकाची व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवन … Read more

Ahmednagar News : पदयात्रेत २५ लाख मराठे, नगरमध्ये ‘येथे’ असणार व्यवस्था ! पाच किलोमीटरवर पोलीस, पाणी, भोजन, पेट्रोपम्प, रुग्णवाहिका.. ‘अशी’ असणार विराट सुविधा

महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मागे आंदोलने होऊनही आरक्षण विषय मार्गी अद्यापही लागलेला नाही. यासाठी आता मराठा समाज पुन्हा आक्रमक होत मुंबई पर्यंत पदयात्रा काढणार आहे. तेथे मराठा समाज आंदोलनास बसणार आहे. दरम्यान या पदयात्रेचे आयोजन सध्या सुरू असून प्रशासकीय पातळीवरही याचे नियोजन सुरु आहे. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी प्रशासकीय … Read more

Ahmednagar News : शवविच्छेदन केल्याने मृत्यूचे गूढ खरोखर उलगडते का? शवविच्छेदनाचा निर्णय कोण घेतो? पोस्टमार्टमसाठी कुणाची परवानगी आवश्यक असते? जाणून घ्या सर्व..

postmortem

Ahmednagar News : शवविच्छेदन अर्थात पोस्टमार्टम हा शब्द आपण बऱ्याचवेळा ऐकतो. परंतु याबाबत आपल्या मनात अनेक शंका असतात, अनेक प्रश्न असतात. शवविच्छेदन केल्याने मृत्यूचे गूढ खरोखर उलगडते का? शवविच्छेदनाचा निर्णय कोण घेतो? पोस्टमार्टमसाठी कुणाची परवानगी आवश्यक असते? आदी प्रश्न अनेकांना पडलेले असतात. खून, अपघाती मृत्यू अथवा नैसर्गिक मृत्यू झालेल्या कोणत्याही व्यक्तीचे शवविच्छेदन केले जाऊ शकते. … Read more