….तर ‘त्यांनी’आमची साखर घेऊ नये : खा.सुजय विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : देशातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील कुटुंबियांनी सुरू केला आहे. त्या माध्यमातून सहकार चळवळ उभी राहिली. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाण्याचे काम झाले आहे.

‘आमची साखर सर्वांना गोड लागते असे नाही ज्यांना कडू लागत असेल त्यांनी साखर घेऊ नये’, अशी खोचक टीका खा. सुजय विखे यांनी केली.

नगरमध्ये विविध विकास कामांचे उदघाटन व साखर वाटप प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षापासून विखे कुटुंबिया सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करत आहे. पाच वर्षांमध्ये खासदारकीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे मार्गी लावल्या आहेत

नगरकरांचे अनेक वर्षाचे उड्डाणपुलाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे, याचबरोबर शहरालगत बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी लावल्यामुळे शहर विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे, प्रभाग क्रमांक ४ मध्ये विविध विकास कामासाठी दोन कोटी १८ लाख रुपये निधी मंजूर झाला असून, ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लागले जातील.

यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी नगरसेवक रामदास आंधळे, माजी नगरसेविका शोभा बोरकर, संगीता खरमाळे, अमोल गाडे, अजिंक्य बोरकर, काजोल गुरु, ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब गायकवाड, नितीन शेलार, बाबासाहेब सानप, राजू मंगलाराम, अनिल ढवण, संपत नलावडे, अमित गटणे आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली आहे. शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे, देशांमध्ये वयोश्री योजना यशस्वीपणे राबवणारे डॉ. सुजय विखे पाटील हे एकमेव खासदार ठरले आहेत असे ते म्हणाले.