अजूनही अनेक शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनाम्यांचा फार्स झाला; पण अजूनही अनेक शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. येत्या ६ तारखेपर्यंत त्यांना पैसे द्या; अन्यथा ७ तारखेला रस्त्यावर उतरू, असा इशारा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी एका निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे. शुक्रवारी (दि. १) रोजी प्रमोद लबडे यांनी तहसीलदार यांच्या दालनात जाऊन प्रांताधिकारी माणिकराव … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील त्या आरोपीविरोधात सावकारकीची तक्रार

Ahmednagar News

Ahmednagar News : तरुण शेतकऱ्याला विष पाजल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींविरुद्ध टाकळीमियाँ येथील व्यावसायिक दादासाहेब सुरेश तुपे यांनी सहाय्यक निबंधकांकडे अवैध सावकारकी केल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले, की सावकारांनी मला पाच हजार रुपये २० टक्के व्याजाप्रमाणे दिले होते. प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मी व्याज देत होतो; परंतु व्याज देण्यास विलंब झाल्यास … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या उसाला जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव !

Ahmednagar News

Ahmednagar News :  साखर उद्योगातील राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओंकार या ग्रुपच्या माध्यमातून सुरू होणारा हिरडगाव येथील गौरी शुगर शेतकऱ्यांच्या उसाला जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव देऊन, जिल्ह्यात आग्रेसर राहणार असल्याची घोषणा ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी हिरडगाव येथे बोलताना केली. हिरडगाव येथील गौरी शुगरच्या रोलर पुजनचे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी ओंकार ग्रुपचे अध्यक्ष … Read more

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करा !

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनाने शेवगाव पाथर्डी तालुक्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा मंगळवार दि. ५ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे तूर, बाजरी, कपाशी पीक सस्नेह भेट आंदोलन करण्यात येईल. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केले. यावेळी काकडे म्हणाल्या की, शेवगाव-पाथर्डी तालुक्यात हलक्या प्रतीच्या जमिनी आहेत. त्यामुळे पावसाने मोठी ओढ दिल्याने पावसाअभावी पिके … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सहा वर्षांपासून फरारी महिलेला पुण्यात अटक !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणात गेली सहा वर्षे फरारी असलेल्या आरोपी महिलेला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीआयडी) पुण्यात अटक केली. ती पुण्यातील एका खासगी कंपनीत गेली सहा वर्षे काम करत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत १२ फेब्रुवारी २०१७ महिला उमेदवाराने आयोजित केलेल्या पार्टीत दारू पिल्याने नऊजणांचे बळी … Read more

मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे यावर्षीचा दहीहंडी उत्सव रद्द

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी संपूर्ण मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे यावर्षीचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघाकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती आहे. … Read more

Ahmednagar Breaking : वाळूतस्करांकडून तलाठ्याला मारहाण; महसूल कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : महसूल पथकाने जप्त केलेली वाळू चोरून भरत असताना अचानकपणे तलाठी आणि महसूलचे पथक गेल्याने कारवाई करणाऱ्या महसूलच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झाले असून या तस्करांनी वाळू ढंपरही मारहाण करून पळवून नेला. तालुक्यातील भेर्डापूर येथे बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ … Read more

Ahmednagar Crime : झाड तोडले म्हणून महिलेस सासु, दिर व पुतण्याने केली मारहाण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : घरासमोरील सुबाभळ तोडली म्हणून सासु, दिर व पुतण्याने अलका शेलार यांना मारहाण करून जखमी केल्याची घटना दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडलीय. याबाबत तिघा जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी सांगितले, की अलका विलास शेलार (वय ४३ वर्षे) या राहुरी तालुक्यातील मानोरी येथे राहत … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे नुकसान करणार नाही ! के. के. रेंजचा प्रश्न सोडवू – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Ahmednagar News

Ahmednagar News : लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे. फायरींग रेंजसाठी जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. ही बाब महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे नुकसान न करता के. के. रेंजचा प्रश्न सोडवू असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात हमरीतुमरी !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार खुर्द येथे विशेष ग्रामसभेत इतर विषयांवर सविस्तर चर्चा होऊन त्यावर सर्व संमतीने निर्णय घेत खेळीमेळीत ग्रामसभा चालू असताना ग्रामसेविकांनी एक माहिती अधिकाराचा अर्ज ग्रामसभेत वाचून दाखविला. त्यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात हमरीतुमरी व तु-तु मै मै झाल्याने ग्रामसभेत गोंधळाची परंपरा कायम राहून सभा वादळी ठरली. कोल्हार खुर्दची विशेष ग्रामसभा … Read more

Ahmednagar News : बाजार समिती शेतकऱ्यांच्या खिशावर रोज सहा ते सात हजारांचा डल्ला मारणार आहे का ?

Ahmednagar News

Ahmednagar News : कृषी उत्पन्न बाजार समितीने आजपासून शेतमाल घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाहनावर रुपये दहा असा प्रवेशकर आकारण्याचा निर्णय घेतला. याला मी झिझिया कर असे मानतो, तेंव्हा तात्काळ आपला प्रवेश कराचा निर्णय मागे घ्यावा. तसेच मोकळे आणलेले धान्य, कांदे यांची तोलाई हमाली तात्काळ रद्द व्हावी, मागणीसाठी सोमवारी (दि.४) सकाळी दहा ते बारा या वेळेत आपण … Read more

Ahmednagar News : नुकसानग्रस्त झालेल्या फक्त १० हजार शेतकऱ्यांना मदत !

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील २३ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १० हजार शेतकऱ्यांना मदत मिळाली असून अद्यापही १३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आठ दिवसांत या शेतकऱ्याला मदत देण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात आढळला अज्ञात व्यक्तींचा मृतदेह

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : अशोकनगर कारखाना समोरील परिसरातील कालव्या मधील वाहत्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत नुकताच आढळुन आला. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी पोलीस पाटील चंद्रकला यशवंत गायधने यांना घटनेची माहिती दिली. त्यावरून संजय बाजीराव गायधने यांनी शहर पोलीस स्टेशनला याबाबत खबर दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो. कॉ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दीड लाखाची लाच मागितल्या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पोकलेनवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करत तडजोड़ी नंतर दीड लाख रुपये लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर टप्प्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी पेडगाव येथील महसूल कर्मचारी (तलाठी) आकाश नारायण काशीकेदार याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः तक्रारदार यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले पोकलेन मशिन पेडगाव येथील … Read more

Ahmednagar News : जोमात आलेली पिके पावसाअभावी सुकून जाऊ लागल्याने शेतकरी हतबल

Ahmednagar News

Ahmednagar News : खरीप पिके पावसाअभावी वाया जातात की काय, या चिंतेत शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.शेवगाव तालुक्‍यातील पूर्व भागासह संपूर्ण तालुक्‍यात खरीप हंगामातील शेतकऱ्यांचं पांढरं सोनं व नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, खरीपातील इतर पिकांकडे मात्र शेतकर्‍यांनी कानाडोळा केला असून, त्याची अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. अगोदरच आर्थिक … Read more

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरच अहमदनगरमध्ये येणार !

Sharad Pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात झालेल्या फुटीनंतर राज्याचा दौरा सुरु केला असून लवकरच शरद पवार यांची नगर जिल्ह्यात सभा होणार आहे. तसे संकेत त्यांनी मुंबईतील बैठकीनंतर दिले आहेत. तसेच नगर जिल्ह्यात चिंता नसावी, असेही ते म्हणाल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी … Read more

Ahmednagar News : सावधान ! अहमदनगर जिल्ह्यात चार ठिकाणी मोटारसायकलची चोरी

Ahmednagar News

चार ठिकाणी ‘मोटारसायकलची चोरी झाली. अरबाज जाफर शेख यांची १५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल गेवराई रोड, हॉटेल साईबन येथून चोरीस गेली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली. शेवगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. मच्छिंद्र पुंजारी वाघस्कर यांची १५ हजार रुपये किंमतीची मोपेड (क्र. एमएच १६, बीई ४५५३) बेलेश्वर मंदिराजवळून चोरीस गेली. ही घटना … Read more

Ahmednagar News : छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या ! पती व सासूला झाली अशी शिक्षा, घडली जन्माची अद्दल….

Ahmednagar News

Ahmednagar News : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. राजकुमार रामदास भगत व सरुबाई उर्फ सरस्वती रामदास भगत (दोघे रा. ढोकराई,ता.श्रीगोंदा) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. २) मुजीब एस. शेख यांनी या खटल्याचा निकाल दिला. वेगवेगळ्या कलमान्वये आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली … Read more