जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी निधी कमी पडू देणार नाही, उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  नगर जिह्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. पांढरीचा पूल, नेवासा एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. घोडेगाव ते सोनई या आठ किलोमीटरच्या रस्तेकामाचे भूमिपूजन सुभाष देसाई यांच्या हस्ते व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत पार … Read more

चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यातच अनेक अपघात बेशिस्त वाहन चालवल्यामुळे तर काही अपघात खड्ड्यांमुळे होतात. असाच एक अपघात संगमनेर तालुक्यात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात ट्रॅव्हलचा क्लिनर आणि ट्रॅव्हलमधून प्रवास करणारे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. … Read more

एकाला मारहाण करत सोन्याची चैन, अंगठी हिसकावून घेतली; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  रस्त्यात टाकलेली लाकडे बाजूला करणार्‍यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील राजापूर मध्ये घडला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संभाजी माधव हासे (वय 52, राहणार राजापुर, ता. संगमनेर ) हे मंगळापूर शिवारातून रात्रीच्या सुमारास … Read more

संगमनेर तालुक्यात बालविवाह रोखला. आई – वडिलांकडून घेतला’ हा’ लेखी जबाब!

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले. आई – वडिलांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेत मुलीचा विवाह १८ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला. कौठेकमळेश्वर येथे होणारा बालविवाह रोखण्यात यश आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी … Read more

कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य घटकांना दिलासा मिळावा म्हणून कोरोणाचे सर्व नियम पाळून कोपरगाव बाजार समितीत येत्या सोमवारपासुन (६ सप्टेबर) जनावरांचा व शेळी मेंढी बाजार पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यांत 700 पेक्षा अधिक कुटुंबांना बसला पावसाचा फटका

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत शेतकऱ्यांना बसला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार या तीन तालुक्यांत 700 पेक्षा अधिक कुटुंबांना या पावसाचा फटका बसला असून, 300 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू झाले आहेत. तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाने … Read more

काम वेळेत पूर्ण न झाल्यास पाइपलाइन उखडू !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे जनतेचे सरकार आहे. या सरकारने आत्तापर्यत कधीही निळवंडे धरण व कालव्यांच्या कामांना निधी कमी पडू दिला नाही. आता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय कॅनालच्या कामात संगमनेरची पाइपलाईन हलवून जलसेतूचे उर्वरीत दोन कॅालम एका महिन्यात पूर्ण करावेत. नंतर आंदोलक स्वतः पाइपलाइन उखडून फेकतील. कॅनालचे काम पूर्ण … Read more

वाईन शॉपला जिल्हा दारुबंदी आंदोलनाचा विरोध

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील वाईन शॉपचे स्थलांतर शहरातील शिक्षण संस्था, मंदिर-मस्जिद व पोलिस लाईनजवळ होत आहे. या शॉपला येथे परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हा दारुबंदी आंदोलनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. अकोले रोडच्या सावतामाळी नगरमध्ये तालुक्यातील घारगाव येथील वाईन शॉपीचे स्थलांतर होत आहे. या … Read more

चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर मधील वार्ड नं २ रोशनबी जावेद कच्छी यांचे राहते घराची खिडकीची कडी तोडून खिडकीतुन आत प्रवेश करुन १ लाख ६८ हजार रुपये रोख, मोबाईल व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता. या घटनेतील दोन चोरांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. २९ ऑगस्ट रोजी रात्री वार्ड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची उचलबांगडी !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- नेवासा पोलिस स्टेशनच्या तथाकथित गैरव्यवहाराच्या ऑडिओ क्लिपचे पडसाद म्हणून पोलिस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच हेड कॉन्स्टेबल व पाच पोलिस कर्मचाऱ्यांची एकाच महिन्यात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या बदल्या प्रशासकीय पद्धतीने केल्याचे स्पष्ट केले आहे. नेवासा पोलिसांच्या दोन ऑडिओ … Read more

वृद्ध महिलेचे धुमस्टाइल गंठण लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील गणेशनगर येथे राहणाऱ्या शकुंतला ज्ञानदेव पालवे (६५) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७ तोळ्याचे दीड लाखांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी धूमस्टाईल लांबवले. ही घटना गुरुवारी अकोले बायपासच्या स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ घडली. पालवे यांच्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात चोरट्यांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलिस … Read more

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- नेवासे पंचायत समितीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पंचायत समितीत जाऊन बचत गटाच्या समन्वयकांना जाब विचारला. गेले दोन दिवस बचत गटाची लाभार्थी आणि पंचायत समिती अधिकारी यांची प्रत्येकी एक हजार रुपये मागितल्या प्रमाणे द्यावे, अशा अर्थाची ऑडिओ क्लिप … Read more

संगमनेरच्या रस्त्यांसाठी १७ कोटींचा निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. त्यांच्या माध्यमातून विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी १६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. ते म्हणाले, तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असून कोरोनातही मंत्री … Read more

आयशर ट्रक पलटी , ट्रक आणि ट्रकमधील मालाचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात बुधवारी (दि.१) पहाटे तीन वाजण्याच्या टायर फुटल्यामुळे मल्चिंग पेपर घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अपघातात ट्रक आणि ट्रकमधील मालाचे नुकसान झाले. नाशिक येथून साताऱ्याला मल्चिंग पेपर घेवून जात असलेला आयशर ट्रक (एम.एच. ४३ यु.८१५९) संगमनेर तालुक्यातील घारगाव … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! बापानेच केला दहा महिन्याच्या मुलाचा खुन

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-उसने घेतलेले अडीच लाख रुपये बुडवण्यासाठी वडिलांनीच दहा वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यातील श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. येथील एमआयडीसी मधील खंडाळा शिवारात प्लॅट नंबर बी. चार / दोनच्या उत्तरेकडील मोकळे जागेत आज (गुरुवारी) पहाटे चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. येथील शहर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ डॉक्टर पतीविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पतीच्या छळाला कंटाळून डॉ. पूनम योगेश निघुते यांनी रविवारी ताजणे मळा येथे आत्महत्या केली. या संदर्भात शहर पोलिसांनी डॉ. योगेश निघुतेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. डॉ. पूनम निघुते यांच्या आत्महत्येचा संशय आल्याने माहेरच्या लोकांनी शवविच्छेदन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात केले. गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नऊ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरा त एम आय डी सी मध्ये श्री इंपेक्स फर्निचर गोडाऊन च्या शेजारी मोकळ्या जागेत वास्तव्यास असलेले व मेंढपाळ म्हणून मजुरीचे काम करणारे श्रावण अहिरे मूळ रहिवासी हिरानगर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या नऊ महिन्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाच्या गळ्यावर … Read more

दिव्यांगांना साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिराचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- दिव्यांग बंधु-भगिनींना आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व दिव्यांग असल्यामुळे त्यांचे जीवन काहीसे परावलंबी असते. त्यामुळे या दिव्यांग बंधू भगिनींना आयुष्यात स्वावलंबी करण्याच्या उद्देशातून काही कृत्रिम वस्तूंची नितांत आवश्यकता असते. त्याकरीता कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना आवश्यक वस्तू वाटप नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले असून या … Read more