Ahmednagar Breaking : दुचाकीस्वाराला आयशर टेम्पोने चिरडले ! चाक छातीवरून गेल्याने जागीच मृत्यू…

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चंदनापूरी जवळील आनंदवाडी परिसरात घडली. संदीप मारुती जाधव (वय ३३, रा. वरूडी पठार, ता. संगमनेर), असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. संदीप जाधव हा मंगळवारी सकाळी आपल्या (एम.एच. १७ आर २३०७) क्रमांकाच्या … Read more

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळेना ! शेतकऱ्यांत असंतोष

Ahmednagar News

Ahmednagar News : पावसाने दडी मारल्याने आसमानी संकट आल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीकडून पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, तर दुसरीकडे पाटबंधारे विभाग चाऱ्या सोडत नाही. त्यामुळे या सुलतानी संकटाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून लोकप्रतिनिधी काय करतात. याकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे. कोपरगाव तालुक्यातील सर्वच भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान … Read more

निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई करु नये, अन्यथा पुन्हा धरणावर जावून…

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले निळवंडे डाव्या कालव्याचे काम करताना झालेला हलगर्जीपणा पहिल्या पाणी सोडण्याच्या चाचणीत उघड झाला आहे. त्यावेळी तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे आणि पिकांचे झालेले नुकसान विचारात घेता, अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येवून निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई करु नये, अन्यथा पुन्हा धरणावर जावून आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या व अगस्ती … Read more

बिबट्यांची दहशत ! बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने घराबाहेर पडणे मुश्किल

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोहळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून येथील जनजीवन घबराटीचे झालेले आहे.पाळीव कुत्रे, शेळ्या, कोंबड्या यावर रात्री अपरात्री बिबट्या ताव मारीत असल्याने घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे राज्याचे वनमंत्री यांनी येथील बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी तातडीने आवश्यकता उपाययोजना करून पिंजरा लावून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी … Read more

अहमदनगरमधून निवडणुकीची तयारी केलेल्या नेत्याने सोडली उद्धव ठाकरे यांची साथ ! म्हणाले जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत…

Babanrao Gholap News :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले नाशिकचे सेना नेते बबनराव घोलप यांनी त्यांच्या उपनेत्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पाठवला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला यामुळे उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार … Read more

Ahmednagar News : कोणावरही येऊ नये अशी वेळ ! धरण जवळ असूनही भर पावसाळ्यात गावाला नाही पाणी…

अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोटातील लव्हाळवाडी गाव भर पावसाळ्यात तहानलेले असून उशाला धरणाचे पाणी असुनही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेण्याची वेळ आली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात लव्हाळवाडी ही ठाकर समाजाची वाडी आहे. शिंगणवाडी व लव्हाळवाडी अशी गृप ग्रामपंचायत या वाड्यांसाठी आहे. मुळातच या ग्रामपंचायतवर गेल्या दशकभरापासून प्रशासक आहे. याची कल्पना गावकऱ्यांनासुद्धा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हे खासदार रस्त्याच्या उद्घाटनाला गावात येऊन गुपचूप उद्घाटन करून निघून जातात

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी मतदार संघाचे खासदार काल शुक्रवारी कोल्हार खुर्द येथे एका रस्त्याच्या उद्घाटनाला आले परंतु कुणालाही उदघाटनाची माहिती न देता उद्घाटन करून गेले त्यामुळे गावात व परिसरात चर्चेला उधाण आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील कोल्हार खुर्द येथे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी सात्रळ, तांदुळनेर, कोल्हार खुर्द या रस्त्यासाठी निधी … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Ahmednagar News

Ahmednagar News : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत क्लर्क पदाची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील चार जणांची २२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की कीर्ती सतिषकुमार भालेराव (रा. कामराजनगर, घाटकोपर, मुंबई), शिवदर्शन नेताजी चव्हाण व विश्वजित विकास चव्हाण (दोघे … Read more

Ahmednagar News : दुध भेसळ जर कोणी करत असेल तर थेट पोलिसांना माहिती द्या…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात दूध भेसळ करण्याचे प्रमाण वाढत असून अशा भेसळखोरांवर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. दुध भेसळ जर कोणी करत असेल तर थेट पोलिस अधिक्षक तसेच मला माहिती द्या. या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी. जी.शेखर पाटील यांनी दिला आहे. गणेशोत्सव आणि … Read more

अ‍ॅम्ब्युलन्स व्यवहारात फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील श्रीहरी पाटील यांची अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन व्यवहार पूर्ण न करता अधिक रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या आळेफाटा येथील राहुल हंडे यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. मोरे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना दिले आहेत. या खटल्याबाबत सविस्तर माहिती अशी, की पाटील यांनी त्यांच्या स्वमालकीची कार्डिअॅक अ‍ॅम्ब्युलन्स … Read more

Bhandardara News : भंडारदरा पाणलोट क्षेत्राला पावसाने झोडपून काढले

Bhandardara News

Bhandardara News : अकोले तालुक्यातील घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळत असून गत २४ तासांत साडेसात इंच पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी तर भंडारदरा पाणलोट क्षेत्राला पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात बुधवारी सायंकाळपासून पाऊस सुरु झाला. गुरुवारी व शुक्रवारी पाणलोटासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. गत आठ ते दहा दिवस भंडारदरा पाणलोटात पावसाने … Read more

Ahmednagar Crime :अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास जमावाकडून बेदम चोप ! पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास जमावाने बेदम चोप देवुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले असून तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस सदर मुले हे सतत त्रास देत होते. दोन दिवसांपूर्वी आरोपीने … Read more

भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये चिलापीमुळे गावराण माशांची पैदास थांबली, मच्छिमारी व्यवसाय अडचणीत

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये वाढत असलेल्या चिलापी माशांमुळे इतर माशांवर गंडातर आले असून गावरान माशांना भंडारदरा धरण मुकले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या मच्छिमारी व्यवसायाला खिळ बसली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये पांढरा, कोंबडा, फिनिश, वाम, मरळ, ओंबळी, अशा प्रकारचे गावरान मासे मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र चार-पाच वर्षापूर्वी कुणीतरी अज्ञात … Read more

Sangamner News : १५ लाखांच्या दागिन्यांची चोरी ! ‘त्या’ चोरट्याविरुद्ध गुन्हा

Sangamner News

Sangamner News : संगमनेर मध्ये अज्ञात चोरट्याने येथील हृदयरोग तज्ञ डॉ. गिरीश सावंत यांच्या घरात प्रवेश करून कपाटाच्या लॉकर मधुन १५ लाख ७८ हजाराचे वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील नवीननगर रोड परिसरातील ताजने मळा … Read more

आमदार काय करू शकतो हे जनतेने माझ्या कामातून पाहिले : आ. काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : दुर्दैवाने ४० वर्षात मतदार संघात अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिले. त्यामुळे सत्ताधारी आमदार काय करू शकतो, हे आपण अवघ्या अडीच वर्षांत करून दाखविल्याचे मतदारसंघातील जनतेने पाहिले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. काल गुरुवारी वारी येथील २९ कोटी निधीतील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शंकरराव कोकाटे अध्यक्षस्थानी … Read more

Shirdi News : शिर्डीच्या अर्थकारणाला मिळणार गती ! रोजगार निर्मितीसह धार्मिक पर्यटनाला चालना

Shirdi News

Shirdi News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाच्या एका वर्षाच्या काळातच शिडीं शहराच्या आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याने आगामी काळात रोजगार निर्मितीसह धार्मिक पर्यटनाला मोठी गती येवून शिर्डीसह नगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या पत्रकात कोते यांनी म्हटले आहे की, अंतरराष्ट्रीय … Read more

Ahmednagar Politics : लोकनियुक्त महिला सरपंच सदस्य अपात्र ! तालुक्यात एकच खळबळ

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अकोले तालुक्यातील राजुरच्या लोकनियुक्त सरपंच महिला पुष्पा दत्तात्रय निगळे व सदस्य ओंकार नवाळी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याने त्यांचे सरपंच व सदस्य पद धोक्यात आले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हा निकाल आ. किरण लहामटे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील वर्षी राजुर … Read more

Ahmednagar News : रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरत नातेवाईकांनी केली हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : सावेडीतील डौले हॉस्पिटल शेजारील हार्टबीट हॉस्पटलच्या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरत नातेवाईकांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ६) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी डॉक्टर चंद्रकांत साहेबराव कदम यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत फिर्यादीनुसार पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, … Read more