अहमदनगरमधून निवडणुकीची तयारी केलेल्या नेत्याने सोडली उद्धव ठाकरे यांची साथ ! म्हणाले जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Babanrao Gholap News :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले नाशिकचे सेना नेते बबनराव घोलप यांनी त्यांच्या उपनेत्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पाठवला आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला यामुळे उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते.शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मातोश्री येथे जाऊन पक्षप्रवेश केल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वाकचौरे यांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.

बबनराव घोलप नाराज !

अचानकपणे शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने तसेच भाऊसाहेब वाकचौरे यांनाच लोकसभेचं तिकीट जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज आहेत.शिवसेना ठाकरे गट शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर घोलप पुढे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण

शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घोलप गेले दहा वर्षे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना उद्धव ठाकरे उमेदवारी देतील अशी शक्यता होती. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. तो घोलप यांना मोठा धक्का मानला जात होता.

कोण आहेत बबनराव घोलप ?

बबनराव घोलप शिवसेनेचे हे ज्येष्ठ नेते असून १९९५ मध्ये शिवसेना व भाजप युतीची सत्ता आली तेव्हा ते कॅबिनेट व जिल्ह्याचे पालकमंत्री होते. २५ वर्ष ते देवळाली मतदारसंघाचे आमदार होते शिर्डी लोकसभा मतदार संघात त्यांचा दांडगा संपर्क आहे. शिर्डी मतदारसंघात लोकसभेची मोर्चेबांधणी करत असलेल्या बबनराव घोलपांनी त्यांच्या देवळाली या विधानसभा मतदारसंघात ३० वर्ष एकहाती वर्चस्व ठेवलं होत.

जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत – बबनराव घोलप

गेल्या अनेक वर्षांपासून देवळाली विधानसभा मतदारसंघात व शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी काम करत आहे. “मी माझ्या उपनेते पदाचा राजीनामा देतोय. अमरावती किंवा शिर्डी मला विचारले होते मी शिर्डी सांगितले होते. मी 8 महिने काम केले, 30 शाखांचं उद्घाटन केले.

भाऊसाहेब वाकचौरे, जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत, असं मला कळताच मी उद्धव साहेबांना विचारले होते. भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवार करायचे होते तर मला शब्द का दिला होता? माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा मी उद्धव ठाकरेंना व्हॅट्सअॅप केला आहे – बबनराव घोलप