जरांगे पाटलांनी अहमदनगरचेही मैदान गाजवले ! जाहीर सभेत भुजबळांसह राज ठाकरेंचाही खरपूस समाचार

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला असून विविध आंदोलने सुरु आहेत. मुंबई मोर्चा सफल झाल्यानंतर आता जे अध्यादेश निघाले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान त्या आधी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरे केले. काल (९ फेब्रुवारी) अहमदनगरमधील श्रीगोंद्यात त्यांची जाहीर सभा होती. या सभेत त्यांनी … Read more

शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांशी गद्दारी करणार नाही : जरांगे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण व्हावे म्हणून कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, म्हणून आज पासून उपोषण सुरू करणार आहे. मरेपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार असून शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. असे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना सांगितले. लाखो मराठ्यांच्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू दिसण्यासाठी टोकाची लढाई होणार असल्याने मराठ्यांनी या … Read more

मुंबईचा सोन्याचा व्यापारी नगर जिल्ह्यातुन झाला बेपत्ता…!

Ahmednagar News

Ahmednagar News : मूळ राहणार मुंबई येथील मात्र कामासाठी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आलेले सोन्याचे व्यापारी दिपेश जैन हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सोन्याचे व्यापारी दिपेश जैन गेल्या अनेक वर्षापासुन पाथर्डीत येत होते. येथील दुकानदारांना सोने देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन ते मुंबईला जात असत. याच कामासाठी ते आले होते. … Read more

लोकांचा तळतळाट घेऊ नका तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा ते फेडावं लागेल..?

Ahmednagar News

Ahmednagar News : जीवन प्राधिकरणच्या एकाच अधिकाऱ्याकडे शेकडो पाणी योजनांची कोट्यवधींची त्यांची कामे चालू आहेत. नेमकी काम कसे व कोण करते. सर्वत्र समजून उमजून गैरप्रकार . मात्र बोलत कुणीच नाही. तू मारल्यासारखे कर, मी रडल्याचे नाटक करतो. जेवायला बसताना तांबेभर पाणी अगोदर मांडी जवळ घेऊन बसावे लागते. पाणीच नाही अशा अवस्था तालुक्यातील अनेक गावांची होत … Read more

Ahmednagar Politics : घुले राजळेंना फाईट देणारच? हळदी-कुंकवाच्या माध्यमातून थेट राजळेंच्या बालेकिल्ल्यात चाचपणी

लोकसभा आधी असली तरी अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचीच तयारी जोरदार सुरु आहे. जागा कमी अन इच्छुक जास्त अशी स्थिती सध्या आहे. काही मातब्बरांनी तर पक्षाचा विचार न करता आम्हीच पक्ष असे समजून कामाला लागा असे आदेशही दिलेत. त्यामुळे आता काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळतील का? अशी चर्चा मात्र रंगली आहे. त्यात आता शेवगाव मतदार संघाचा … Read more

जरांगे पाटील यांच्या सभेची श्रीगोंद्यात जोरदार तयारी

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि. ९) औटेवाडी, श्रीगोंदा येथे जाहीर सभा होणार असून, या सभेची सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रात ठीकठिकाणी जाहीर सभा घेऊन आरक्षणाविषयी मराठा … Read more

जनतेच्या संघर्षामुळे निळवंडेच्या उजव्या कालव्याला पाणी- आ.तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे राहुरी तालुक्यात पोहोचले. त्याबद्दल ठिकठिकाणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांचे औक्षण करण्यात येऊन गुलाल उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. लोकांनी केलेला संघर्ष व अनेकांचे योगदान आज फळाला आले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. निळवंडे धरणाचे पाणी अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राहुरी तालुक्यात दाखल झाले. याबद्दल आमदार तनपुरे यांचा … Read more

Ahmednagar News : चोरीच्या दुचाकीची सैन्यदल परिसरात विकायचा, मिलेट्री इन्टेलिजेन्सने नगरमध्ये केली मोठी कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये सैन्यदल परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला दक्षिण कमान मिलेट्री इंटेलिजेन्स, पुणे व कोतवाली पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले. दिलीप दत्तात्रय शिंदे (रा. गोंधळे मळा, नागरदेवळे ता. नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. शिंदे याने सदरची दुचाकी शनिवारी (दि. ३) येथील क्लोरा ब्रुस … Read more

पूर्ण वेळ तहसीलदार नसल्यामुळे शेकडो प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षापासून संजय गांधी योजनेची समितीच अस्तित्वात नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नाही, चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदारांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्याने नियुक्ती तर सोडाच, दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पद्भार सोपवल्याने संजय गांधी विभागातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. दाखल प्रकरणांचा अचूक आकडासुद्धा कुणाला सांगता येत नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे संजय गांधी योजनेची समितीच दोन वर्षांपासून … Read more

Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे ५ आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारीच्या धाकावर लुटणारे पाच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ५० हजारांची रक्कम जप्त केली. सत्यवान दादा जाधव, गौरव महादेव नाळे,शुभम सुदाम क्षिरसागर (तिन्ही रा.अजनुज, ता.श्रीगोंदा), अरबाज बशीर सय्यद, सलीम शब्बीर बेग (दोन्ही रा.आनंदवाडी, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. अधिक माहिती … Read more

वाढदिवसाच्या दिवशीच रेल्वे गाडीच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दौंड रेल्वे मार्गावर अकोळनेर (ता. नगर) गावच्या शिवारात रेल्वे गाडीच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे घडली. देविदास भानुदास मेहेत्रे (रा. जाधववाडी, अकोळनेर, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत देविदास हा टैंकर चालक होता, तो अविवाहित होता. त्याचा सोमवारी (दि.५) वाढदिवस होता. रात्री त्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी ?

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होणार आहेत. यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. खरे तर आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अधिक रंगतदार बनण्याची शक्यता आहे. याचे कारणही तसे खासच आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा अजब कारभार ! फिर्यादीला चक्क आठ तास ठेवले ताटकळत

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शनिवारी (दि.३) भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदार यांना तब्बल तास बसवून ठेवले. याबाबत तक्रारदार यांचे जावई गोरक्षनाथ कोहोक यांनी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथील मारुती वस्तीत चोरट्याने भरदिवसा रामनाथ ढेसले … Read more

Nilwande Water : दोन दिवसांत बोगद्यातून निळवंडेचे पाणी राहुरी तालुक्यात येणार ! २१ गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडेतून राहुरी तालुक्यात उजव्या कालव्याद्वारे बोगद्यातून दोन दिवसांत पाणी राहुरी तालुक्यात येणार असून यामुळे तालुक्यातील लाभधारक २१ गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सुमारे ५३ वर्षांनंतर निळवंडे धरणातून कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा जलपूजनाचा कार्यक्रम कानडगाव येथे गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या … Read more

Ahmednagar News : कल्याण ते विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती काही संपेना

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती संपता संपत नसून, चांदबिबी महालापासून स्टेट बँक चौकापर्यंत वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून टाकळी फाटा ते नगरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम झाले. मात्र, तिसगावजवळील निंबोडी फाट्यापासून देवराईपर्यंतचा रस्ता बऱ्याच अंशी खराब झाला असून, त्याचा निधी प्रलंबित आहे … Read more

अहमदनगर हादरले ! पोलीस व होमगार्डने महिलेवर चोर असल्याचा आरोप करत पैसे उकळले, नंतर पोलिसाने अत्याचार केला..

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजाच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते. परंतु जेव्हा कुंपणच शेत खाऊ लागत तेव्हा भयंकर स्थिती निर्माण होते. अशीही काहीशी घटना घडली आहे. जामखेडच्या महिलेवर पोलीस व होमगार्डने चोर असल्याचा आरोप करत पैसे उकळले. नंतर पोलिसाने महिलेवर अत्याचार केलाय. ही घटना आष्टावाडी (ता. भूम) येथे घडली. हा प्रकार शुक्रवारी (२ फेब्रुवारी) दुपारी घडला. पोलिस … Read more

Ahmednagar News : अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद ! काही भागात चिमुकल्यांचाही गेलाय बळी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. लोणी परिसरात तर बिबट्याने दोन जणांचा जीव घेतला. त्यामुळे या पट्ट्यात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे. सायंकाळी सहा नंतर एकट्याने बाहेर फिरणेही जिकरीचे होऊन बसलेले आहे. दम्यान नुकतेच देवळाली बंगला शिवारात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत होते. येथील नागरिकांसह शेतकऱ्यांत चांगलीच दहशत पसरलेली होती. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच विक्रम पाटील लोढे यांचा मुलगा अविनाश लोढे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रामध्ये २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लासवन अधिकारी या पदावर निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचा बालमटाकळी येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अविनाश पाटील लोढे म्हणाले … Read more