बापरे ! मदत करणाऱ्यालाच भरदिवसा लुटले

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : ट्रकमध्ये डिझेल आणण्यासाठी ज्यांना मदत केली, त्यांनी चक्क त्याच तरूणाला लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी शहरातील नेप्ती नाका चौकात घडली. याबाबत राजेंद्र मदन राम यांनी फिर्याद दिली आहे. राम हे शुक्रवारी नेप्ती चौकात उभे होते यावेळी अनोळखी ५ व्यक्‍ती त्यांच्याजवळ आल्या. “आपच्या ट्रकपधील डिझेल संपले आहे, ते आणण्यासाठी मदत करा,’ असे … Read more

धक्कादायक : जिल्ह्यातील या गावातील ओढ्यात आढळले ३० मृत साप

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील महादेव देवस्थान परिसरातील स्मशानभूमी समोर पांदन क्षेत्रामधील ओढ्यात अज्ञात व्यक्तीने मासे पकडण्यासाठी जाळे लावले होते, त्यामध्ये माशाऐवजी ६ ते ७ फूट लांबी असलेले २५ ते ३० विरूळे जातीचे साप अडकून मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी घडली. तालुक्यातील वडाळा महादेव मंदिर परिसरातील स्मशानभूमीसमोर पांदण व ओढ्याचा परिसर … Read more

धक्कादायक ! तो अधिकारी नसून निघाला अट्टल गुन्हेगार !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत कर्जत पोलिसांसह अन्य सरकारी अधिकाऱ्यांचा शाही पाहुणचार झोडणाऱ्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील योगेंद्र उपेंद्र सांगळे या ‘तोतया’स अटक केली असून, त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी चौकशी दरम्यान तो कोणी अधिकरी नसून अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरूद्ध मध्यप्रदेशात … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील खंडेश्वर महाराज मंदीरात चोरी, चांदीचा मुखवटा व दागिने चोरीस

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील खंडेश्वर महाराज मंदीर चोरी झाली आहे. चोरट्यांनी दोन लाख किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे, खंडेश्वर महाराजांसाठी पाच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा व दोन तोळे सोन्याचे दागिने केले होते मंदीराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. खंडेश्वर … Read more

फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली …महिलेच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तगादा केल्याने पतीने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात बजाज फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी, एजंंट व व्यवस्थापकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गंगा संतोष पालकर (रा. गोंधवणी) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन बजाज फायनन्स कंपनीचा वसुली अधिकारी तनविर सिकंदर … Read more

बिग ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  आमदार जगताप यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी वारेमाप गर्दी केली होती.आमदाराचाच वाढदिवस त्यात सत्ता असल्याने भिती कोणाची़? त्यामुळे सारे हावशे गवशे गर्दीने जमा झाले. अनेकांनी त्यावेळी मास्कचा वापर केलेला नव्हता. सोशल डिस्टन्सचा तर पुरता फज्जा उडविला होता. कार्यकर्त्यांसह गर्दी केल्याने, मास्क न वापरल्याने पोलिसांनी नेत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले … Read more

माजी सैनिकाच्या खून प्रकरणी चार जणांना अटक

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिक मनोज औटी यांचा खून केल्याप्रकरणी चार आरोपींना सुपे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सोयरिकीच्या वादातून ८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तीन महिन्यांपूर्वी सैन्यातून निवृत्त झालेल्या मनोज संपत औटी यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अंगावरून पिकअप गेल्याने चिमुरड्याचा जागेवरच मृत्यू

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यात पिकअपने उडविल्यामुळे तिसरीच्या वर्गात शिकत असलेला चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मांडवगण वेशीकडून बगाडे कॉर्नरकडे दुचाकीवरून जाणारे योगेश सुभाष कदम आणि त्यांच्या दुचाकीवर असलेला आयुष जयेश कदम (वय ९वर्षे) यांना पाठीमागून आलेल्या पिकपने ( नंबर एम.एच.१६ क्यु ४६५) उघडविल्यामुळे आयुष जयेश कदम दुचाकीवरुन रस्त्यावर फेकला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केला. ही घटना कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथे घडली.याबाबत मयत विवाहितेच्या पित्याने कर्जत पोलिसांत पतीविरूध्द तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील बलभीम शंकर मिंड यांची मुलगी आरती हिचा विवाह चखालेवाडी येथील सुरेश सिद्धू खटके याच्याबरोबर झाला होता. शुक्रवार दि.१२जून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  नगर मनमाड महामार्गावर दोन मालवाहू ट्रकचा भिषण अपघात झाला आहे. आज पहाटे पाच वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजस्थान येथील ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला असून क्लिनर जखमी झाला आहे. राहता कोर्टापासून काही अंतरावर महामार्गावर बंद पडलेल्या ट्रकला राजस्थानकडे जाणा-या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा बसस्थानकासमोर तरुणाची हत्या !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : शिर्डी बसस्थानकासमोर भरदिवसा तरुणाची हत्या करण्यात आली आहे.   शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात 45 वर्षिय इसमाच्या डोक्यात दगड तसेच लोखंडी राँड घालून खून केल्याची माहिती समोर आलीय. ता घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस पथकाने धाव घेतली.  यावेळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. याबाबत शिर्डी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. … Read more

Fb अकाउंट हॅक करून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : फेसबूक अकाउंट हॅक करून मोबाइलधारकाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला. संबंधित मोबाइलधारकाने पोलिसांच्या सायबर शाखेकडे याबाबत तक्रार केली आहे. बेलापूर येथील अमोल विठ्ठल गाडे यांचे फेसबूक अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक करून सर्व व्यक्तींचे मोबाइल नंबर मिळवत मला पैशांची गरज असून तातडीने फोन पेवरील खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती केली. मात्र, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत साधूचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 ,13 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील पाझर तलावाजवळ देवस्थान समितीच्या विहिरीत बुधवारी सायंकाळी ६ वाजता भगवे कपडे घातलेल्या साधूचा मृतदेह आढळला. मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातून घरी येणाऱ्या काही शेतकऱ्यांना ब्रह्मानंद शिवगिरी (राहणार बुलडाणा) यांचा मृतदेह कानिफनाथ देवस्थान समितीने खोदलेल्या विहिरीत तरंगताना दिसला. माहिती मिळताच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यु !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : पारनेर तालुक्यातील जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्यावर विद्युत मोटारीच्या पाईपचे लिकेज काढण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या एका तरुणाचा पाण्यातील लोखंडी रॉड डोक्यात घुसल्याने जागीच मृत्यु झाला. बुधवार दि.10 जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रमोद बाळासाहेब गायकवाड (वय 35) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर तो माजी सैनिक वाचला असता !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :सोयरिकीच्या वादातून तालुक्यातील जातेगाव येथील निवृत्त सैनिकाला जीव गमवावा लागला. सात ते आठ व्यक्तींनी या जवानाला दगड, काठ्या, लोखंडी रॉडने ठेचले. या घटनेमुळे सुपे परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. औटी व पोटघन कुटुंबातील वादात पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या कार्यपध्दती … Read more

दोन सख्ख्या बहिणींना भरधाव ट्रकने चिरडले !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  बाह्यवळण रस्त्यावरील केडगाव-अकोळनेर चौकात ट्रक आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली. तर, दुसरी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) सकाळी 10 च्या सुमारास घडली. या दोघी सख्ख्या बहिणी असून, केडगाव येथील रहिवासी आहेत. या अपघातात मनीषा बाळासाहेब कापरे (वय 35, रा. कापरेमळा, कांबळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सॅनिटाझरचा पळविलेला ट्रक अखेर सापडला !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातुन रात्री 21 लाख रुपयांच्या सॅनिटायझर बाटल्या घेऊन जाणार्‍या ट्रक चार चोरट्यानी ड्रायव्हर ला मारहाण करून पळवून नेला होता मात्र कर्जत पोलिसांनी काही तासात हा ट्रक ताब्यात घेण्यात यश मिळविले असले तरी चारही चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर सोलापूर महामार्गावरील … Read more

माझ्या नवऱ्याने अल्पवयीन मुलीशी लग्न केले…

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :   पतीने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची फिर्याद बायकोनेच दाखल केल्यामुळे नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.पती,सासू,सासऱ्यासह नऊ जणांविरुद्ध बाल विवाह प्रतिबंधित कलमानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासा पोलीस स्टेशनला संगिता माहदु खेमनर ( वय 30 वर्षे) रा साकुर ता संगमनेर(हल्ली अमळनेर ता.नेवासा) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे … Read more