मुख्यमंत्र्यांचा इशारा परिस्थिती बिघडू शकते …

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-सध्या राज्यात हिंगोलीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असून दुसऱ्या लाटेचे शेपूट अद्याप कायम आहे. आरोग्याचे नियम न पाळता नागरिक गर्दी करत असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते असा इशारा देऊन निर्बंध शिथिल करुन घाईघाईने व्यवहार खुले करू नका,असे निर्देश मुख्यमंत्री … Read more

माजी मंत्री राम शिंदे म्हणाले आगामी निवडणूक स्वबळावरच…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले. ओबीसी समाजाचा खरा कळवळा असेल, तर सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी गुरुवारी केली. शिंदे म्हणाले, ओबीसीचे आरक्षण हे केवळ सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे गेले … Read more

‘डेल्टा प्लस’च्या पहिल्या महिला रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस या नव्या कोरोना अवताराने भीती वाढवली आहे. देशाभरात डेल्टा प्लस या म्युटेन्टचे रुग्ण आढळत आहेत. त्यातच मध्यप्रदेशातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. उज्जैनमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अखेर अटक

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- तीन वर्षापासून फसवणुकीच्या दाखल दोन गुन्ह्यातील आरोपीला नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन आरोपीला अटक केली. प्रसाद बाळासाहेब गुंड, (रा. पुणे, हल्ली रा. दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार अमोल गाडेकर हा फरार आहे.आरोपी गुंड याने नगरच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून केंद्र सरकारच्या अखत्यारित … Read more

चिंताजनक : राज्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसचे रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- म्युकरमायकोसिस आजाराचे रूग्ण नगर शहरात आढळून येत आहेत, परंतुु, त्यासाठी आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा असल्याचा मुद्दा कान, नाक, घसा तज्ज्ञांनी (ईएनटी) मनपात झालेल्या बैठकीत उपस्थित केला. म्युकरमायकोसिस आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आरोग्य समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कान, नाक, घसा तज्ज्ञ व डेंटल सर्जन यांची संयुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनर- मोटारसायकल अपघातात दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोल्हार भगवतीपूर येथे कंटेनर व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास काळामाळा जवळ घडली. गोरख बापूसाहेब पुरी (वय २८, रा. खुडसर, ता. राहुरी), कैलास शिवाजी पवार (४५, रा. खुडसरगाव) असे मृतांची नावे आहेत. लोणी जवळ (काळामळा … Read more

शेवगावातील स्थानिक टपरीधारकांचे झेडपीच्या सीईओना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- शेवगाव येथील जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावे, या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना दिले. शेवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून स्थापन करण्यात आलेली असून त्यालगत चारही बाजूने … Read more

वीजबिल सक्तीची वसुली नको; शिर्डीकरांची प्रशासनाला हाक

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोनाकाळात सगळीकडेच अर्थचक्र गाळात रुतलेले दिसून येत आहे. कामधंदे बंद पडल्याने अनेकांवर आर्थिक कुर्हाड कोसळली आहे. यातच कोणतेही उत्पन्न स्रोत नसल्याने आर्थिक हाल होत असताना महावितरणकडून वीजबिल वसुली सक्तीने होत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वसुली करू नये यासाठी शिर्डीमधील सचिन चौगुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, युवक … Read more

अठ्ठावीस वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना राहाता तालुक्यात घडली आहे. ज्योती मोहित साळुंके (वय २८) असे विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्योती हिचा विवाह चार वर्षांपूर्वी मोहित साळुंकेबरोबर झाला होता. लग्नानंतर संसार सुखाने सुरू होता. काही दिवसांपूर्वी … Read more

जहागिरी वतन म्हणून मिळालेली 20 हजार एकर जमीन सरकार जमा करावी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- महागाईच्या युगात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे. आज छोटयाश्या भूखंडाला देखील लाखो रुपये मोजावे लागतात. मात्र पूर्वीच्या काळात इनामी म्हणून हजरो एकर जमिनी दिल्या जात असत. अशीच एका हजारो एकर जमिनीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ब्रिटिश कालखंडात १९०१ मध्ये पारनेर तालुक्यातील पळशी गावातील पळशीकर कुटुंबीयांच्या नावे जहागिरी … Read more

विजेच्या एका ठिणगीने तिचा संसार झाला बेचिराख…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- डोक्यावरील पतीचे छत्र हरपलेल्या एका निराधार महिलेच्या घराला आग लागल्याने तिचा संसार काही क्षणात बेचिराख झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या सहकार्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोपर्यंत आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुमन निवृत्ती परहर या कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे राहता. पतीच्या … Read more

जमिनीचा वाद ! 12 जणांवर विनयभंगासह, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जमिनीवरून झालेल्या वादातून 12 जणांवर विनयभंगासह, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे घडली आहे. दरम्यान यातील 3 आरोपींना बेलवंडी पोलिसांनी अटक केली. तर कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह 9 आरोपी पसार झाले आहेत. याबाबत अधीक माहिती अशी कि, कोथूळ येथील रोहिदास गबाजी धस यांची शेतजमीन दीड … Read more

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट हि जिल्ह्यासाठी अत्यंत घातक ठरली आहे. यामध्ये रुग्णवाढीसह मृत्युदर देखील जास्त होतो. मात्र काही दिवसानंतर कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जिल्ह्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. मात्र सध्या स्थितीला जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना पुन्हा फोफावतोय असे दिसून येत आहे. … Read more

‘या’ तालुक्यातील आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून जामखेडमधील भाजी बाजार व शनिवारचा आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आठवडे बाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी … Read more

कुख्यात गॅंग तांदळे यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या कुख्यात नयन राजेंद्र तांदळे (वय 25, रा. भिस्तबाग नाका, सावेडी) याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली असून आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. … Read more

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २ लाखांचे अनुदान मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना, व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे एकूण 2 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. … Read more

चक्क ‘या’ तालुक्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात आक्रोश मोर्चा निघणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- दलित कुटुंबियावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व आरोपींना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यास निलंबित करावे, या मागणीसाठी उद्या शुक्रवार दि.25 जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या निवेदनात म्हंटले आहे कि, राहुरी तालुक्यातील खडांबे गावातील बाळासाहेब लटके या राजकीय पुढार्‍याकडून … Read more

अहमदनगर हादरले : आयसीयुत उपचार घेणाऱ्या तरुणीने रुग्णालयातच केल असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील १७ वर्ष वयाच्या तरुणीने पाच दिवसापुर्वी विषारी औषध सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर तरुणीवर राहुरी फँक्टरी येथिल नर्सिंग होम मध्ये उपचार चालू असताना गुरवारी सायंकाळी 7;30 वाजता रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असुन नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांच्या भोंगळा कारभार पुन्हा समोर आल्याने तीव्र … Read more