अहमदनगर शहरातील कोरोना लसीकरणावर प्रश्नचिन्ह ! तब्बल १ लाख २६ हजार डोसचे मिळूनही नागरिकांचे लसीकरण….

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भुतारे यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या मार्फत अहमदनगर शहरातील लसीकरण डोस बाबत माहिती घेतली असता आज पर्यंत अहमदनगर महानगरपालिका व सिव्हिल हॉस्पिटल मिळून शहरातला १ लाख २६ हजार डोस चे वितरण केले असून अजूनही ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे दिसत नाही आजही अनेक … Read more

पोलीस गस्तीचे वाहन होणार ऑक्सिजनयुक्त

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  गरजूंना दोन वेळचे जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या वतीने रुग्णसेवा देखील सुरु असून, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गरजू रुग्णांना ऑक्सिजनचे कॅन वाटप सुरु आहे. लंगर सेवेच्या वतीने अहमदनगर पोलीस दलास दोनशे ऑक्सिजन कॅन देण्यात आले. गस्त घालणारे पोलीसांचे चारचाकी वाहन ही ऑक्सिजनची सेवा … Read more

पारनेर तालुक्यात अवैध वाळू उपसाकडे पोलीस आणि महसूल प्रशासनाची डोळेझाक

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा खाजगी मालकीच्या जागेतून होत असून, पोलीस आणि महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करुन वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले. सदर वाळू उपसा बंद न झाल्यास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बाजार समित्यांना फळे व भाजीपाला व्यवहारास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  जिल्ह्यातील अहमदनगर नेप्ती उपबाजार समिती, संगमनेर येथील वडगाव पान उपबाजार आणि राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा या बाजार समित्यांच्या मुख्य आवारामध्ये फळे व भाजीपाला (कांदा वगळून) या शेतमालाच्या व्यवहारास बुधवारपासून (दिनांक २६ मे) सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा … Read more

अहमदनगर हादरल ! पोटात वार करून तरुणाचा खून…

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने पोटात वार करून खून करण्यात आला असल्याची धक्कादायक बातमी नगर तालुक्यातून समोर आली आहे.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल :- शरद दत्तात्रय वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून  बाळासाहेब नामदेव वाघ (वय 50 रा. पिंपळगाव … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला ! ‘या’ दिवशी देणार भेट….

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बुधवार, दिनांक २६ मे, २०२१ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९-१५ वाजता हेलिकॉप्टरने भाळवणी, ता. पारनेर येथे आगमन. स. ९-३० वाजता खासदार शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरची पाहणी. स.१० ते ११ … Read more

पंच्यान्नव वर्षाच्या आजीबाईने हरवले कोरोनाला 8 स्कोअर असताना कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  पाईपलाइन रोड येथील शांताबाई पालवे या पंच्यान्नव वर्षाच्या आजीबाई नुकत्याच कोरोनातून मुक्त झाल्या. शेंडी (ता. नगर) येथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या निशुल्क प्रहार कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या शांताबाई व इतर तेरा रुग्णांना सोडण्यात आले. या कोविड सेंटर मधून 85 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. कोरोनातून … Read more

करोना विषाणू हा जैविक युध्दाचाच भाग आहे, भारताने सर्व प्रकारच्या युध्दांसाठी सज्ज राहण्याची गरज

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  एकविसाव्या शतकात सुरक्षेचे स्वरुप बदलत चालले आहेत. फक्त सीमांवर भूतलावरुन होणारे आक्रमण म्हणजे युध्द नसून आता जगभर थैमान घालणारी करोना महामारी ही जैविक युध्दाचा भाग आहे. चीनच्या वूहानमध्ये अनेक वर्षांपासून जैविक युध्दाचे प्रयोग चालू असून करोना विषाणू हा तिथल्या प्रयोगशाळेतून अपघाताने किंवा प्रयोग म्हणून बाहेर आला आहे. या … Read more

देवेंद्र फडणवीसांचे मानसिक संतुलन बिघडलेय

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  राज्यावर कोरोनाचे संकट कायम असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची … Read more

संजय राऊतांना काही कामधंदा नाही !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे नसल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 12 सदस्यांची शिफारस विधान परिषदेवर नामनियुक्त करण्यासाठी केली. यावर मुंबई … Read more

मोठी बातमी : उद्यापासून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बंद होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  देशात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्या म्हणजेच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने देशात काम करत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी तीन महिन्यांची वेळही दिली होती.जी मुदत उद्या 26 मे रोजी पूर्ण होणार … Read more

भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे आभार मानले ! जाणून घ्या काय आहे कारण…

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- कोरोना रोखण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यात विविध उपाययोजना केल्या. आरोग्य विभागाला आवश्यक मदत केली. प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून परिस्थिती आटोक्यात आणल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार काळे यांचा गौरव करून आभार मानले. यावेळी भाजपचे विनायक गायकवाड म्हणाले, आमदार काळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे संसर्गाला … Read more

काळ आपली परीक्षा घेत असला तरी त्याला धीरोदात्तपणे सामोरे जावे लागेल…

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- कोरोना महामारी ही केवळ जागतिक अथवा एखाद्या देशावरचे संकट नसून तो मानव जीवनावरचा मोठा आघात ठरला आहे. गेल्या पंधरा महिन्यापासून त्याच्या प्रभावामुळे स्वास्थ्य, प्रकृतीसह आता मानसिकतेवरही परिणाम जाणवत आहे. या आरोग्याच्या आपत्ती पुढे व्यवस्था अपुऱ्या पडल्या आहेत. आता लोकसहभागातून या मानवावरील संकटावर मात करावी लागेल. सध्याचा काळ केवळ … Read more

अहिल्यादेवी होळकर जयंती घरातच साजरा करा !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराततच साजरी करावी. अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गाव हे आहे. दरवर्षी त्यांची चौंडी येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात येत होती. मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९३ देशांना लसी विकल्या !

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- भारतात तयार झालेल्या लसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९३ देशांना विकल्या. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणावर परिणाम झाला आहे. मोदी यांच्या या कृतीबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी मुंबईतील लसीकरणाच्या केंद्राबाहेर आंदोलन पुकारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मंगळवारी केली. केंद्र … Read more

‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांवर शहरी गरीब कल्याण योजनेतून उपचार करा

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेने शहरी गरीब कल्याण योजना सुरू करावी, अशी मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात आली. फुले ब्रिगेडचे शहर अध्यक्ष दीपक खेडकर, महेश सुडके, आकाश डागवाले, प्रसाद शिंदे, किरण जावळे, गणेश अडब्बले, संकेत … Read more

अनैतिक संबंधातून खून करणार्या अहमदनगरच्या प्रियकरास जन्मठेप

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  अनैतिक संबंधात अडथळा ठरतो, म्हणून प्रेयसीच्या मदतीने तिच्या पतीचा खून केल्याप्रकरणी पढेगाव येथील प्रियकर विशाल प्रदीप तोरणे यास श्रीरामपूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महंमद नासीर एम. सलीम यांनी सोमवारी दहा हजार रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मृत विकास यांचे बंधू अण्णासाहेब पवार यांनी ६ एप्रिल २०१८ … Read more

नियमांचे उल्लंघन करणे ‘त्यांना’ पडले महाग..!

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- सकाळी अकरानंतर दुकानात ग्राहकांची गर्दी करून व्यावसाय करत असलेल्या १० दुकानांवर सोनई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सोनई- घोडेगाव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, महावीर पेठ, नवीपेठ आदी भागांत सकाळी ११ वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी असताना शासन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहायक … Read more