साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांची नियुक्ती पुन्हा अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती आयएएस नसतांना दिली असून ती नियमबाह्य असल्याचे सांगत औरंगाबाद खंडपिठाचे उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत सनदी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे. मा उच्च न्यायालयात शिर्डी येथील माजी विश्वस्त श्री उत्तमराव शेळके यांनी नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल … Read more

अबब! जुन्या वाहनांना आरसी रिनिव्हल करण्यासाठी लागतील कैक पटीने अधिक पैसे ; वाचा नियम

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आपल्याकडे 15 वर्ष जुनी कार किंवा इतर कोणतेही वाहन असल्यास आरसी रीनिवल दरम्यान आता आपल्याला अशा वाहनासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. सरकारने केंद्रीय मोटार वाहन (दुरुस्ती) नियम, 2021 जारी केले असून या वर्षी 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. रस्ते व परिवहन मंत्रालयाने या वर्षाच्या शेवटी जुन्या वाहन ठेवणे किती महाग होईल, … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व खुर्द गावात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे. करोना रुग्णांची वाढ लक्षात घेऊन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ८८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१२० इतकी … Read more

कारच्या धडकेत मजुराचा मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- कारने एका मजुरास जोराची धडक दिली यामध्ये मजूर जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. हा अपघात संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब शिवारातील रणखांब ते कौठे मलकापूर रस्त्यावर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भगवान सदाशिव चौकल्ले (वय 55, रा.ता.लोहा, जि.नांदेड) हे बोअरवेलच्या गाडीवर मजूर म्हणून काम करत होते. शुक्रवारी … Read more

‘त्या’ आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थांचेही आश्रू अनावर!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आई शेवटी आईच असते. आपल्या मुलासाठी आई कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास मागे पुढे पाहत नाही. मात्र त्याच आपल्या काळजाच्या तुकड्याचा मृत्यू झाल्याने त्या आईची काय अवस्था होते याची कल्पना न केलेली बरी. नगर तालुक्यातील जेऊर येथे विजेच्या धक्क्याने एका वानराच्या पिलाचा मृत्यू झाला. यावेळी या वानराच्या आईने त्या चिमुकल्या … Read more

अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवसात तब्बल 660 रुग्ण तर वाढले इतके मायक्रो कंटेन्मेंट झो…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  अहमदनगर शहरात आणखी चार सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आलीय. शहरात आतापर्यंत १९ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १९ :- नगर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. या … Read more

महावितरणच्या कारवाईचा ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना फटका,मतदार संघातील नागरिकांनीच…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-थकीत वीजबिलासाठी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनीने आता पाणी योजनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र महावितरणच्या या कारवाईचा फटका ऊर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना बसला असल्याचे चित्र समोर आले आहे. नगर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावांची तहान भागविणाऱ्या बुऱ्हानगर पाणी योजनेचे वीज जोड तोडण्यात आल्याने सदर योजना बंद झाली आहे. ऊर्जामत्र्यांच्याच … Read more

अहमदनगर जिल्ह्यात अशी होणार MPSC परीक्षा वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा दिनांक २१ मार्च, २०२१ रोजी एकूण ५१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे, या परीक्षेसाठी एकूण १५ हजार ८४७ विद्यार्थी बसले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १ हजार ६३८ अधिकारी – कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे … Read more

माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, मात्र नवा वाद समोर…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.अमरधाम परिसरात स्व. गांधी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं काल (दि.१७ रोजी ) पहाटे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात कोरोनाने निधन झाले.त्यानंतर त्यांचे पार्थिव काल दुपारी ४ वाजता नगरला … Read more

शहरातील उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव द्यावे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  शहरातील नियोजित उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याची मागणी नरेंद्र मोदी आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नरेंद्र मोदी आर्मीचे पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले. जिल्हा प्रशासनाने उड्डाण पूलास स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याची भूमिका … Read more

कांद्याला मिळाला नीचांकी दर !! शेतकरी झाले ‘हवालदिल’

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- मागील वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे आज देखील पाण्याची स्थिती चांगली असल्याने उन्हाळी कांद्याचे उत्पादन वाढले आहे. मात्र भाव सपाटून पडले आहेत. कालच्या लिलावात एक नंबरचा कांदा अवघा १३०० ते १५०० रुपये या दराने विकला गेला. गेल्या महिनाभरापर्यंत कांद्याला जवळपास ३ हजारांपर्यंत भाव मिळतहोता. परंतु १ मार्चपासून मोठ्या प्रमाणात कांदा … Read more

आशिया खंडातील एकमेव असलेल्या ‘त्या’ धरणासह जिल्ह्यातील ‘ही’ धरणे धोकादायक!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-देशभरातील अनेक धरणाची स्थिती धोकादायक असल्याचा खळबळजनक अहवाल नुकताच संयुक्त राष्ट्राच्या एका संस्थेने दिला आहे. या अहवालात महाराष्ट्रातील तब्बल दहा धरणांचा समावेश असून, विशेष म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या भंडारदरा, घाटघर तसेच मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्राच्या त्या संस्थेने दिलेल्या या इशाऱ्याची दखल घेत … Read more

लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर केला अत्याचार!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- न्यायालयामध्ये काम करत असलेल्या एकाने लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात रवींद्र राजेंद्र सोनवणे (वय ३१ रा. तपोवन रोड, नगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने कालच सोनवणे याला … Read more

आता ‘त्यांना’ देखील मिळणार वेतन!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  राज्यातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, अघोषित,अंशत : विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना वेतन मिळावे यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. राज्य सरकारने हा निधी तातडीने मंजूर केला असल्याने आता या विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळणार असल्याची माहिती आ.डॉ.तांबे यांनी दिली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, अंशत … Read more

‘त्यांच्या’ संघर्षात नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आज राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे पाथर्डी तालुक्यात मात्र अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. नुकताच येथील आठवडा बाजार झाला. बाजारात झालेल्या गर्दीतील माणसांकडुन कोवीडच्या नियमांचे उल्लंघन झाले. मात्र पालिका प्रशासनाची … Read more

बाळ बोठेच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक अहमदनगर मध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. बोठे याची गेल्या पाच दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बोठे याला गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणीसाठी नेले होते. त्याचा जप्त केलेला … Read more

कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पारंपारीक पद्वतीने लावले तेल !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या समाधी उत्सवानिमीत्त पारंपारीक पद्वतीने तेल लावण्यात आले. नगरा व शंखध्वनीच्या निनादात महापुजा संपन्न झाली. यावेळी विश्र्वस्त, ग्रामस्थ उपस्थीत होते. कोरोनामुळे बाहेरगावच्या भाविकांना तेल लावण्याच्या विधीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे देवस्थान समिती सदस्य, पुजारी, ग्रामस्थ, चार बेटातील मानकरी यांनी कानिफनाथांच्या चांदीच्या पादुकाची … Read more