बाळ बोठेच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक अहमदनगर मध्ये !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. बोठे याची गेल्या पाच दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे

रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बोठे याला गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणीसाठी नेले होते. त्याचा जप्त केलेला मोबाईल हा उघडण्यासाठी सायबर विभागाच्या एका टीमला पाचारण केले आहे.

तो फोन कशा पद्धतीने उघडला जातो यासाठी पोलिस प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे याच घटनेतील आरोपी महेश तनपुरेकडे असलेले त्याचे फोन फॉरेन्सिक लॅबकडे पुढील तपासणीसाठी पाठव ले आहेत.

या गुन्ह्यात नाव जाहीर झाल्यापासून बोठे पसार झाला होता. तब्बल साडेतीन महिन्यानंतर त्याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली न्यायालयाने त्याला २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे कोठडीत रवानगी होतात पहिल्याच दिवशी पोलिसांनी बोठेची चौकशी सुरू केली,

मात्र तो अद्याप तोंड उघडण्यास तयार नाही फरार झाल्यानंतर त्याच्या घरातून हस्तगत केलेल्या आयफोनचा पासवर्ड देखील विसरलो असल्याचं तो पोलिसांना सांगत आहे. तपासी अधिकारी अजित पाटील, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील बोठेची चौकशी केली.

बोठेचा आयफोन उघडण्यासाठी नगर पोलिसांना सायबर पोलिसांचे विशेष पथक बोलवावे लागले. आयफोन उघडल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर