हजार रुपयांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ पकडला

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- शेतीचे वाटणी पत्राआधारे उतर्‍यावर नोंद करून देण्यासाठी हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या कर्जत तालुक्यातील एका तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने मिरजगाव येथे ही कारवाई केली. दरम्यान सचिन सुरेश क्षीरसागर (वय 35 रा. मिरजगाव ता. कर्जत) असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार … Read more

लाडक्या नेत्याला अखरेचा निरोप… गांधी साहेब अमर रहे

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरधाम परिसरात स्व. गांधी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं काल (दि.१७ रोजी ) पहाटे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आज … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- उन्हाळ्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांतील वातावरणात बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या ताज्या अद्ययावत माहितीत म्हटले की, पश्चिम विक्षोभ पुन्हा एकदा देशात सक्रिय आहे, ज्यामुळे बर्‍याच राज्यात वादळाची शक्‍यता आहे. ज्यामुळे पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला … Read more

पत्नीवर ऍसिड हल्ला करणाऱ्या पतीला १० वर्ष सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पत्नीवर ऍसिड हल्ला केल्याबद्दल जिल्हा सत्र न्यायालयाने श्रीकांत आनंदा मोरे (रा. भिंगार) याला १० वर्षे सक्‍तमजुरी व ५० हजार रुपये दंड केला. नगर शहरातील आलमगीर येथे २०१७ मध्ये ही घटना घडली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील फिर्यादी महिलेचे २००८ मध्ये आरोपी मोरे लग्न झाले होते. त्यांना दोन … Read more

धक्कादायक ! जगभरातील 5G टेक्नोलॉजील टार्गेट करतायेत चिनी हॅकर्स ; झालेय ‘असे’ काही …

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-आजकाल जगभरातील टेलिकॉम कंपन्या 5 जी तंत्रज्ञानावर काम करत आहेत. पण आता हे तंत्रज्ञान धोक्यात आले आहे. एका अलीकडील अहवालात असे समोर आले आहे की, एक चीनी हॅकिंग ग्रुप 5 जी तंत्रज्ञानाची सीक्रेट्स तसेच इतर संवेदनशील माहिती चोरण्यासाठी जगातील टेलिकॉम कंपन्यांना लक्ष्य करीत आहे. ZDNet ने मंगळवारी आपल्या अहवालात म्हटले … Read more

शिक्षिकेने 13 वर्षाच्या मुलासोबत बळजबरीने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी एका घटना जालंधर येथे घडली आहे. आपल्या राशीतील मंगल सुरू व्हावा व आपले लग्न जुळावे यासाठी चक्क एका शिक्षिकेने आपल्याच 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान अल्पवयीन विद्यार्थ्याच्या परिवाराकडून शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबात अधिक माहिती … Read more

शेअर बाजारात 5 दिवसांत गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटींचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-आज व्यापारानंतर बीएसई सेन्सेक्स ५८५.१० अंकांनी खाली येऊन ४९,२१६.५२ च्या पातळीवर बंद झाला. त्याशिवाय निफ्टी इंडेक्स १६३.४५ अंकांनी घसरला असून ते १४,५५७.८५ च्या पातळीवर बंद झाले आहेत. देशभरात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे गुंतवणूकदारांच्या चिंता पुन्हा वाढू लागल्या आहेत, ज्यामुळे आजच्या शेवटच्या व्यवसायात घट दिसून आली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही … Read more

शेतीच्या वादातून वृद्धावर गुप्तीने वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील वरुडी पठार येथील एका वृद्धास शेतीच्या बांधावरुन गुप्तीने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेत भाऊसाहेब यशवंत फटांगरे हे जखमी झाले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वरुडी पठार येथील देवराम खंडू फटांगरे, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येतील वाढ कायम, आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ५०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ४३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९१२ इतकी … Read more

रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी सरपंच बसले उपोषणाला

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- अकोले तालुक्यातील चैतन्यपूर ते भक्ताची वाडी हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी विद्यमान सरपंचासह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. आज चौथ्या दिवसअखेरही उपोषण सुरूच असून, सरपंचाची प्रकृती खालावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील चैतन्यपूर ते भक्ताची वाडी हा रस्ता हा रस्ता गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून वाहतुकीस खुला होता. … Read more

नदीपात्रात बुडालेल्या त्या मुलाचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- संगमनेर खुर्द येथील प्रवरानदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच बालकांपैकी एकजण बुडाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत यश कृष्णा आडेप (वय 12, रा. पदमानगर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या यश कृष्णा आडेप या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर तब्बल चाळीस तासांनंतर आज सकाळी खराडीनजीक तरंगतांना आढळून आला. … Read more

कोपरगावात ११७ कोरोनाचे रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-  बुधवारी (१७) खासगी रुग्णालयातील ७४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर नगर येथे पाठविलेल्या ८५ तपासण्यांपैकी ३६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रॅपिड टेस्टमधील १२ जणांपैकी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. असे एकूण ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. … Read more

घोड चे आवर्तन २७ मार्च पासून सुटणार : बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. घोड खालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार संबंधित मंत्री महोदयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार घोड आवर्तन २७ मार्च रोजी पासून सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. … Read more

मोठी बातमी : वाहनांमध्ये खराबी निघाल्यास कंपनीस होऊ शकतो एक कोटींचा दंड ; जाणून घ्या नवीन नियम

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-एप्रिल महिन्यापासून सरकारने रिकॉल ऑर्डर पास केल्यास वाहन निर्माता आणि आयातदारास जबर दंड भरावा लागू शकतो. हा दंड 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असू शकतात. म्हणजेच, जर एखादी कार उत्पादक कंपनी तुम्हाला कार विकते आणि त्यात एखादा दोष आढळला तर सरकारच्या आदेशानंतर या कंपन्यांना जबर दंड भरावा लागू शकतो. … Read more

बंपर ऑफर! केवळ 1.70 लाखात खरेदी करा 3 लाखांची कार, 8 लोक फिरू शकतात एकत्रित

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-जर आपले कुटुंब मोठे असेल आणि आपण अशी कार शोधत असाल ज्यात सर्व एकत्र बसू शकेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक शानदार डील घेऊन आलो आहोत. यात तुम्ही 8 सीटर व्हॅन फक्त 1 लाख 70 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या 8 सीटर व्हॅनची वास्तविक किंमत तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. … Read more

विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळून आला. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. रेश्मा रुपेश मोकळ (वय २४) असे या मयत विवाहितेचे नाव आहे. रेश्मा हिचा विवाह गतवर्षी रुपेश मोकळ याच्याबरोबर झाला होता. काल सकाळी तिचा मृतदेह विहिरीत आढळला. तिच्या मृत्युची खबर समजताच माहेरकडील मंडळी … Read more

सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट येथील शाखेचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-येथील सुप्रसिद्ध सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट, निलक्रांती चौक येथील नवीन शाखेचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, बजरंग सोपानराव महांकाळ, विकी बजरंग महांकाळ, सागर मुर्तडकर, सनी मुर्तडकर, शुभम गंगेकर, अभिषेक गंगेकर, आकाश मुर्तडकर, सचिन दिवटे, गोपाळ मालपाणी, स्वप्निल भिंगारे, सनी भिंगारे, सागर गवळी, राकेश … Read more

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु, देशाच्या ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असून देशाच्या ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. यामुळे केंद्र सरकारनेदेखील तातडीने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. बुधवारी एका दिवसात कोरोनाचे … Read more