राम मंदिर उभारणीसाठी सुरू केलेली ‘ती’ मोहीम बंद!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  आयोध्या येथे भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातून राम मंदिरासाठी जनतेकडून देणगी स्वीकारल्या जात होत्या. पण, त्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट … Read more

बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फायदा,शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील कातनाल्यात बंधारे झाल्याने विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी केले. लघु व पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत, जिल्हा परिषदेमार्फत व राहाता नगरपालिकेच्या सहकार्याने बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष पिपाडा बोलत होत्या. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, गटनेते ॲड. विजय … Read more

पसार व्यापाऱ्याची माहिती सांगा बक्षिस मिळवा !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील किराणा व भुसार आडत व्यापारी बंधुंनी माळवाडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी बुडवून पोबारा केला होता. त्याला एक महिना पूर्ण झाला. पोलीस तपासात अद्याप ठोस धागेदोरे हाती न लागल्याने संतप्त पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीतील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन व्यापाऱ्याच्या परिवारातील फोटो प्रसिद्ध करून माहिती देणाऱ्यास पाच लाख … Read more

धक्कादायक ! जावयास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीच्या माणिकराव खेडकर यांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत दाखल फिर्यादीवरुन 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलिसांनी यातील 7 आरोपींना सायंकाळी ताब्यात घेवून अटक केली. याबाबत … Read more

रेल्वेतून पडल्याने सुरक्षा दलातील जवान जखमी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील वाळुंज येथील महादेव दगडू फुंदे हे सोमवार (दि. २२) रोजी कर्तव्यावरून घरी येत असताना कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनमधून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाले जखमी फुंदे यांच्यावर आयुष हॉस्पिटल, राधानगर, खडकपाडा, कल्याण येथे उपचार सुरू आहेत. फुंदे हे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स अर्थात सुरक्षा दलात (एमएसएफ) मुंबई येथे कार्यरत … Read more

साईसंस्थानच्या कर्मचाऱ्यांना संस्थानने मोफत कोविड लस द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- साईबाबा संस्थानने सर्व कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोविडची मोफत लस द्यावी अशी मागणी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फफेअर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक प्रतापराव कोते, अध्यक्ष अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संस्थानमध्ये कायम, कंत्राटी, … Read more

निर्णय होऊन १० दिवस उलटल्यानंतरही ती पाच गावे सरपंचांच्या प्रतिक्षेत….

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- राहुरी तालुक्यातील पाच गावांच्या सरपंचपदाचा तिढा सुटला खरा; पण प्रत्यक्षात सरपंच निवडीचा प्रोग्रामच ग्रामपंचायतींना मिळालेला नाही. निर्णय होऊन १० दिवस उलटल्यानंतरही सरपंचांची प्रतिक्षा आहे. निवडीचे घोडे अडले कुठे? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. वळण ग्रामपंचायतीची ११ जागांसाठी १५ जानेवारीला पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यानंतर १० फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच निवडीचा प्रोग्राम … Read more

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा घेतला धसका !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्दी, खोकला, थंडी, ताप व तोंडाची चव जाणे, अशा आजारांचा अनेकांनी धसका घेतला आहे. मित्र परिवारात किरकोळ आजारावरून आता ‘अण्णा’, ‘बापु’, ‘तात्या’, ‘भाऊ’, ‘दादा’ ‘तुम्ही खोकु नका, दवाखान्यात जा’ असा सल्ला दिला जात असल्याचे ग्रामीण भागात सध्या दिसून येत आहे. कोरोनाच्या तडाख्यात अनेक कुटुंबांना आर्थिक फटका … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे शनिवार, दि. ६ रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, जेऊर येथील जरेवस्ती परिसरात रात्री एकच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पायी चाललेले प्रदीप अरविंद धीवर (वय ४५, रा. आशीर्वादनगर, श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस … Read more

सभापती क्षितीज घुलेंकडे तालुक्याचे भावी आमदार म्हणून पाहिले जातंय !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी अनेक विकासकामे सुरू केलेली असून, या विकास कामांमुळे शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागाचे रुप पालटू लागले आहे. डॉ. घुले हे विकासकामांचा आढावा प्रत्यक्ष भेट देऊन घेत आहेत. अशाच भेटी दरम्यान त्यांच्यातील संस्काराचे दर्शन दिसून आले. त्यांना औक्षवण केल्यानंतर … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी महापौरांच्या लॉन्सवर कारवाईचा बडगा

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळे धुमधडाक्यात पार पडत आहेत. यामुळे प्रश्नाने आक्रमक भूमिका घेतली आहे. करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील 3 मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विशेषबाब म्हणजे या मंगल कार्यालयाच्या यादीत एक कार्यालय हे शहराचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे … Read more

१० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- जिल्ह्यात १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार व नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीकांत आणेकर यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व … Read more

नागरिकांनो लक्ष द्या…. नाहीतर रेशनपासून मुकाल

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानमध्ये सध्या ‘शिधापत्रिका तपासणी नमुना’ शिर्षकाखालील फार्म सर्व शिधापत्रिकाधारकांकडून भरून घेतले जात आहेत. तो फार्म ज्या व्यक्तीकडे रेशनकार्ड आहे त्या प्रत्येकाने भरायचा आहे, तो फार्म भरून न दिल्यास संबधीत कुटूंबांचे रेशनकार्ड अपात्र ठरवून रद्द होणार आहे, अशी माहीती श्रीरामपूरचे तहसिलदार प्रशांत पाटील यांनी दिली … Read more

कांद्याचे हजारो किलो बोगस बी विकून शेतकऱ्यांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- नगदी उत्पन्न मिळवून देणार पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. मात्र तालुक्यात कांद्याचे हजारो किलो बोगस बी उत्पादक कंपन्या व दुकानदारांनी विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करा, अशी मागणी घुलेवाडीचे प्रगतशील शेतकरी भास्करराव पानसरे यांनी केली. पानसरे म्हणाले, शेतकरी मोठ्या कष्टाने शेती पिकवतो. कांदा शाश्वत पैसे … Read more

माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत, कोणत्याही क्षणी होवू शकते अटक !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील तब्बल २२ कोटी रूपयांच्या बोगस कर्जप्रकरणात आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांची पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेपासूनच धरपकड सुरू केली आहे. बोगस कर्ज प्रकरणे केल्याप्रकरणी नवनीत सुरपुरिया, कर्जदार यज्ञेश चव्हाण या दोघांना आज अटक केली. त्यांना मोरगाव येथील न्यायालयात हजर केले असता … Read more

नववधू इतकी रडली की तिला हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यूने गाठलं…

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- लग्न झाल्यानंतर सासरी जाताना नववधू इतकी रडली की तिला हृदयविकाराचा झटका आला, अन‌् त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला. आयुष्यातील सुखाचे दिवस पाहाण्याआधीच तिला मृत्यूने गाठलं व आनंदाच्या वातावरणावर एका क्षणात विरजण पडले. ओडिशाच्या सोनेपूर जिल्ह्यातील ही घटना घडली. गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी असं मृत नवरीचं नाव आहे. शुक्रवारी बालानगीर … Read more

सासरी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र या वाढत्या घटनांमुळे महिला आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. चारित्र्याच्या संशयावरून वारंवार सासरी होणार्‍या छळास कंटाळून संगमनेर तालुक्यातील … Read more

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय! : नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झाले आहे. असा आरोप अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नगर येथे शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण व संवाद बैठक घेतली, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी … Read more