माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत, कोणत्याही क्षणी होवू शकते अटक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील तब्बल २२ कोटी रूपयांच्या बोगस कर्जप्रकरणात आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांची पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेपासूनच धरपकड सुरू केली आहे.

बोगस कर्ज प्रकरणे केल्याप्रकरणी नवनीत सुरपुरिया, कर्जदार यज्ञेश चव्हाण या दोघांना आज अटक केली. त्यांना मोरगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांच्या या धडक कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या कारवाईबाबत माहिती मिळताच अनेकजण पसार झाले आहेत.

याप्रकरणात बॅंकेचे तत्कालीन संचालक असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांचीही चाैकशी होणार असून माजी खासदार दिलीप गांधी हे बॅंकेचे तत्पकालीन संचालक असून, त्यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात बॅंकेची फसवणूक झाली आहे.त्याना कोणत्याही क्षणी अटक होवू शकते.

याबाबत सविस्तर असे की, नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली होती. दि.२६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान झालेल्या या प्रकाराबाबत कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय-५६, रा. अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करीत आहे. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे नगर शहरात याप्रकरणी छापेमारी केली.

पिंपरी पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर संचालकांचे धाबे दणाणले आहेत. अटकेच्या भीतीने अनेकांनी पोबारा केला. माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकाळातील हे बोगस कर्ज प्रकरण आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर