आदित्य ठाकरे निघाले ग्रामीण भागात, या दिवशी येणार नगर जिल्ह्यात

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे.मुंबईत अनेक सभा घेतल्यानंतर ते आता ग्रामीण भागात येत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे शनिवारी (२३ जुलै) नगर जिल्ह्यातील नेवासे व शिर्डी येणार आहेत. नेवाशात दुपारी २ वाजता व शिर्डीत सायंकाळी ५ वाजता त्यांचा मेळावा होणार आहे. शिर्डीचे खासदार सदाशिव … Read more

राज ठाकरेंचा पुन्हा ‘मराठी भोंगा’, आता दूरदर्शनकडे केली ही मागणी

Maharashtra News:काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी राज्यभर रान पेटविलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता पुन्हा आपल्या मराठी भाषेच्या मूळ मुद्द्यावर आले आहेत. प्रसार भारतीच्या (दूरदर्शन) सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या हिंदी कार्यक्रमांना त्यांनी विरोध केला आहे. हिंदी कार्यक्रम बंद करून मराठी कार्यक्रम सुरू करावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच ठाकरे यांनी प्रसार भारतीला … Read more

Betel Farming : शेतकरी बांधवानी ‘या’ पद्धतीने सुपारीची लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पन्न

Betel Farming : जिल्ह्यातील कृषी अर्थकारणात (Agricultural Economics) एकूण 30 टक्के वाटा हा एकट्या सुपारीचा (Betel) आहे. मध्यप्रदेश, मेंगलोर, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पाकिस्तान, बांगलादेश येथून सुपारीला मोठ्या प्रमाणात मागणी (Demand) असते. सुपारीचा वापर प्रामुख्याने खाण्यासाठी होतो. त्याचबरोबर सुगंधी सुपारी (Aromatic betel) बनविण्यासाठी कच्चा माल म्हणूनही सुपारी वापरली जाते. बाजारपेठेत कोकणातील (Kokan) नैसर्गिक वातावरण आणि पुरेशा … Read more

राष्ट्रपती निवणुकीचा पहिला निकाल हाती, पहा कोणाला किती मते?

Maharashtra News:राष्ट्रपती निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. खासदारांची मतमोजणी पूर्ण झाली असून आता आमदारांची बाकी आहे. खासदारांच्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांनी अपक्षेप्रमाणेच नोठी आघाडी घेतली आहे. खासदारांची ७४८ मते वैध ठरली आहेत. त्यांचे एकूण मूल्य ५ लाख, २३ हजार ६०० आहे. त्यातील ५४० मते मुर्मू यांना मिळाली आहेत. त्यांचे मूल्य ३ लाख ७८ हजार … Read more

यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात, नव्या सरकारने घेतले महत्वाचे निर्णय

Maharashtra News:नवीन सरकारच्या काळात आणि कोविडची लाट सरल्यानंतर येणारा पहिलाच गणेशोत्सव धुमधडक्यात साजरा करता येणार आहे. त्यासाठी अनेक निर्बंध हटवून गणपती मंडळांच्या सोयीचे निर्णय नव्या सरकारने घेतले आहेत. कोविड काळात लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम असे सर्व सण-उत्सव पूर्वीप्रमाणेत उत्साहात साजरे करता येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

आरक्षण तर मिळालं, पण आम्ही 100 टक्के खुश नाही- छगन भुजबळ

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असून ओबीसी आरक्षण मिळाल्यांनतर समता परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचा लढा दोन अडीच वर्षांचा नाही, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि 91 साली समता … Read more

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री??? अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणतात….

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. त्यावर आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी पवार यांचे योगदान कोणीही कदापी विसरू शकणार … Read more

चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरुन नाना पटोलेंची आक्रमक भूमिका

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर नाना पटोले यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली … Read more

मागणी करण्याआधीच बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय; राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये लोकसभेतील गटनेते पदावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र ही नियुक्ती चुकीची आहे. शिवसेनेवर हा अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असे सांगत शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवरच आरोप केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ … Read more

जब वक्त बुरा चल रहा हो, तो लोग…; संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक सत्तानाट्य रंगले. त्यावरुन राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले आणि शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले. आता या सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या असून त्यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी … Read more

राष्ट्रवादी सेल बरखास्तीचा निर्णय राज्यात नाही, पटेलांनी असा केला खुलासा

Maharashtra News:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त केल्याचा आदेश काल रात्री आला आणि सर्वच कार्यकर्ते धास्तावले. त्यावरून विविध चर्चा आणि शंकाही घेतल्या जाऊ लागल्या.मात्र त्यानंतर पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, हा निर्णय महाराष्ट्रात लागू नाही. महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशासाठी निर्णय … Read more

कदमांना मला रोखठोक उत्तर द्यावे लागेल; भास्कर जाधवांचा आक्रमक इशारा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची नेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव यांच्यावर जोरदार पलटवार केला. शिवसेना वाचवायची असेल तर तुम्ही राष्ट्रवादीचा नाद सोडा, असे रामदास कदम यांनी म्हणाले. तसंच शिवसेनेतील ४० आमदार वेगळा विचार करत असतील तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवे, असेही रामदास … Read more

दिल्लीच्या मीडिया रूममध्ये आली शिंदेकडून सहा खोकी, पण कशाची?

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. तेथे त्यांचा मुक्काम महाराष्ट्र सदनात आहे. तेथे त्यांची पत्रकार परिषद झाली. दिल्ली मुक्कामात पत्रकारांचा त्यांच्याशी संपर्क होत आहे. काल अचानक महाराष्ट्र सदनातील मीडिया रुममध्ये सहा खोकी आली. ती पाहून पत्रकारांसह तेथील कर्मचारीही अवाक झाली. तर ती खोकी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मुख्यमंत्री शिंदे यांनी तेथील मीडिया रुमसाठी … Read more

राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित प्रमुखांना पत्र पाठवले असून ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यासोबत त्यांनी ट्विट करत अधिकृतपणे निर्णयाची माहिती दिली आहे. अध्यक्ष शरद पवारांच्या संमतीने … Read more

आदित्य ठाकरेही पावसात भिजले, नेटकऱ्यांना पवारांच्या सभेची आठवण

Maharashtra Politics : शिवसेनेत उरलेल्या निष्ठावान शिवसैनिकांशी संपर्क साधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ‘निष्ठा यात्रा’ सुरू केली आहे. बुधवारी ‘निष्ठा यात्रा’ मुंबईतील वडाळ्यात परिसरात असताना जोरदार पाऊस सुरू झाला. भर पावसात ठाकरे यांनी भाषण केले. त्यांच्या या पावसातील सभेची आता सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे यांच्या पावसातील सभेची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

Solar Panel Scheme Subsidy : अरे वा .. ! सरकार सौर पॅनेल बसविण्यासाठी देत आहे Subsidy !

Solar Panel Scheme Subsidy The government is giving

Solar Panel Scheme Subsidy :  भारत विषुववृत्ताजवळ स्थित आहे आणि त्यात सौरऊर्जेचा वापर करण्याची प्रचंड क्षमता आहे. यातून वर्षाला सुमारे 5,000 ट्रिलियन kWh ऊर्जा मिळते. ज्यामध्ये बहुतेक भाग दररोज 4-7 kWh प्रति चौरस मीटर प्राप्त करतात.  जानेवारी 2022 च्या अखेरीस स्थापित 50+ GW क्षमतेसह सौर ऊर्जा उपयोजन मध्ये भारत (India) जागतिक स्तरावर 5 व्या क्रमांकावर … Read more

Airtel New Plan : अरे वा ..  आता एअरटेल देत आहे एक वर्ष फ्री रिचार्ज; जाणून घ्या डिटेल्स 

 Airtel New Plan:  Airtel ही दूरसंचार क्षेत्रातील (Telecom Sector) एक प्रसिद्ध कंपनी या कंपनीशी मोठ्या प्रमाणात ग्राहक (customers) दीर्घकाळापासून जोडले गेले आहेत. याचे कारण म्हणजे या कंपनीकडून (company) ग्राहकांना चांगली सेवा देणे. एअरटेल देखील आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी अनेक ऑफर देत असते. या कंपनीशी संबंधित ग्राहक मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेत आहेत. अलीकडेच या कंपनीने आपल्या … Read more

Village Small Business Ideas : कमी खर्चात सुरु करा ‘हा’ व्यवसाय अन् कमी वेळेत कमवा लाखो रुपये  

Village Small Business Ideas

Village Small Business Ideas : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमध्ये (corona epidemic) बरेच लोक त्यांच्या घरी परतले आहेत. अशा परिस्थितीत काही लोक घरोघरी जाऊन काम करू लागले. त्यामुळे काहीजण व्यवसायातही (Business) पैज लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काही लोक अजूनही रोजगाराच्या शोधात आहेत. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी व्यवसाय करण्याचा विचार करत … Read more