Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सध्या गुन्हेगारी घटनांचा अगदी उतमात झाला असल्याचे चित्र आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातून टोळीयुद्ध झाल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना बेलापूर येथील खटकाळी गावठाण येथे झाली असून येथे दोन गटात टोळीयुध्द झाले. यात एका विधवेच्या घरासह जाळपोळ, वाहनांची मोडतोड आसा प्रकार घडला. तथापि या घटनेचा बोभाटा झाला असला तरी फिर्याद देण्यास कोणीही धजावत नसल्याने पोलिसच याप्रकरणी फिर्यादी होणार असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटकाळी गावठाण हे नेहमीच संवेदनशील असते. येथे कायम लहानमोठ्या तक्रारी होत असतात. अनेक सराईत गुन्हेगारांचा येथे वावर असतो. तसेच काही तडीपार गुंडही येथे राजरोसपणे आश्रय घेताना दिसत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दरम्यान, सोमवारी संध्याकाळी दोन गट एकमेकांना भिडले. यात एका विधवा महिलेचे घरही जाळण्यात आले. याशिवाय वाहनांची मोडतोड व जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रकार राजरोजपणे घडला. आज दिवसभर या घटनेची चर्चा होत होती.
इतका भयानक टोळीयुध्दाचा प्रकार घडूनही दहशतीमुळे कोणीही फिर्याद दाखल करण्यास धजावत नाही. अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना या घटनेबाबत अवगत केल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत स्वतः फिर्याद दाखल करण्याचे ठरविले असून मंगळवार संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती काल (मंगळवारी) मिळाली होती.
या घटनेमुळे गावठाण परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेवून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नुकतेच नगर शहरात किरकोळ वादातून अगदी गोळीबार करण्यापर्यंत घटना घडली होती. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर फिरत होते.