Ahmednagar Politics : शरद पवार अहमदनगरमध्ये मुक्काम ठोकणार ! आज सभेनंतर रात्री मुक्काम कशासाठी? काय फिरू शकतील राजकीय गणिते? पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव. त्यांच्या राजकीय खेळी भल्याभल्या दिग्गजांनाही घाम फोडतात. दरम्यान आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने शरद पवार यांनी मोठी तयारी सुरु केली आहे.

आपले राजकीय खेळीतले एकेक पत्ते बाहेर ते काढत आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारांच्या मतदारसंघात आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी सभा व इतर राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

आता ते अहमदनगरमध्ये सभा तर घेणारच आहेत पण रात्री ते नगरमध्ये मुक्कामही करणार आहेत. दिवसभर नगर शहरात तळ ठोकून ते दिवसभर गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर ते सायंकाळी नगर शहरात सभा घेणार आहेत.

विशेष म्हणजे सभेनंतर ते येथे मुक्कामही ठोकणार आहेत. या काळात बरीच राजकीय उलथापालथ होईल असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांचा नगर शहरात पहिलाच राजकीय दौरा असून आल्यानंतर नगर शहरातील एका हॉटेलमध्ये थांबतील. त्याठिकाणी विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या भेटीगाठी व बोलाचाली होतील.

यावेळी ते जुने व जाणते कार्यकर्ते लंके यांच्या प्रचारासाठी सक्रिय करू शकतील असे म्हटले जात आहे. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जुन्या आणि जाणत्या राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बैठकीसाठी येथे बोलावले आहे.

त्यानंतर सायंकाळी सात वाजता नगर शहरातील गांधी मैदानात शरद पवार हे जाहीर सभा घेतील. विशेष म्हणजे या पहिल्याच सभेसाठी या सभेसाठी आ. बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत उपस्थित राहणार असल्याने अनेकांचे त्यांच्या भाषणाकडे लक्ष असणार आहे. सभेनंतर मात्र ते माघारी न जाता शहरात रात्री मुक्काम करणार आहेत.

या मुक्कामात ते रात्री पहिल्या फळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती समजली आहे. यावेळी अजित पवार गटात गेलेल्या काही नेत्यांनाही ते आपलेसे करू शकतील असे म्हटले जात आहे. दरम्यान ही लोकसभेची लढत विखे-लंके यांच्यात असली, तरी यामागे शरद पवार आणि राधाकृष्ण विखे या दोन दिग्गजांमध्ये ही लढत असणार असल्याच्या चर्चा आहेत.