राज्यातील महायुतीच्या ‘या’ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार ! ओपिनियन पोल भाजपा-महायुतीची डोकेदुखी वाढवतोय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Lok Sabha Election : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते सज्ज झाले आहेत. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. तथापि, अजूनही महाराष्ट्रातील महायुतीमधील भाजपा वगळता इतर पक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भारतीय जनता पक्षाने सुद्धा राज्यातील फक्त 20 उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. त्यांचे देखील इतर उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.

दरम्यान इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तिकीटसाठी पक्षात फिल्डिंग लावली जात आहे. राजकीय पक्ष देखील लवकरात लवकर आपल्या अधिकृत उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे लवकरच उमेदवारीवरून महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमधला गुंता सुटेल अशी आशा आहे. दुसरीकडे मतदारराजा देखील आता गेल्या पाच वर्षांचा परफॉर्मन्स पाहून आपला नेता निवडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अशातच मात्र काही ओपिनियन पोल समोर येत आहेत. त्यामधून कोणत्या पक्षाचा विजय होईल, कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो ? याबाबत एक अंदाज समोर येत आहे. असाच एक ओपिनियन पोल आहे इंडिया टीव्ही- सीएनएक्सचा या ओपिनियन पोल मध्ये या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांवर कोणाचा विजय होऊ शकतो याचा अंदाज बांधला गेला आहे. यातून समोर आलेल्या अंदाजानुसार, यावेळी निवडणुकीत भाजपा प्रणित महायुतीच्या काही जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार आहे.

तथापि महायुतीला यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला मात्र यावेळी 48 पैकी 13 जागा मिळणार आहेत. यात उबाठा शिवसेनेला 8, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3, काँग्रेसला 2 अशा एकूण 13 जागा   मिळणार असा अंदाज आहे. दरम्यान या 13 जागांमध्ये अशा काही जागा आहेत ज्यावर सध्या स्थितीला भाजपाचा किंवा महायुतीमधील इतर घटक पक्षांचा खासदार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया महायुती मधील कोणत्या विद्यमान खासदारांना यंदाच्या निवडणुकीत फटका बसू शकतो.

नाशिक : या जागेवर शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. विशेष म्हणजे विद्यमान खासदारांनाच या जागेवर पुन्हा एकदा तिकीट मिळणार आहे. परंतु एक्झिट पोल नुसार या जागेवरून शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव होऊन त्या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवाराची विजयी होण्याची शक्यता अधिक आहे.

माढा : या जागेवर भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकर हे खासदार आहेत. विशेष म्हणजे विद्यमान खासदारांनाच भाजप पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तथापि यावेळी निंबाळकर यांचा पराभव होऊन या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकू शकतो असा अंदाज या ओपिनियन पोल मधून समोर आला आहे.

शिर्डी : या जागेवर शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. सदाशिव लोखंडे हे या जागेवरून दोनदा खासदार राहिले आहेत. सध्याची त्यांची दुसरी टर्म आहे. ते तिसऱ्या टर्मसाठी पुन्हा एकदा रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. ते सध्या शिंदे गटात असून शिंदे गट त्यांना उमेदवारी देऊ शकते अशा चर्चा आहेत. पण अजूनही महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. परंतु जर या जागेवरून सदाशिव लोखंडे हे पुन्हा उभे राहिले तर कदाचित या जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक राहील असा अंदाज आहे.

हिंगोली : येथे शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत. विशेष म्हणजे पुन्हा एकदा त्यांनाच तिकीट मिळू शकते असा अंदाज आहे. परंतु या जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता ओपिनियन पोल मधून समोर येत आहे.

रामटेक : कृपाल तुमाने हे येथील खासदार आहेत. ते शिंदे गटातील आहेत. ते दोनदा खासदार बनले आहेत. आता तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी काँग्रेस या जागेवर बाजी मारणार असा अंदाज आहे.

हातकणंगले : शिंदे गटातील धैर्यशील माने हे सध्या जागेवरून खासदार आहेत. त्यांनाच या जागेवरून पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र या जागेवरून ठाकरे शिवसेना यांचा उमेदवार विजयी होईल असा अंदाज आहे.

कोणत्या जागेवर कोणता राजकीय पक्ष विजयी होणार 

मुंबई उत्तर – भाजप

मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना

मुंबई उत्तर पूर्व – भाजप 

मुंबई उत्तर मध्य – भाजप

मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना

मुंबई दक्षिण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

नंदूरबार -भाजप

धुळे – भाजप

जळगाव -भाजप

दिंडोरी -भाजप

नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

बुलढाणा – शिवसेना

अकोला – भाजप

अमरावती – भाजप

वर्धा –  भाजप

रामटेक – काँग्रेस

नागपूर – भाजप

भंडारा-गोंदिया – भाजप

गडचिरोली चिमूर -भाजप

चंद्रपूर – भाजप

यवतमाळ वाशिम – शिवसेना

हिंगोली – काँग्रेस

नांदेड – भाजप

परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

जालना – भाजप

छत्रपती संभाजीनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

लातूर – भाजप

बीड – भाजप

पालघर – भाजप

भिवंडी – भाजप

कल्याण – शिवसेना 

ठाणे – शिवसेना

रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस

मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

पुणे – भाजप

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस

शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

अहमदनगर – भाजप

शिर्डी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

सोलापूर – भाजप 

माढा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

सांगली – भाजप

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस

हातकणंगले – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

या पोलमध्ये 25 जागा भाजप जिंकणार असा अंदाज वर्तवला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चार जागा, शिवसेना शिंदे गट 6 जागा जिंकणार असे म्हटले गेले आहे. तसेच उबाठा शिवसेना -8 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा आणि काँग्रेस दोन जागा जिंकेल असा अंदाज दिला गेला आहे. तथापि हा एक अंदाज आहे. प्रत्यक्षात जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे समजू शकणार आहेत.