भारतीयांना पाकिस्तानी कलाकारांची भुरळ ! ‘या’ 5 पाकिस्तानी टीव्ही मालिका भारतात आहेत खूपचं लोकप्रिय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pakistani Serial Famous in India : भारतात बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी सिनेसृष्टीचे नवनवीन चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही मालिका दर आठवड्याला रिलीज होत असतात. प्रेक्षकांच्या माध्यमातून या चित्रपटांना आणि वेब सिरीजला मोठी पसंती देखील मिळते. आवडत्या हीरो-हीरोइनचे सिनेमे पाहणे कोणीच सोडत नाही. वीकेंड असला तर सिनेप्लेक्सला मोठी गर्दी होत असते. तर काही लोक वेब सिरीज आणि टीव्ही मालिकेला देखील मोठी पसंती दाखवतात.

मात्र भारतीय कलाकारांसोबतच पाकिस्तानी कलाकारांच्या टीव्ही मालिका देखील आपल्या देशात विशेष लोकप्रिय आहेत. अनेक लोक पाकिस्तानी कलाकारांच्या टीव्ही मालक का पाहतात. देशात त्यांच्या अभिनयाला भरभरून असा प्रतिसाद मिळतोय. पण जर तुम्ही भारतीय वेब सिरीज आणि टीव्ही मालिका व्यतिरिक्त काही वेगळे आणि लवकर संपणारी टीव्ही मालिका पाहण्याच्या मूडमध्ये असाल तर तुम्ही पाकिस्तानातील काही ड्रामा आणि सीरियल्सचा आनंद घेऊ शकता.

या पाकिस्तानी मालिकांचं भारतातही खूप कौतुक होत आहे. या मालिकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते भारतीय मालिकांप्रमाणे वर्षानुवर्षे चालत नाहीत, तर 20 ते 30 भागांमध्ये संपतात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतात कोणत्या पाकिस्तानी मालिकांना चांगला प्रतिसाद मिळतोय.

जिंदगी गुलजार है : ही पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही सीरियल आहे. या सिरीयलला पाकिस्तान मध्ये मोठे प्रेम मिळाले आहे. शिवाय ही भारतीय लोकांनाही खूप आवडते. फवाद खान आणि सनम सईदच्या अभिनयाने निर्मित ही मालिका भारतीय लोक आवडीने बघतात. या मालिकेचा आता भारतात एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.

या मालिकेचे एकूण २६ भाग आहेत आणि हा कार्यक्रम तुम्ही यूट्यूब चॅनलवर विनामूल्य पाहू शकता. याशिवाय तुम्ही ही पाकिस्तानी मालिका OTT प्लॅटफॉर्म Netflix वर देखील पाहू शकता. विशेष बाब म्हणजे ही मालिका आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि युट्युबवर उपलब्ध असल्याने या मालिकेचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.

हमसफर : हमसफर एक लोकप्रिय पाकिस्तानी पारिवारिक टीव्ही सिरीयल आहे. यात फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. खरे तर या दोघांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा अनेकांना असते. केवळ पाकिस्तानी लोकांनाच नाही तर भारतीय प्रेक्षकांना सुद्धा या दोघांनी एकत्रित केलेले काम खूपच आवडते.

या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना मनमुराद आनंद देऊन जाते. आता या दोघांचा भारतातही मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. ही सिरीयल तुम्ही यूट्यूब चॅनलवर मोफत पाहू शकता. याशिवाय तुम्ही ही पाकिस्तानी मालिका OTT प्लॅटफॉर्म Netflix वर देखील पाहू शकणार आहात.

ओ रंगरेजा : ही आणखी एक लोकप्रिय पाकिस्तानी टीव्ही मालिका आहे. पाकिस्तानमध्ये ही मालिका इमोशनल शो म्हणून ओळखली जाते. या मालिकेला पाकिस्तानात खूपच पसंत केले जात आहे. या मालिकेतील कथा खूपच इमोशनल असून ही कथा तुम्हाला सुद्धा भावूक करणार आहे. या मालिकेत सजल अली, बिलाल अब्बास खान आणि सना यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. जर तुम्हाला ही सिरीयल बघायची असेल तर तुम्ही नेटफ्लिक्स अॅपवर ही ३१ भागांची मालिका पाहू शकता.

मेरे हमसफर : हमसफर प्रमाणेच मेरे हमसफर देखील एक लोकप्रिय पाकिस्तानी टीव्ही मालिका म्हणून ओळखली जाते. हानिया आमिर आणि फरहान सईदने या मालिकेत मुख्य रोल साकारलेला आहे. ही पाकिस्तानी मालिका भारतीय लोकांच्या मनात घर करून गेली आहे. 40 भागांची ही मालिका लोकांना इमोशनली कनेक्ट करत आहे. या मालिकेतील कथा लोकांना खूपच आवडू लागली आहे. जर तुमचाही ही मालिका बघण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही कोणत्याही यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता. या मालिकेची फॅन फॉलोइंग भारतात अविश्वसनीयरीत्या वाढली आहे.

सुनो चंदा : भारतात टीव्ही मालिका वेब सिरीज ड्रामा चित्रपट यांची कमी नाही. भारतात रोजच नवीन चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होत असते. यामुळे वर्षभर रोज नवीन सिनेमा बघितला तरी देखील भारतातील संपूर्ण चित्रपट आणि मालिका पाहणे अशक्य आहे. पण असे असले तरी सुनो चंदा ही पाकिस्तानी मालिका भारतात लोकप्रिय होऊ लागली आहे.

जर तुम्हाला टीव्ही मालिका पाहून तुमचा मूड फ्रेश करायचा असेल तर तुम्ही ही मालिका पाहू शकता. या मालिकेत नवीन कथा आहे. इकरा अजीज आणि फरहान सईद यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली आहे. पण ही मालिका इतर पाकिस्तानी मालिकांपेक्षा थोडी लांब आहे. लांबलचक असली तरी देखील या मालिकेतील कथा ही लोकांना आवडणार आहे. मात्र ही मालिका अद्याप युट्युबवर आलेली नाही.