Indian Railway Station: भारतातील ‘हे’ रेल्वे स्टेशन आहेत वैशिष्ट्यपूर्ण! या स्टेशनवरून जातात परदेशात ट्रेन, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway Station:- भारताची लाईफ लाईन म्हटले जाणाऱ्या रेल्वे नेटवर्कचा विचार केला तर हे प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील खूप फायदेशीर असे नेटवर्क असून देशाच्या आर्थिक विकासामध्ये रेल्वे नेटवर्कचा खूप मोठा हातभार आहे.

भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत व पश्चिमे पासून ते पूर्वेपर्यंत भारतीय रेल्वेचे नेटवर्क विस्तारले असून  त्यामध्ये आणखीन नवनवीन रेल्वे मार्गांची भर पडताना दिसून येत आहे. लाखो प्रवासी दररोज रेल्वेच्या माध्यमातून देशांतर्गत प्रवास करतात. भारतीय रेल्वेचा विचार केला तर भारतीय रेल्वेचे अनेक वैशिष्ट्ये आहेत.

तसेच भारतामध्ये बरेच रेल्वे स्टेशन असून  त्यातील काही रेल्वे स्टेशन खूप काही वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी भरलेले असे आहेत. जर आपण भारतातील काही रेल्वे स्टेशनचा विचार केला तर त्या ठिकाणाहून तुम्ही थेट विदेशात प्रवास करू शकतात. त्यामुळे या लेखात आपण भारतातील या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनविषयी माहिती घेणार आहोत.

 भारतातील या रेल्वेस्थानकांवरून तुम्ही जाऊ शकतात दुसऱ्या देशात

1- हल्दीबारी रेल्वे स्टेशन जर आपण भारतातील हलदी बारी या पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनचा विचार केला तर बांगलादेश या देशाच्या सीमेपासून साडेचार किलोमीटर अंतरावर हे स्टेशन आहे. या स्टेशनवरून तुम्ही बांगलादेश मध्ये जाऊ शकतात.

2- पेट्रापोल रेल्वे स्टेशन पेट्रोल रेल्वे स्टेशन हे 24 परगाना जिल्ह्यात म्हणजेच पश्चिम बंगाल राज्यात असून भारत-बांगलादेश बॉर्डर जवळ आहे. या स्टेशनवरून तुम्ही थेट बांगलादेशामध्ये प्रवेश करू शकता.

3- राधिकापुर रेल्वे स्टेशन बांगलादेशामध्ये आसाम आणि बिहार मधून आवश्यक माल नेण्याकरिता या रेल्वे स्थानकाचा वापर केला जातो. राधिकापुर रेल्वे स्टेशन हे उत्तर दिनाजपुर या पश्चिम बंगालमधील जिल्ह्यात असून या ठिकाणाहून थेट बांगलादेशला ट्रेन जाते.

4- सिंघाबाद रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यामध्ये सिंगाबाद रेल्वे स्टेशन असून बांगलादेशला अगदी जवळ असलेले हे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही येथे उतरून पायी चालत बांगलादेशमध्ये जाऊ शकतात.

5- जयनगर रेल्वे स्टेशन भारत नेपाळ सीमेजवळ बिहार राज्यात मधुबनी जिल्ह्यामध्ये जयनगर रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन नेपाळपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असून जनकपुरच्या कुर्था स्टेशनद्वारे नेपाळशी कनेक्ट आहे. या रेल्वे स्टेशनवर गेला तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने नेपाळला जाऊ शकतात.