Health News : टूथपेस्ट लावण्यापूर्वी ब्रश ओला करणे ठरू शकते घातक, दंतवैद्यांनी सांगितले धक्कादायक कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health News : दररोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येकजण दातांना टूथपेस्ट लावत असतो. टूथपेस्ट लावून तोंड स्वच्छ करण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. सकाळची उठल्यानंतर अनेकांना दात घासायची घाई असते. मात्र अनेकजण चुकीच्या पद्धतीने दात घासत असतात.

सकाळी उठल्यानंतर कमीत कमी २ ते ३ मिनिटे दात घासले पाहिजेत असे दंतवैद्यांकडून सांगण्यात येत असते. मात्र लाखो लोक चुकीच्या पद्धतीने दात घासत असतात. त्यामुळे त्यांना तोंडाच्या अनेक समस्या निर्माण होत असतात.

टूथपेस्ट करण्यापूर्वी अनेकजण चुकीच्या पद्धती वापरत असतात. टूथपेस्ट करण्यापूर्वी अनेकजण ब्रश ओला करतात मात्र दंतवैद्यांकडून असे करणे चुकीचे असल्याचे म्हंटले गेले आहे. चला तर जाणून घेऊया यामागील धक्कादायक कारण

जेव्हा आपण टूथब्रश ओला करतो तेव्हा काय होते?

दंतवैद्य सांगतात की टूथपेस्ट करताना ब्रश ओला करणे हे साफ चुकीचे आहे. कारण टूथपेस्टमध्ये अगोदरच योग्य प्रमाणात आर्द्रता असते आणि जर तुम्ही ब्रशही ओला केला तर जास्त ओलाव्यामुळे फेस लवकर तयार होतो.

टूथपेस्ट करताना तुमच्या तोंडामध्ये लवकर फेस तयार झाला तर तुम्हाला टूथपेस्ट लवकरात लवकर तोंडाबाहेर काढावी लागते. तसेच जोरात दात घासणे आणि ब्रश ओला करून टूथपेस्ट करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

ब्रशवर धूळ पडल्यास काय करावे?

आता अनेकांना प्रश्न पडला असेल की सकाळी उठल्यानंतर धूळ उडालेला ब्रश कसा धुवायचा नाही? तर तज्ज्ञांच्या मते बाजारातून ब्रश विकत घेतल्यानंतर त्यावर टोपी मिळते ती टोपी तुम्ही सतत ब्रश वापरून झाल्यानंतर लावून ठेवा त्यामुळे तुम्हाला ब्रश ओला काण्याची गरज पडणार नाही.

ब्रशचा असा करा वापर

दात कडक असतील ब्रश हा नेहमी चांगला असावा. जेणेकरून दातांच्या फटीमधील घाण स्वच्छरित्या निघून जावी. तसेच दातांच्या कानाकोपऱ्यात ब्रश जावा अशा पद्धतीचा ब्रश वापरण्यास दंतवैद्य सांगतात.

दिवसातून किती वेळा ब्रश करावा?

जे नियमाईतपणे ब्रश करतात त्यांना दिवसातून सतत ब्रश करण्याची गरज नाही. कारण जे चांगल्या पद्धतीने ब्रश करतात त्यांना फक्त एकदा ब्रश करण्याची आवश्यकता आहे असे दंतवैद्य सांगतात. साक्ली उठल्यानंतर ब्रश करणे हे नेहमी आरोग्यसाठी लाभदायक ठरते असेही दंतवैद्यांकडून सांगण्यात आले आहे.

जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तोंडात लाळ कमी होते ज्यामुळे तुम्ही जे अन्न खाता ते तुमच्या दातांमध्ये अडकून रात्रभर खराब होते, ज्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच संध्याकाळीही ब्रश करणे फायद्याचे मानले जाते.