Shukra Gochar : 10 वर्षांनंतर तयार होत आहे ‘हा’ शुभ राजयोग; 4 राशींचे उजळेल नशीब, नोकरीसह अनेक कामात मिळेल यश !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shukra Gochar : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. कारण ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावर देखील दिसून येतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा विशेष योग देखील तयार होतात, ज्याचा सकारात्मक आणि नकारात्मक असा परिणाम दिसून येतो.

अशातच सुख, वैभव आणि संपत्ती देणारा शुक्र 30 नोव्हेंबर रोजी स्वतःच्या राशीत म्हणजे तूळ राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे सुमारे 10 वर्षांनी मालव्य राजयोग तयार होणार आहे, जो 4 राशींसाठी खूप शुभ परिणाम देणारा आहे. या काळात आर्थिक लाभासह अनेक फायदे मिळतील.

तूळ

शुक्राचे संक्रमण आणि तयार झालेला राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जात आहे. या काळात करिअर किंवा बिझनेस संदर्भात काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. या काळात नोकरीमध्ये बढती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. समाजात मान-सन्मानही वाढेल.

या काळात प्रवासाची देखील शक्यता आहे. या राजयोगामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला नफाही मिळू शकतो. या काळात वैवाहिक जीवन देखील छान जाणार आहे. नवीन काम सुरु करण्यासाठी वेळ चांगला मानला जात आहे. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

वृषभ

शुक्र आणि मालव्य राजयोगाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्ही शत्रूंचा पराभव करून विजय मिळवाल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. विवाहितांसाठी काळ उत्तम राहील. येत्या वर्षात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. नोकरीसाठी वेळ चांगला राहील. प्रमोशन, नवीन नोकरी आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला यश देखील मिळेल. प्रवासाचीही शक्यता आहे. वाहन, मालमत्ता, घर खरेदीसाठी हा काळ अतिशय चांगला आहे.

मिथुन

शुक्राच्या हालचालीमुळे तयार झालेला हा योग मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जात आहे. हा काळ विद्यार्थी आणि मुलांसाठी शुभ राहील. नोकरी आणि लग्नाच्या नवीन ऑफर मिळू शकतात. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होईल. व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळू शकतात. अविवाहित लोकांनाही लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. एकूणच येणार काळ खूप शुभ मानला जात आहे.

मेष

शुक्राच्या संक्रमणामुळे निर्माण झालेला हा योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जात आहे. या काळात वैवाहिक जीवनावर शुभ प्रभाव पडेल. अविवाहितांसाठी विवाहाची शक्यता आहे. तुम्हाला संपत्ती आणि इच्छित यश देखील मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ परिणाम देखील प्राप्त होतील. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कामात यश मिळेल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल. मोठा निर्णय घेताना घरच्यांचा सल्ला घ्या.