Steel and Cement Price : कमी बजेटमध्ये बांधा स्वप्नातील घर! स्टील आणि सिमेंटचे दर घसरले, पहा नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel and Cement Price : घर बाधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये देखील स्वप्नातील घर बांधण्याची संधी मिळत आहे. तुम्हीही घर बांधण्याचा विचार करत असाल तर कमी खर्चात घर बांधू शकता.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. वाहतुकीचा खर्च वाढल्याने इतर वस्तूही महाग झाल्या आहेत.

वाढत्या महागाईत घर बाधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. कारण स्टील आणि सिमेंटचे दर उतरले आहेत. तसेच घर बांधण्यासाठी लागणारे इतर साहित्य देखील स्वस्त झाले आहे.

पंतप्रधान आवास योजनेतून पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत

देशात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे पक्के घर नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून नागरिकांना २.५ लाख रुपये दिले जातात.

सरकारकडून दिलेल्या आर्थिक मदतीने तुम्ही देखील घर बांधू शकता. कारण सध्या स्टील आणि सिमेंट खरेदी करण्यासाठी पैसे कमी लागत आहेत. त्यामुळे स्टील आणि सिमेंट खरेदी करताना तुमच्या पैशांची मोठी बचत होत आहे.

सध्या अनेक सरकारी कामे तसे इतर बांधकाम क्षेत्रातील कामे ठप्प आहेत. त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाली आहे. मागणी कमी असल्याने दरही कमी झाले आहेत.

मात्र तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर लवकरच बांधकाम सुरु करा. कारण उन्हळ्यामध्ये स्टिल आणि सिमेंटच्या मागणीत वाढ होते. मागणीत वाढ झाल्याने दरही वाढतात.

स्टीलचे नवीन दर

जालना        महाराष्ट्र         TMT 12mm        55300 रुपये प्रति टन        1-March-23
मुंबई           महाराष्ट्र         TMT 12mm        56000 रुपये प्रति टन        1-March-23
नागपूर        महाराष्ट्र         TMT 12mm        51000 रुपये प्रति टन        1-March-23

सिमेंटचे नवीन दर

गेल्या काही दिवसांपासून सिमेंटच्या किमती देखील कमी होत आहेत. सिमेंटच्या किमती देखील २० ते ६० रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ४०० रुपये प्रति बॅग सिमेंटची पिशवी मिळत होती मात्र आता 350 ते 365 रुपये प्रति बॅग सिमेंट उपलब्ध आहे.