Business Idea: रेल्वेसोबत सुरू करा ‘हा’ दमदार व्यवसाय ! दर महिन्याला होणार जबरदस्त कमाई ; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea: आपल्या देशात कोरोना काळानंतर आज प्रत्येकाला कमी वेळेत जास्त कमाई करायची आहे. यामुळे अनेक जास्त पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत आहे. यातच तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरु करण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही आज तुम्हाला या लेखात एका भन्नाट बिझनेस आयडियाबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा मदतीने तुम्ही अगदी कमी वेळेत जास्त पैसे कमवू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट बिझनेस आयडियाबद्दल संपूर्ण माहिती.

या लेखात आम्ही भारतीय रेल्वेमध्ये सामील होऊन मोठी कमाई करण्याबद्दल बोलत आहोत. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन हा रेल्वेचा एक भाग आहे. रेल्वे प्रवासांना या विभागामार्फत तिकीट बुकिंगपासून ते विविध सुविधा पुरवतात. तुम्ही IRCTC सोबत तिकीट एजंट म्हणून काम करून एका महिन्यात मोठी कमाई देखील करू शकता. तुम्ही बुक केलेल्या तिकिटांवर IRCTC तुम्हाला कमिशन देईल. तिकीट एजंट होण्यासाठी, तुम्हाला नाममात्र शुल्क भरावे लागेल.

indian railways
 

इतके कमिशन मिळवा

IRCTC नॉन-एसी कोच तिकिटांच्या बुकिंगसाठी आपल्या तिकीट एजंटना प्रति तिकिट 20 रुपये आणि एसी वर्ग तिकीट बुक करण्यासाठी 40 रुपये कमिशन देते. याशिवाय तिकिटाच्या किमतीच्या एक टक्का रक्कमही एजंटला दिली जाते. तिकीट बुक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्ही अमर्यादित कमिशन मिळवू शकता. एका महिन्यात तुम्हाला हवी तितकी तिकिटे बुक करू शकता. रेल्वे तिकिटांसोबतच तुम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई तिकीटही बुक करू शकता.

कामाची फी

जर एखाद्या व्यक्तीला एका वर्षासाठी एजंट बनायचे असेल तर त्याला 3,999 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे दोन वर्षांसाठी 6,999 रुपये शुल्क आहे. त्याचबरोबर एजंट म्हणून एका महिन्यात 100 तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी प्रति तिकिट 10 रुपये शुल्क द्यावे लागेल, तर एका महिन्यात 101 ते 300 तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी आठ रुपये शुल्क द्यावे लागेल. एका महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिटे बुक करण्यासाठी, 5 रुपये प्रति तिकीट शुल्क भरावे लागेल.

हे पण वाचा :-  Honda Amaze Price Hike: ग्राहकांनो ही कार खरेदी करण्यास उशीर करू नका ; नाहीतर द्यावे लागणार 12 हजार जास्त