Chanakya Niti : सावधान! लग्नापूर्वी जाणून घ्या तुमच्या जोडीदाराबद्दल या महत्त्वाच्या 4 गोष्टी, काय सांगतात आचार्य चाणक्य?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. समजा तुम्ही आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊन त्या आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला सर्व प्रकारच्या अडचणींपासून वाचवू शकता.

चाणक्य यांची धोरणे सतत धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार लग्न करण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो.

सर्वांसाठी लग्न हे खूप खास असून सर्वांनाच आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती यावी, जी त्याला सर्व प्रकारचे प्रेम देईल तसेच त्याची काळजी घेईल. असे म्हटले जाते की एक चांगला जीवनसाथी जीवनात आनंद आणू शकतो. अशातच जर तुम्हीही जीवनसाथी निवडण्याची तयारी करत असल्यास तुम्ही आचार्य चाणक्य नीतीनुसार काही गोष्टींची काळजी घ्यावी.

अनेक लोक असे असतात की लग्नानंतर त्यांचे जीवन खूप जास्त आनंदी होते, मात्र अनेक लोकांच्या लग्नानंतरच्या जीवनात वाद होतात. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीच्या आकर्षणाच्या मागे सर्व काही सोडून त्या व्यक्तीशी लग्न करतो.

आपण त्या व्यक्तीमधील काही गोष्टीही समजू शकत नाही. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये असाच एक श्लोक सांगितला आहे, ज्यात असे सांगितले आहे की लग्न किंवा प्रेम करण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराच्या काही गोष्टी तपासून घ्या.

वरयेत् कुलजन प्रग्यो विरुपमपि कन्यकम् ।
रूपशीलं न निश्चस्य विवाहः सदर्षे कुळे ।

वरील श्लोकानुसार लग्न करण्यापूर्वी जोडीदार निवडत असताना त्या व्यक्तीने शरीराऐवजी गुणांकडे पाहावे.

1. चाणक्य नीतिनुसार पुरुषांनी सुंदर स्त्रीच्या मागे धावू नये. कारण आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार पत्नी सद्गुणी असल्यास ती संकटाच्या वेळीही कुटुंबाची काळजी घेत असते.
2. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, स्त्रीला बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त असणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर, त्याने संयम बाळगायला हवा.
3. चाणक्य नीतीनुसार धार्मिक कर्मावर विश्वास ठेवणारी व्यक्ती ही मर्यादित असून त्यामुळे त्यांची धर्म आणि कामावर किती श्रद्धा आहे हे लग्नापूर्वी समजायला हवे.
4. इतकेच नाही तर क्रोध हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. त्यामुळे याबद्दल चाणक्य असे सांगतात की ज्या स्त्रीला खूप राग येतो ती कुटुंबाला कधीही सुखी ठेवू शकणार नाही.