Hot Air Balloon Ride: भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या आणि हॉट एअर बलून राईडची मजा घ्या! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hot Air Balloon Ride:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना पर्यटनाचे मोठ्या प्रमाणावर करीत असते किंवा हौस असते. यामध्ये जंगल सफारी, जंगल ट्रेकिंग, गड किल्ल्यांची सैर मोठ्या प्रमाणावर अनेक जण करतात. तसेच भारतामध्ये अनेक अभयारण्य असून याठिकाणी विविध वनसंपदा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी पाहण्याची क्रेझ देखील बऱ्याच जणांना असते

व याचा आनंद लुटण्यासाठी बरेच पर्यटक देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देत असतात. यामध्ये अनेक पर्यटकांना सहाशी पर्यटनाची हौस असते. यामध्ये ट्रेकिंग आणि हॉट बलून रायडिंग सारख्या अनेक प्रकारांचा समावेश होतो.

कारण बऱ्याच जणांना आव्हानात्मक गोष्टींचा अनुभव घेण्याची खूप आवड असते व अशी व्यक्ती अशा आव्हानात्मक गोष्टी करत असतात. त्यामुळे जर तुम्हाला देखील हॉट इयर बलून राईडचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही भारतातील काही ठिकाणी जाऊन घेऊ शकतात.

भारतामध्ये अशी कोणती ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हॉट एअर बलून राईडचा आनंद घेऊ शकतात? त्याबद्दलची माहिती घेऊ.

 हॉट एअर बलून राईडसाठी भारतातील ही ठिकाणी आहेत प्रसिद्ध

1- गोवा गोवा हे ठिकाण हॉट एअर बलून राईडसाठी उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही हॉट एअर बलूनमध्ये स्वार होऊ शकतात व समुद्राचे सुंदर आणि विहंगम  दृश्य पाहू शकतात. या ठिकाणी ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान राइडचा आनंद घेता येतो.

2- महाराष्ट्र महाराष्ट्र मधील लोणावळा या ठिकाणी जाऊन तुम्हाला हॉट एअर बलून राईड करता येऊ शकते. हे ठिकाण राईड साठी खूप उत्तम असे ठिकाण असून ते तुम्ही चार ते पाच हजार रुपयांमध्ये एक तास हॉट एअर बलूनची मजा घेऊ शकतात.

3- राजस्थान राजस्थानमध्ये जयपुर या ठिकाणी तुम्ही हॉट एअर बलून राईडच्या आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी परदेशी पर्यटक देखील खूप मोठ्या प्रमाणावर येत असतात. जयपुर शहराचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल व त्या ठिकाणचे सुंदर आणि विहंगम दृश्य पाहायचे असतील तर हॉट एअर बलूनच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येऊ शकते.

4- आग्रा उत्तर प्रदेश हॉट एअर बलून आग्रा येथे ताज महोत्सवाच्या दरम्यान सुरू करण्यात आलेला आहे व आग्राच्या कुबेरपूर भागातून तो सुरू होणार आहे. या माध्यमातून आता हवेतून पर्यटकांना ताजमहाल पाहता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आग्रा शहरातील हॉट एअर बलून सुविधा पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.