प्रेरणादायी ! परिस्थितीने गांजलेल्या 28 वर्षीय तरुणाने सुरु केला ‘हा’ व्यवसाय; आता 30 लाखांचा टर्नओहर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- प्रयत्न करणाऱ्याला आणि इच्छाशक्ती असणाऱ्याला यश हमखास मिळते असे म्हणतात. याचाच प्रत्यय देणारी हि घटना आहे. ही कहाणी आहे राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील रहिवासी आकाशदीप वैष्णव यांची. आकाशदीप सध्या नर्सरीचा व्यवसाय करतो.

त्यांच्याकडे 2 हजाराहून अधिक वनस्पतींचे प्रकार आहेत. तीन ते चार वर्षात त्याने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्याची वार्षिक उलाढाल 30 लाख रुपये आहे. 28 वर्षीय आकाशदीप म्हणतात की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. बारावीनंतरच मी नोकरी शोधू लागलो.

लवकरच नोकरी देखील मिळाली. तो घर खर्च चालवू लागला. त्यानंतर बीकॉम केले. तोपर्यंत पगारही चांगला माळायला लागला होता. पण मला नोकरी करण्यामध्ये आवड नव्हती. यानंतर, 2019 मध्ये मी माझी नोकरी सोडली आणि नवीन कल्पनांवर संशोधन करण्यास सुरवात केली. सुमारे 10 दिवसानंतर मला नर्सरी व्यवसायाबद्दल वाचायला मिळाले.

मला वाटले एकदा या व्यवसायासाठी का प्रयत्न करू नये? मला या व्यवसायाबद्दल माहिती नव्हती. कुटुंबातील कोणी बागकाम केले नाही. हे क्षेत्र माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते. एका नर्सरीमधून काही रोपे आणली आणि एक लहान रोपवाटिका तयार केली.

परंतु, माहिती नसल्यामुळे नुकसान झाले. बहुतेक झाडे वाळून गेली किंवा खराब झाली. त्यानंतर मी एखाद्या तज्ञाला भेटून त्यावर प्रशिक्षण घेण्याचे ठरविले. वनस्पती आणि त्यांच्या वाणांची माहिती घेण्याचे ठरवले. त्यानंतर बेंगळुरू आणि नोएडा येथे प्रशिक्षण घेतले, अनेक सेमिनारमध्ये भाग घेतला. मग त्यानंतर व्यवसाय हळू हळू जमायला लागला. ते म्हणतात की हा व्यवसाय सुरू झाल्यानंतर आम्ही लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या गरजेनुसार फुले व इतर झाडे पुरवायचो.

मग त्यांच्याकडून फीडबॅक देखील घायचो. अशा प्रकारे मागणी हळूहळू वाढू लागली आणि आमची व्याप्ती वाढू लागली. आकाशदीप म्हणतात , आता आम्ही हजारो वनस्पतींसाठी कॉन्ट्रेक्ट घेतो. यासह, आम्ही आता ऑनलाइन ऑर्डर घेतो. वनस्पतींबरोबरच ते देखभालीसाठी लागणाऱ्या वस्तू, भांडी, खते इत्यादी देखील ठेवतात.

जेणेकरून ग्राहकांना बर्‍याच गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. आकाशदीप म्हणतात की जर एखाद्याला नर्सरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याने आधी बाजारपेठ संशोधन केले पाहिजे. कोणत्या वनस्पतींना मागणी आहे आणि ती झाडे कुठे उपलब्ध आहेत याबद्दल आपल्याला माहिती संकलित करण्याची आवश्यकता आहे.

अशी बरीच ठिकाणे आहेत जेथे रोपे कमी किंमतीत उपलब्ध असतात, म्हणून जेथे पैसे वाचतात तेथेच खरेदी करा. ते म्हणतात की आमच्या वनस्पती दक्षिण भारतातून येतात. परंतु मी इतर लोकांप्रमाणे एजंटांवर अवलंबून नाही. मी हे रोपे तयार करणार्‍या शेतकर्‍यांशी थेट भेटतो. शेतकऱ्यांकडून थेट उत्पादन घेतल्यामुळे आमच्यासह त्यांचा फायदा होतो.

यासह, आपल्याला वनस्पतींबद्दल देखील माहित असले पाहिजे, तरच आपण ग्राहकांना सांगू शकता की कोणत्या वनस्पती उन्हात वाढतात आणि कोणत्या सावलीत. आकाशदीप सांगतात की जोपर्यंत फारशी गरज भासली जात नाही तोपर्यंत जास्त कामगार नसावेत. कारण सुरुवातीला अतिरिक्त खर्च व्यवसायाला हानी पोहोचवू शकतात. मी सुरू केल्यावर बहुतेक कामे मी स्वतः केली. बाकीठिकाणी कुटुंबियांनी मदत केली.

जेव्हा व्यवसाय वाढला तेव्हा आम्ही 10-12 लोकांना काम दिले आहे. आकाशदीपकडे सध्या 2 हजाराहून अधिक वनस्पतीचे प्रकार आहेत. त्यांच्याकडे इनडोर आणि आउटडोर दोन्ही वनस्पती आहेत. ते म्हणतात की सर्वाधिक मागणी एअर प्यूरिफायर प्लांट्सला आहे.

आकाशदीपला आता या कामामधून मिळणे उत्पन्नासोबत जॉब सेटिसफेक्शन देखील आहे. त्यांचे म्हणणे आहे की माझे कार्य केवळ लोकांची घरेच सुंदर बनवित नाही तर पर्यावरणाला देखील फायदा करते. लवकरच तो राजस्थानबाहेरही आपला व्यवसाय वाढवणार आहे.

Leave a Comment