Petrol Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर, पहा आजचे नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price : देशात पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती अपडेट केल्या जातात. त्यामुळे ग्राहकांना नवीन दर पाहता येत असतात.

भरतील तेल विपणन कंपन्यांकडून 11 एप्रिल 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम जाहीर केले आहेत. ज्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आज सलग 323 वा दिवस आहे की देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांना जास्तीची आर्थिक झळ बसत आहे.

देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा हा दर आहे

देशातील प्रत्येक शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्याने त्यांचे दर इतर राज्यांपेक्षा कमी आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तसेच कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

21 मे 2022 रोजी उत्पादन शुल्कात कपात

देशातील अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे दरही कमी झाले आहेत आणि नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 8 रुपये तर डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये देखील वाढ होत आहे. या तेजीनंतर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $80 आणि ब्रेंट क्रूड $85 प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले आहे.

देशातील मुख्य शहरातील दर

दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर