Vande Bharat Train: पश्चिम महाराष्ट्रातील ‘हे’ शहर जोडले जाणार वंदे भारतने! रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी दिली महत्त्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Train:- संपूर्ण देशामध्ये अनेक महत्त्वाचे शहरे आणि अध्यात्मिक केंद्र हे वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात येत असून यातून वेगवान आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती प्रवाशांना मिळताना आपल्याला दिसून येत आहेत.

सध्या भारतामध्ये विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस साधारणपणे 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती व ही ट्रेन दिल्ली ते वाराणसी या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये देखील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगरी शिर्डी,

ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर अशा पद्धतीच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून प्रवाशांच्या माध्यमातून देखील यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील एका मार्गावर नवी वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

 महाराष्ट्रातील या मार्गावर धावणार नवी वंदे भारत एक्सप्रेस

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतेच अयोध्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला व या माध्यमातून आता महाराष्ट्रातील एका मार्गावर नवीन वंदे भारतीय एक्सप्रेस धावणार असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली असून नवीन महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेनला रावसाहेब दानवेंनी व्हर्च्युअल पद्धतीने मुंबईतून हिरवा झेंडा दाखवून ती रवाना केली.

राज्यामध्ये जी नवीन ट्रेन सुरू होणार आहे ते कोल्हापूरहून मुंबई मार्गावर धावणार आहे. याविषयी माहिती देताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले की लवकरच मुंबई ते कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार असून या एक्सप्रेसचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व सांगली या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

साधारणपणे दोन महिन्याच्या आत कोल्हापूरला ही वंदे भारत ट्रेनची अनोखी भेट दिली जाईल अशा पद्धतीचे आश्वासन देखील त्यांनी दिले. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर वंदे भारत ट्रेनने जोडले गेल्यामुळे या परिसराच्या विकासाला देखील मदत होईल.

 कशी असते वंदे भारत ट्रेन?

1- जर आपण इतर ट्रेनच्या तुलनेमध्ये वंदे भारत ट्रेनचा विचार केला तर यामध्ये ऑन बोर्ड वायफाय इन्फोटेनमेंट, जीपीएस वर आधारित प्रवासी माहिती प्रणाली तसेच झोपणे योग्य आसने,टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्युम टॉयलेट, एलईडी प्रकाशयोजना तसेच प्रत्येक आसनाखाली चार्जिंग साठी पॉईंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित रीडिंग लाईट आणि कन्सिल्ड रोलर पडदे व आधुनिक मिनी पॅन्ट्री व विशेष म्हणजे इमर्जन्सी टॉप बॅक युनिट यामध्ये कार्यान्वित असते.

2- शुद्ध हवेच्या पुरवठ्यासाठी व उष्णता वायुविजन करिता अतिनील दिव्यांसह वातानुकूलित प्रणाली सारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा देखील यामध्ये देण्यात आलेले आहेत व यामध्ये असलेली इंटेलिजंट वातानुकूलित प्रणाली ही हवामानाच्या परिस्थितीनुसार कूलिंगची ऍडजस्टमेंट करते.

3- ही स्वदेशात तयार झालेली सेमी हाय स्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन असून ती 160 किमी प्रति तास वेग घेण्यासाठी 129 सेकंदाचा वेळ घेते.

4- तसेच या ट्रेनमध्ये स्वयंचलित असे प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे देखील आहेत.

5- ट्रेनच्या एक्झिक्युटीव्ह क्लासमध्ये  रिवोल्वीहंग सीट्स देण्यात आलेले आहेत.

6- दिव्यांग प्रवासांसाठी विशेष शौचालयाची सुविधा यामध्ये आहे व टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्युम टॉयलेटची सोय आहे.

7- विशेष म्हणजे ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल देण्यात आलेले आहेत.

8- तसेच चार प्लॅटफॉर्म साईड कॅमेरे देण्यात आलेले असून ज्यामध्ये डब्याच्या बाहेर मागील दृश्य कॅमेऱ्याचा समावेश आहे.

9- प्रत्येक कोच मध्ये चार आपत्कालीन खिडक्या देण्यात आलेले असून इमर्जन्सी टॉप बॅक युनिव्हर्स देण्यात आलेले आहेत.

यासह इतर अनेक सोयी सुविधा या वंदे भारत ट्रेनमध्ये देण्यात आलेले आहेत.