IRCTC Kashmir Tour Package: काश्मीर फिरण्यासाठी मार्च आहे उत्तम कालावधी! काश्मीर टूर पॅकेजचा फायदा घ्या आणि कमी बजेटमध्ये काश्मीर फिरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IRCTC Kashmir Tour Package:- भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे अशा पर्यटन स्थळांना अनेक विदेशातून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी भेट देत असतात. यामध्ये काही पर्यटन स्थळांना किंवा काही राज्यांना भेट देताना आपल्याला काही कालावधी किंवा एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये गेले तर खूप फायद्याचे ठरते.

या मुद्द्याला धरून जर आपण काश्मीरचा विचार केला तर या ठिकाणी जर तुम्हाला पर्यटनासाठी जायचे असेल तर साधारणपणे मार्चपासून या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम कालावधी असतो. कारण आपल्याला माहित आहे की काश्मीर म्हटले म्हणजे त्या ठिकाणी बर्फ मोठ्या प्रमाणावर असतो.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून या ठिकाणी जो काही गोठलेला बर्फ असतो तो वितळायला लागतो व या महिन्यापासून बर्फाच्छादित पर्वत आणि झाडे देखील हिरवीगार दिसायला लागतात. त्यामुळे हा मार्च महिन्याचा कालावधी हा काश्मीर फिरण्यासाठी उत्तम मानला जातो.

या दृष्टिकोनातून जर तुम्ही अजून पर्यंत काश्मीरला गेले नसाल व तुमची इच्छा असेल तर आयआरसीटीसीच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे व त्यामध्ये तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये भारताचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर पाहू शकतात. आयआरसीटीने काश्मीर फिरण्यासाठी एक विशेष पॅकेज आणलेले आहे व त्या अंतर्गत तुम्ही हा लाभ घेऊ शकतात.

 जम्मू आणि काश्मीर एक्सनागपूर  टूर पॅकेज

 हे पॅकेज आयआरसीटीसीच्या माध्यमातून आणण्यात आलेले असून ते सात रात्री आणि आठ दिवस इतक्या कालावधीची आहे. यामध्ये तुम्ही फ्लाईटने प्रवास करणार असून या पॅकेज अंतर्गत तुम्ही काश्मीर येथील गुलमर्ग,

जम्मू, पहगाम आणि श्रीनगर ही डेस्टिनेशन पाहू शकणार आहात. याची सुरुवात साधारणपणे 29 मार्च 2024 पासून सुरु होणार असून पाच एप्रिल 2024 पर्यंत या माध्यमातून पर्यटन घडवले जाणार आहे.

 या पॅकेज अंतर्गत कुठल्या सुविधा मिळतील?

 या पॅकेज अंतर्गत राऊंड ट्रीप फ्लाईट साठी इकॉनोमि क्लासचे तिकीट मिळणार आहे व राहण्यासाठी हॉटेलच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. एवढेच नाही तर या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

 या पॅकेज अंतर्गत किती आहे तिकीट दर?

1- या पॅकेज  अंतर्गत तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 55 हजार 100 रुपये द्यावे लागणार आहेत.

2- दोन लोकांना प्रतिव्यक्ती 46 हजार रुपये इतकी तिकीट दर आहेत.

3- तीन लोकांना प्रतिव्यक्ती 44 हजार रुपये फी भरावी लागणार आहे.

4- तुमच्यासोबत मुले असतील तर त्यांचे वेगळे शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये बेडसाठी(5 ते अकरा वर्षे वय) 40400 तर बेडशिवाय 36 हजार आठशे रुपये द्यावे लागणार आहेत.

 या टूर पॅकेजसाठी कसे कराल बुकिंग?

 याकरता तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून बुकिंग करता येऊ शकणार आहे. तसेच आयआरसीटीसीचे पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालय, प्रादेशिक कार्यालय मधून देखील बुकिंग करता येऊ शकणार आहे. तुम्हाला

जर या पॅकेज विषयी जास्तीची माहिती हवी असेल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती घेऊ शकतात.