AAI Recruitment 2022 : 10वी पास असाल तर मिळेल सरकारी नोकरी, AAI मध्ये या पदांवर होणार भरती; सविस्तर माहिती वाचून करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI Recruitment 2022 : एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (Airports Authority of India) सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असलेल्या लोकांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. यामध्ये एकूण 156 पदांसाठी अर्ज (Application) मागवले आहेत.

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हाला विमानतळ प्राधिकरणासोबत काम करण्याची इच्छा असेल तर उशीर न करता आत्ताच अर्ज करा. त्याची अंतिम तारीख (Last date) 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना (candidates) अर्ज करायचा आहे. ते विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकतात.

कोणती पदे आहेत?

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 156 पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत त्यापैकी 132 कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) साठी आहेत. कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) साठी 10 पदे आहेत. वरिष्ठ सहाय्यक (खाते) साठी 13 जागा आणि वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) साठी एक पद रिक्त आहे.

पात्रता काय असावी?

यापैकी, कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) पदासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त शाळेतून 10वी उत्तीर्ण आणि तीन वर्षांच्या डिप्लोमा प्रोग्रामसह किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत.

वरील पदांसाठीही पदवीची मागणी करण्यात आली आहे. काही पदांसाठी टायपिंगची मागणीही करण्यात आली आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत वेबसाइट aai.aero वर जा आणि पात्रता निकष तपशीलवार तपासा.

अर्जदाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. ही नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल. यासोबतच तुमची शारीरिक तंदुरुस्तीही चांगली असली पाहिजे.

पगार किती असेल?

विमानतळ प्राधिकरण या पदांवर निवडलेल्या लोकांना भरघोस पगार देणार आहे. कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) साठी, 31000-92000 रुपये मासिक वेतन निश्चित केले आहे.

कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) यांनाही 31000-92000 रुपये मासिक वेतन मिळेल. वरिष्ठ सहाय्यक (खाते) आणि वरिष्ठ सहाय्यक (अधिकृत भाषा) यांना 36000-110000 रुपये मासिक वेतन (Monthly salary) निश्चित केले आहे.