Bombay High Court Recruitment : बॉम्बे उच्च न्यायालया अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सध्या भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “जिल्हा न्यायाधीश” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

जिल्हा न्यायाधीश पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. त्यासाठी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा. येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार https://bhc.gov.in/jorecruitment2023/ या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकतात. तर अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 35 ते 48 वर्षे इतकी आहे. या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्जामध्ये माहिती पूर्ण भरलेली असावी अपूर्ण नाकारले जातील.
-अर्ज 23 जानेवारी 2024 रोजी सादर करायचे असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.