IBPS RRB Mains Admit card 2022 : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! RRB Mains चे प्रवेशपत्र जारी, खाली क्लिक करून डाउनलोड करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS RRB Mains Admit card 2022 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) द्वारे आयोजित RRB मुख्य परीक्षा 2022 मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी (Student) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वास्तविक या परीक्षेचे प्रवेशपत्र IBPS ने जारी केले आहे.

जे उमेदवार मुख्य परीक्षेला बसतील ते IBPS च्या अधिकृत साइट ibps.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे (LinK) एका क्लिकवर परीक्षेचे प्रवेशपत्र (admit card) देखील डाउनलोड करू शकतात.

मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

IBPS च्या अधिकृत साईटला ibps.in वर भेट द्या.
मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या IBPS RRB Mains Admit Card 2022 लिंकवर क्लिक करा.
लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
– तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
– प्रवेशपत्र तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवा.

मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन मुख्य परीक्षेत प्रत्येकी एक गुणाचे 200 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असतो. अंतिम वाटपासाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ऑनलाइन मुख्य परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत किमान गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन मुख्य परीक्षेचे कॉल लेटर 12 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2022 पर्यंत उमेदवारांसाठी उपलब्ध असेल. ही परीक्षा 24 सप्टेंबर 2022 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.