गुड न्युज ! महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन पदभरती, 12 वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahanagarpalika Job : तुम्हीही बारावी पास आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही बारावी पास असाल आणि नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची ठरणार आहे. कारण की, राज्याच्या एका मोठ्या महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन पदभरती जारी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यासाठीच्या अधिसूचना देखील सदर महानगरपालिकेने निर्गमित केली आहे. तसेच या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेत ही भरती निघाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या भरती अंतर्गत कोणती रिक्त पदे भरली जातील, यासाठी कोणते उमेदवार पात्र राहतील, अर्ज प्रक्रिया कशी राहील, अर्ज केव्हापर्यंत सादर करावे लागतील, अर्ज भरण्याची प्रोसेस कशी असेल ? याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

मुंबई महानगरपालिकेत दोन रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. महापालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महापालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि हेमोडायलिसिस तंत्रज्ञ या दोन पदाच्या रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

किती जागांसाठी होणार भरती ?

या पदभरती अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या सात रिक्त जागा आणि हेमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदाच्या तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्थातच या भरतीच्या माध्यमातून महापालिकेत रिक्त असलेल्या दहा जागा भरणे प्रस्तावित आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता ? 

या दोन्ही पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवून देण्यात आली आहे. यातील डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी कला / वाणिज्य / विज्ञान शाखेचा पदवीधर अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता असलेला उमेदवार पात्र राहणार आहे. मात्र उमेदवार आणि किमान 45% गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक राहील. उमेदवाराकडे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

याशिवाय मराठी आणि इंग्लिश टायपिंगचे मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र सदर उमेदवाराकडे असणे आवश्यक राहील. दुसरीकडे हेमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी किमान बारावी पास उमेदवार पात्र राहील. विज्ञान शाखेतील उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे. उमेदवाराने तत्सम सहा महिन्यांचा कोर्स केलेला असणे अनिवार्य राहणार आहे.

पगार किती मिळणार बरं?

या पदभरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना महिन्याकाठी 18 ते 20 हजार रुपयांचा पगार मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा लागणार? 

या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. विहित नमुन्यात भरलेला अर्ज इच्छुक उमेदवारांना बा.य.ल , नायर धर्मा. रुग्णालय डॉ.ए.एल नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई – 400008 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक ? 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावा लागणार आहे. कारण की या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 15 मार्च 2024 ही आहे. यामुळे उमेदवारांना या विहित कालावधीमध्ये आपला अर्ज प्राधिकरणाकडे सादर करायचा आहे.

जाहिरात कुठे पाहणार ?

खाली दिलेल्या लिंकवर जाऊन या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.

https://drive.google.com/file/d/1sxDhrD2QEBYVujr3sbm1MmxQGaGaRZtF/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1PTTyvXEF7tiIbayUk2YKJzD-AyvzOIUx/view?usp=drivesdk