NCL Pune Bharti 2024 : पदव्युत्तर आहात…पुणे एनसीएलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी दवडू नका; मिळणार 31 हजार रुपये पगार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरती अंतर्गत पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

या भरती साठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 04 मे 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.ncl-india.org/ ला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 31,000/- इतके वेतन मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://jobs.ncl.res.in/Default या लिंकद्वारे सादर करायचे आहे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी ncl-india.org संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर सूचना वाचाव्यात.

-लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 आहे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.