Mumbai Railway Police Bharti 2024 : मुंबई लोहमार्ग पोलीस अंतर्गत शिपाई आणि चालक पदाच्या जागेसाठी भरती सुरु…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway Police Bharti 2024 : मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण (शिपाई :५१ + चालक : ४) 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु झाले असून, उमेदवार ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे तसेच मागासवर्गीय वर्गासाठी 18 ते 33 वर्षे इतकी आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी 12th Pass उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज शुल्क देखील अनिवार्य असेल, खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 450 /- तर मागास वर्गासाठी हे शुल्क 350 /- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज ३१ मार्च २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास mumbairlypolice.gov.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे सादर करायचा आहेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे देखील आवश्यक आहे.

-देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

 PDF जाहिरात शिपाई

PDF जाहिरात चालक

निवड प्रक्रिया

शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी.