AFMC Pune Bharti 2024 : लवकर करा..! पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदासाठी निघाली भरती…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AFMC Pune Bharti 2024 : पुण्यातील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असून, उमेदवारांनी आजच्या आज आपले अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज “संचालक आणि कमांडंट” (HoD मायक्रोबायोलॉजी), आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे सोलापूर रोड, रेस कोर्स समोर, पुणे, महाराष्ट्र, पिन कोड: 411040 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. तरी उमेदवारांनी आजच अर्ज करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास https://afmc.nic.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असून, उमेदवारांनी आजच आपले अर्ज सादर करावे.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती पूर्ण भरणे आवश्यक आहे. अर्जात माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे देखील गरजेचे आहे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.