Successful Farmer: ‘या’ पट्ठ्याने तर कमालच केली चक्क लाल जर्दाळूची शेती केली; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi News: भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या उदरनिर्वाहसाठी शेती व्यवसायावर (Farming) अवलंबून असल्याने आपल्या अर्थव्यवस्थेला कृषी प्रणित अर्थव्यवस्था (Agriculture based economy) असे म्हणतात.

म्हणजेच काय तर आपली अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत चांगलं उत्पन्न (Farmers Income) मिळवीत असतात. मित्रांनो आपल्या देशात जर्दाळू पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले जाते.

जर्दाळू हे एक फळ आहे, ज्याला इंग्रजीत एप्रिकोट (Apricot) म्हणतात आणि पर्शियनमध्ये येलो पोटॅटो (yellow potato) म्हणतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते शिवाय मागणी देखील खूप अधिक आहे.

हे फळ लहान पीच सारखे दिसते. तज्ज्ञांच्या मते, गेल्या 5 हजार वर्षांपासून भारतात याचे पीक घेतले जात आहे. जर आपण जर्दाळूच्या झाडाबद्दल बोललो तर ते आकाराने लहान असते. याची लांबी ही 7 ते 12 मीटर असते.

जर्दाळूच्या जाती 

जर्दाळू हे फळ रंगीबेरंगी असते, म्हणजेचं हे फळ पांढरे, काळे, गुलाबी आणि तपकिरी (राखाडी) आणि काही जर्दाळू लाल रंगाचे असतात. मात्र याचा रंग जर्दाळूच्या चवीवर कोणताचा विपरीत परिणाम करत नाही, परंतु त्यातील कॅरोटीन नामक घटक फळाच्या रंगावर अवलंबून असते.

आतापर्यंत आपण या लेखात जर्दाळूंबद्दल जाणून घेतले आहे, परंतु आता आपण हिमाचल प्रदेशच्या एका शेतकऱ्याबद्दल जाणुन घेणार आहोत, ज्याने लाल जर्दाळू पिकवून देशातील लोकांना पिवळ्या जर्दाळूबरोबरच लाल जर्दाळू चाखण्याची संधी दिली आहे.

हिमाचल प्रदेशातील बखोल गावातील फलोत्पादनशास्त्रज्ञ संजीव चौहान यांनी त्यांच्या बागेत लाल बोलेरो ही लाल जर्दाळू तयार केली आहे, जी स्पॅनिश जात आहे. त्याचा आकार सामान्य जर्दाळूपेक्षा मोठा आहे आणि या ताज्या फळाची शेल्फ लाइफ देखील इतर जर्दाळूपेक्षा दहा दिवस जास्त आहे. लाल जर्दाळू म्हणजेच लाल बोलेरोचा वृद्धत्व विरोधी गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यात मदत करतो आणि अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

यामध्ये आढळणारे फेनोलिक ऍसिड कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखते. बागायतदार संजीव चौहान यांनी सांगितले की, 2020 मध्ये त्यांनी इटलीमधून लाल बोलेरो आणि रुबिल जातीची जर्दाळूची रोपे आयात केली होती. 

लागवडीनंतर दोन वर्षांनी फळे येऊ लागली आहेत. त्यांनी उत्पादीत केलेले हे जर्दाळू पूर्णपणे सेंद्रिय आहे, कारण त्यावर कोणतीही फवारणी केली गेली नाही. त्यामुळे तुम्ही याच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवू शकता.