Successful Women Farmer: महिला शेतकऱ्याने स्वबळावर कसली शेती, आज करतेय लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: कोणत्याही कामात सातत्य आणि चिकाटी असली अन त्याला मेहनतीचं कव्हर घातलं तर निश्चितच त्या क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवले जाऊ शकत. मग ते क्षेत्र किंवा काम कोणतं का असेना अगदी शेतीचे क्षेत्र (Farming) असलं तरी देखील त्यात यशस्वी होता येते.

शेती व्यवसायात काळाच्या ओघात आता बदल घडवून आणला जातं आहे शिवाय आता या व्यवसायात महिला देखील उतरू लागल्या आहेत आणि चांगले नेत्रदीपक यश मिळवीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात देखील असंच एक साजेसं उदाहरणं समोर येतं आहे.

जिल्ह्यातील नंदुरबार-नवापूर महामार्गावर असलेल्या आणि नंदुरबार पासून 26 किलोमीटर अंतरावर वसलेल्या निंबोनी गावातील एका महिला शेतकऱ्याने स्वबळावर माळरान जमिनीत आंबा लागवड (Mango Farming) यशस्वी करून दाखवली आहे. महिला शेतकरी रजनीताई कोकणी यांनी ही किमया साधली आहे.

याकामी रजनीताई यांना त्यांच्या परिवाराने देखील मोठी मदत केली आहे. रजनीताई व त्यांच्या परिवाराने माळरानावर अमराई फुलवून चांगले उत्पन्न कमावले आहे. यामुळे सध्या या महिला शेतकऱ्याची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे.

मित्रांनो खरे पाहता रजनीताई यांचे पती हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे पती नोकरीनिमित्त बाहेर राहत असल्याने घरची शेतीची सर्व जबाबदारी रजनीताई यांच्या खांद्यावरचं होती शिवाय आता देखील ही जबाबदारी रजनीताई मोठ्या शर्तीने पार पाडत आहेत. खरे पाहता ज्या वेळी रजनी ताईंनी शेती करण्यास सुरुवात केली त्यावेळी शेतीमध्ये पुरेशी पाण्याची उपलब्धता नव्हती शिवाय शेत जमीन देखील खडकाळ मुरबाड व पडीक होती.

मात्र स्वभावाने जिद्दी असलेल्या रजनीताईनी अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील शेती कसायला सुरुवात केली. मग काय पडीक जमीन (Barren Farmland) शेतीयोग्य बनवण्यासाठी स्वतः कुदळ घेऊन तसेच ट्रॅक्‍टरच्या साह्याने खडकाळ जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. अनेक वर्षांच्या श्रमानंतर आता त्यांची जमीन शेतीयोग्य झाली आहे.

सुरुवातीच्या काळात रजनीताई यांनी पावसाच्या आधारावर शेती केली. कोरडवाहू शेती (Dryland farming) करत असतानाही आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवला. आता त्यांनी पाण्याच्या सुविधेसाठी विहीर (Well) खोदली असून पाण्याचा शाश्‍वत पर्याय त्यांनी निर्माण केला आहे.

सध्या महिला शेतकरी (Women Farmer) रजनीताई आपल्या शेतात गहू, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, इत्यादी पिकांची शेती करत आहेत. याशिवाय त्यांनी कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, वांगे, मिरची, वाल- पापडी इत्यादी भाजीपालावर्गीय पिकांची देखील शेती सुरु केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी भातशेती देखील सुरु केली आहे.

रजनीताई भाताच्या इंद्रायणी या सुधारित वाणाची लागवड करत आहेत. याशिवाय शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प अंतर्गत रजनीताई यांनी फळबाग लागवड केली आहे. या अंतर्गत त्यांनी आपल्या एक एकर शेतीत आंबा लागवड केली आहे. त्यांनी आंब्याच्या 50 झाडांची लागवड केली असून यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळतं असल्याचे ते सांगतात. रजनीताई यांनी शेतीमध्ये केलेले हे काम इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे.

याशिवाय त्यांनी आपल्या रिकाम्या पडलेल्या बांधावर 200 सागाच्या झाडाची लागवड केली आहे. बांबू, नारळ, चिकू या फळबाग वर्गीय पिकांची देखील ते शेती करतात. यातून देखील त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. भाजीपाला वर्गीय पिकातून बारामाही उत्पन्न ते मिळवीत आहेत.

शेती व्यवसायात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणाली विकसित केली आहे. रजनीताई यांनी शेती व्यवसायात उत्पादन खर्चात मोठी बचत केली असून सेंद्रिय पद्धतीने ते शेती कसत आहेत. यामुळे त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे.

शेती व्यवसायात रजनीताईंनी केलेल्या कामाबद्दल त्यांना कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारकडून सर्वोच्च महिला शेतकऱ्याचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. निश्चितच रजनीताई यांचे हे कार्य इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणार आहे.