Agriculture News : आता रासायनिक कीटकनाशक फवारण्याची गरजच नाही ! ‘या’ जैविक कीटकनाशकाचा वापर करा, तंबाखूअळी सारख्या किटकाचा होणार नायनाट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : देशात गेल्या अनेक दशकांपासून उत्पन्नवाढीचे अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनियंत्रित वापर सुरू केला आहे. खरे पाहता उत्पन्नवाढीचे अनुषंगाने केलेला हा प्रयोग आता उत्पन्न (Farmer Income) कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू असल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे शिवाय जमिनीची सुपीकता देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आता देशात सेंद्रिय शेतीला (Organic Farming) चालना देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. शिवाय आता शेतकरी बांधवांना देखील रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात आले आहेत.

यामुळे आता पूर्णपणे सेंद्रिय शेती (Agriculture) करण्यावर शेतकरी बांधव जोर देत आहेत. अगदी कीटकांचा अटकाव करण्यासाठी देखील आता जैविक कीटकनाशकांची (Organic Pesticide) मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारत आहे आणि उत्पादनात देखील भरीव वाढ होत आहे. सेंद्रिय शेतीचे हेच फायदे लक्षात घेता मायबाप शासनाने देखील सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या आहेत.

मित्रांनो आज आपण सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण एका सेंद्रिय कीटकनाशकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण न्यूक्लियर पॉलीहाइड्रोसिस विषाणू (NPV) या विषाणूजन्य जैविक कीटकनाशकाची माहिती जाणून घेणार आहोत. न्यूक्लियर पॉलीहाइड्रोसिस विषाणू (NPV) व्हायरसवर आधारित हिरवी अळी (हेलिकव्हरपा आर्मिगेरा) किंवा तंबाखूच्या अळ्या (स्पेडोप्टेरा लिटुरा) यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी द्रव स्वरूपात उपलब्ध असलेले जैविक कीटकनाशक आहे.

त्यामध्ये विषाणूचे कण असतात, ज्याने अळीचे शरीर जाड तपकिरी, फुगलेले आणि कुजलेले होते, पांढरा द्रव बाहेर पडतो आणि सुरवंटने हा व्हायरस खाल्ल्यानंतर किंवा त्याच्या संपर्कात आल्यानंतर 2 ते 4 दिवसात मृत्यू होतो. रोगट व मृत अळ्या पानांवर व डहाळ्यांवर लटकलेल्या आढळतात. NPV कापूस, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, भेंडी, वाटाणा, भुईमूग, सूर्यफूल, तूर, हरभरा, भरड तृणधान्ये, तंबाखू आणि फळे यां पिकांवर येणाऱ्या अळीमुळे होणारे नुकसान टाळते.

वापरण्यापूर्वी 1 मिली NPV 1 लिटर पाण्यात द्रावण तयार करून 2 ते 3 फवारण्या 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 250 ते 500 मिली प्रति हेक्‍टरी या प्रमाणात पिकांसाठी उपयुक्त आहेत. फवारणी संध्याकाळी करावी आणि पहिली फवारणी अळीच्या प्रारंभिक अवस्थेत किंवा अंडी घालण्याच्या वेळी करावी याची काळजी घ्यावी.  NPV चे शेल्फ लाइफ 6 महिने आहे.