काय सांगता! गाई-म्हशीच्या शेणापासून तयार करा ‘या’ वस्तू आणि कमवा लाखों, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Business Idea: आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) करत असतात.

मात्र असे असले तरी अनेकदा आपण भटक्या गायी (Cow) मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असल्याचे पाहतो. अनेक शेतकरी बांधव आधी गाई-म्हशीच्या दुधापासून चांगले पैसे छापतो, मग ती गाय किंवा म्हैस दूध देत नाही या कारणाने तीला सोडून देतो.

कारण की ते पशु त्याच्या आता काही कामाचे नाहीत हे त्याला समजते. पण आज आम्ही तुम्हाला गाईशी संबंधित एक भन्नाट बिझनेस आयडिया (Business Idea) सांगणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधव त्यांची गाय दुध देत नाही या कारणामुळे तिला भटकण्यासाठी सोडणार नाहीत.

शिवाय या व्यवसायासाठी शेतकरी बांधव अजून मोठ्या प्रमाणात गाय पालन (Cow Rearing) करतील. हा व्यवसाय शेणाशी संबंधित असून या व्यवसायातून लोक महिन्याला लाखो रुपये कमावतात.

त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.मित्रांनो आजच्या या शहरीकरणाच्या काळात लाकूड कमी मिळत आहे. पूजेसह अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी शुद्ध लाकूड लागते.

अशा परिस्थितीत गाईचे शेण त्यापासून तयार करण्यात आलेल्या गौऱ्या किंवा लाकूड हा एक चांगला पर्याय सिद्ध होत आहे. पूजेसाठी शेण पुरेसे शुद्ध मानले जाते.

जर एखाद्या पशुपालकाकडे 20-25 जनावरे असतील तर त्याच्याकडे दररोज भरपूर शेण (Cow Dung Business) असते. जर तुमच्याकडे शेण नसेल तर ते दुग्धशाळेतून विकत घेऊन देखील आपण हा व्यवसाय सुरु करु शकता.

तुम्हाला ते रु.1 किलोमध्ये मिळेल. शेणापासून लाकूड तयार करण्यासाठी, आपल्याला अधिक पेंढा किंवा भुसा आवश्यक आहे, जे खूप स्वस्त आहे. त्यांचे मिश्रण करून लाकूड तयार करा आणि त्यांची विक्री करा.

अशी देखील कमाई होऊ शकते

शेणापासून लाकूड बनवण्याबरोबरच इतर अनेक मार्गांनी तुम्ही गाईच्या शेणापासून पैसे कमवू शकता. यामध्ये वाळलेल्या शेणखताचे दिवे, रोपांची भांडी आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.

त्यांची मागणी खूप जास्त आहे. मात्र त्यासाठी ओल्या शेणाचे रुपांतर कोरड्या शेणात करावे लागेल. या प्रक्रियेत शेणाचे भरपूर पाणी बाहेर पडेल, जे शेतासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही ते विकूनही पैसे कमवू शकता.

अशा प्रकारे कोरडे शेण तयार करा

आता शेण कसे सुकवायचे आणि मग कोरड्या शेणापासून लाकूड कसे तयार करायचे हा प्रश्न आहे. या दोन्ही कामांसाठी मशिनची गरज आहे. या कामांसाठी मशिन उपलब्ध आहे.

या मशीनच्या मदतीने तुम्ही ओल्या शेणाचे रुपांतर कोरड्या शेणात करू शकता. त्यानंतर दुसरे मशीन येते, जे कोरड्या शेणापासून लाकूड बनवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही शेणाचा वापर करून गाय वाचवाल आणि भरपूर पैसेही कमवाल.