कृषिमंत्र्याची मोठी घोषणा! द्राक्ष बागेच्या सुरक्षेसाठी 100 हेक्‍टर क्षेत्रावर राबविला जाणार ‘हा’ नावीन्यपूर्ण प्रयोग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी विधानसभेत एक मास्टर प्लॅन बोलून दाखवला. राज्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.

याची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात बघायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठीच ओळखला जातो. आता राज्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी (Grape Growers) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

द्राक्ष बागा निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच शेती ग्रस्त होत असतात. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, कधी गारपीट यांसारख्या अस्मानी संकटामुळे (Climate Change) द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होते परिणामी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक भुर्दंड सहन करावे लागते.

यामुळे महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) द्राक्ष बागांच्या सुरक्षेसाठी सुरुवातीला 100 हेक्‍टर क्षेत्रावर प्लॅस्टिक आच्छादन लावणार असल्याचे खुद्द कृषिमंत्री दादाजी दगडू भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दादाजी दगडू भुसे (Agricultural Minister) यांनी सांगितले की, आपल्या राज्यात द्राक्ष आणि डाळिंब या दोन फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

राज्या द्राक्षाचे जवळपास 1.20 लाख हेक्टर क्षेत्र असून डाळींबाचे 1.66 लाख हेक्टर क्षेत्र आहे. या दोन्ही फळपिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते.

यातून शासन दरबारी खूप मोठा महसूल देखील जमा होतो. मात्र असे असताना अनेकदा या पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो.

यामुळे याच्या उत्पादनात मोठी घट येते शिवाय मालाची क्वालिटी पण खराब होते. यामुळे अवकाळी व गारपीट सारख्या संकटांपासून डाळिंब व द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन करण्याचा काही शेतकऱ्यांनी भुसे यांना सल्ला दिला होता.

या प्लास्टिक साधनाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे गरजेनुसार याचा वापर करता येईल म्हणजेच जेव्हा गारपीट अथवा अवकाळीचे वातावरण तयार होईल तेव्हा हे प्लास्टिक आच्छादन पिकांवर टाकता येईल.

यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या लोखंडी संरचनेची देखील आवश्यकता भासते. द्राक्ष व डाळिंब पिकासाठी प्लॅस्टिक आच्छादन करण्यास सुमारे चार लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित असल्याचे भुसे यांनी नमूद केले.

याबाबत राहुरी कृषी विद्यापीठाला आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अहवाल देखील भुसेंकडे सादर केला आहे.

त्यामुळे प्लॅस्टिक आच्छादन देऊन पिके संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी असे देखील मत यावेळी भुसेंनी मांडले, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे देखील सांगितले.

या चालू आर्थिक वर्षात प्रयोग म्हणून सरकार द्वारे सुमारे शंभर एकर क्षेत्रावर द्राक्षबागा संरक्षित करण्यासाठी प्रयोग राबविला जाणार आहे. यासाठी संगणकीय सोडत काढली जाणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांची निवड होणार आहे.

एवढेच नाही भुसे यांनी पुढे बोलताना सांगितले की, आगामी काही काळात यासाठी देखील शेतकऱ्यांना आर्थिक साहय्य उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार