Green Gram Variety: मुग लागवडीत क्रांती आणेल ‘हा’ मुगाचा वाण! मिळेल शेतकऱ्यांना मुगाचे दुप्पट उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Green Gram Variety:- शेतकरी जेव्हा विविध पिकांची लागवड करतात तेव्हा त्या पिकापासून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी त्यांचे व्यवस्थापन देखील चांगल्या पद्धतीने करावे लागते. म्हणजेच खतांचे व्यवस्थापन असो

किंवा पाणी व्यवस्थापन तसेच विविध कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता आवश्यक असलेल्या फवारण्या इत्यादींचे नियोजन जेव्हा उत्तम असते तेव्हा निश्चितच पिकापासून शेतकऱ्यांना भरघोस असे उत्पादन मिळत असते.

परंतु या व्यतिरिक्त कुठल्याही पिकापासून भरपूर उत्पादन मिळण्यामध्ये त्या पिकाचे दर्जेदार अशा वाणाची निवड हे देखील फार मोठी भूमिका पार पाडत असते. लागवडीसाठी निवडलेला वाण जर दर्जेदार नसेल तर मात्र तुम्ही कितीही व्यवस्थापन केले तरी त्यापासून मिळणारे उत्पादन हवे तेवढे मिळत नाही व आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.

त्यामुळे वाणाची निवड करताना ते दर्जेदार व चांगले उत्पादन देणारे असणे खूप गरजेचे आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण मूग  या पिकाचा विचार केला तर मुगाचे देखील जर भरघोस उत्पादन तुम्हाला हवे असेल तर दर्जेदार वाण निवडणे खूप गरजेचे आहे.

याच अनुषंगाने आपण गेल्या चार वर्षांमध्ये भारतामधील शेतकऱ्यांच्या मध्ये ओळख निर्माण करणारा आणि विश्वास संपादन करणाऱ्या अशा स्टार 444 या वाणाची माहिती घेणार आहोत ज्याने शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केलेले आहे.

 स्टार 444 मुगाचा वाण देतो भरघोस उत्पादन

 स्टार 444 या मुगाच्या वाणाने गेल्या चार वर्षापासून भारतीय शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केलेले असून शेतकऱ्यांचा हा सर्वाधिक पसंतीचा वाण बनला आहे. यापासून भरघोस उत्पादन मिळते असे नाही तर या वाणाला बाजारपेठेत देखील चांगला दर मिळतो.

 ‘स्टार 444’ मुगाच्या वाणाचे वैशिष्ट्ये

1- काढणीस लवकर तयार होतो जर तुम्हाला मुगाच्या पिकापासून कमीत कमी कालावधीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर हा वाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. मुगाचा स्टार 444 हा वाण लागवडीनंतर 60 ते 65 दिवसात काढणीस तयार होतो. तसेच व्यवस्थापन देखील खूप जास्त पद्धतीने करणे गरजेचे नसते.

2- रोगप्रतिकारक शक्ती उत्तम स्टार 444 हा मुगाचा वाण पिवळ्या मोझ्याक विषाणू आणि इतर रोगांना खूप मोठ्या पद्धतीने सहनशील आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उत्पादन वाढते.

3- जास्त उत्पादन आणि नफा स्टार 444 या वाणापासून इतर जातींच्या तुलनेत एकरी दोन ते तीन क्विंटल जास्त उत्पादन मिळू शकते. साहजिकच शेतकऱ्यांना 25 ते 30 हजाराचा अतिरिक्त नफा मिळणे शक्य आहे. या वाणाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.